मुखपृष्ठ
मध्यरात्रीचे पडघम

माझे शेल्फ

मध्यरात्रीचे पडघम

इंग्रजी शीर्षक
Madhyaratriche Padgham
सारांश

आपल्याकडे भयकथा, गूढकथा या कथा प्रकारांची सुरुवात पंचावन्न वर्षांपूर्वी झाली. ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक कै. द. पां. खांबेटे यांनी ती केली. त्यांच्या कथेत अतिंद्रिय जगाबद्दलचा पाश्चिमात्य आणि पौर्वात्य असा दोन्हीकडचा सखोल व्यासंग दिसत असे. त्यांच्यानंर हा कथाप्रकार उत्तम प्रकारे पुढे नेला तो नारायण धारप आणि रत्नाकर मतकरी यांनी. कित्येक उत्तम भयकथा त्यांनी मराठीत वाचकांना दिल्या. प्रस्तुत ‘मध्यरात्रीचे पडघम’ हा रत्नाकर मतकरींच्या काही निवडक भयकथांचा, गुढकथांचा संग्रह आहे. यातल्या बहुतेक कथा या ७० ते ८०च्या दशकातल्या आहेत. आता त्यांच्यातला थरार जाणवत नाही. मतकरींच्या एकेकाळच्या गाजलेल्या कथा नव्याने उपलब्ध झाल्यात, एवढेच महत्त्वाचे. नाथमाधवांची ‘वीरधवल’ कादंबरी आता १०० वर्षांपेक्षाही जुनी असेल. पण तिच्यातली भुताटकीची वर्णने आजही वाचकाला तोच थरार मिळवून देतात हे विशेष. मांडणी, मुद्रण, मुखपृष्ठ आदी तांत्रिक बाबी निर्दोष.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
किंमत
100.00
समुदायाने जोडले
बंद