मुखपृष्ठ
महाश्वेता

माझे शेल्फ

महाश्वेता

इंग्रजी शीर्षक
Mahashweta
सारांश

महाश्वेता कादंबरीची नायिका अनुपमा सुंदर आहे, अभिजात अभिनयकला तिच्यात आहे, संस्कृत तज्ञ आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी संस्कारांनी श्रीमंत आहे. पण दुर्दैवाने लग्नानंतर तिच्या शरीरावर कोड फुटते आणि सासरी व माहेरी, आजारामुळे तिची पुरती ओळख मिटवन टाकली जाते. ही मिटवून टाकलेली ओळख अनुपमा ज्या ताकदीने आयुष्याचा स्वीकार करत पुन्हा मिळवत जाते, त्याची ध्येर्यकथा म्हणजे महाश्वेता ही सुधा मूर्ती यांची कादंबरी होय. कादंबरीची सुरुवात आनंद आणि अनुपमा यांच्या विवाहाने होते. अनुपमा अत्यंत सुंदर, पण एका शाळा मास्तरची मुलगी आणि आनंद अत्यंत हुशार, गर्भश्रीमंत डॉक्टर. विषम आर्थिक परिस्थितींमुळे दोघांचं लग्न होणे कठीण; पण सर्वांचा विरोध असूनही त्यांचं लग्न होतं. तीन महिन्यांनंतर पुढील शिक्षणासाठी आनंद इंग्लंडला रवाना होतो. तो गेल्यावर सर्वस्वी एकट्या अनुपमाला ऐश्वर्याचा गर्व असलेली सासू व नणंद यांच्याकडून मिळणारी वागणूक अपमानाची असते. त्यातच पायावर निखारा पडल्याचे निमित्त होते आणि अनुपमाच्या पायावर पांढरा डाग उमटतो. तो वाढतच जातो नि कोड फुटल्याचे निदान डॉक्टर करतात. त्यामुळे अनुपमाला सासरी तुच्छ लेखले जाऊ लागते. या सगळ्यात तिला आशा असते पती आनंदकडून; पण तिच्या पत्राला आनंदकडून जराही प्रतिसाद मिळत नाही. अनुपमा माहेरी परतते.तिच्या व्यंगामुळे तिच्या बहिणीचे ठरलेले लग्नही मोडते. त्यामुळे वडिल-बहिणही अंतरतात. सर्वांकडून अपमानित झालेली अनुपमा मुंबईत येते. मैत्रिणीकडे राहून एका कॉलेजात संस्कृत विषयाची प्राध्यापक म्हणून नोकरी करु लागते. हळूहळू अनुपमा स्वतःला सावरून आपलं स्वतंत्र विश्व निर्माण करते आणि इतरांना जगण्याची नवी दिशा देते. पुढे तिला पती आनंद न्यायला येतो, तिची माफी मागतो, तिच्या व्यंगासकट तिला स्वीकारु पाहतो. पण आता कोडाने महाश्वेता झालेल्या अनुपमाला ओढ असते ती फक्त तिच्या कलेची, अभिनयाची. घर-संसार यापासून मनाने दूर झालेली अनुपमा आनंदला चांगलंच सुनावते व त्याच्यासोबत जाण्यास नकार देते. महाश्वेता कादंबरीचे प्रत्येक पान आपल्याला बांधून ठेवते. भाषा भारदस्त असून अलंकारिक सुवचने, उपमांचा वापर यांमुळे कादंबरी वाचनीय झालेली आहे. या पुस्तकातील अनुपमा व डॉ. सत्यप्रकाश आणि अनुपमा व आनंद यांच्यातील संवाद केवळ अप्रतिम आहेत.

पाटीलांची शैली किल्ल्याच्या तटबंदीचा भक्कम चिरा असावा तशी कांदंबरीभर प्रत्ययाला येते. वानोळा म्हणून पहा. (पृ.३१३ वर) वर्णन कसे आहे, सायंकाळी घराच्या ओढीने खिलार झपाट्याने रानातून खाली निघावे, तसाच मावळ्यांच्या पायांना जोराचा वेग आला होता. किंवा संवादात सहजतेने नाट्य येते, भाष्य येते तेही भाषावैभवाची पताका मिरवणेच ठरते. बाजीराजाला आदिलशहा स्तंभित होऊन म्हणतोय. बाजीराजे, तुमच्या भूमीतच भाऊबंदकीच्या देवाचं अस खतरनाक पीक का वाढत असावं बरं (पृ. ३७५) या संवादात भाऊबंदकीवर बोट ठेवले आहेच; शिवाय शेतीप्रधान हो भाषा आहे. विलक्षण प्रभावी वस्तुस्थिती, प्रदेशभान, हालचालींचा वेग आणि व्यक्तीचे लढवैय्या वा मातीतून आलेले स्वभाववैशिष्ट्य नेमकेपणाने चितारण्याच्या अनेक खुणा जागोजागी दिसतात. त्यामुळे इतिहास जसा काही वर्तमानात अवतरतो. नायक शिवरायांची तर अनेक घटनांतून अनेक वैशिष्ट्ये दिसतात. रयतेचा सर्वकाळ विचार करणारा लोकनायक. रंणागण दुसरीकडे गेल तर त्या भागातल्या रतयतेच्या पिकांना, जित्रापांना आणि वस्त्यांना झळ पोचायला नको. ही बरबादी टाळण्यासाठीच आम्ही हवं ठाणबंद झालो आहोत. " (पृ. ८२) किंवा शत्रूला वानरवळा चा हिसका दाखवू पाहणारे (पृ. ८९) शिवराय किंवा जिजाबाईशी सोयराबाईशी आबासाहेबांशी होणाऱ्या संवादांतून दिसणारी त्यांची राजधारणा... या सगळ्यात वाचक मनाने मावळ्यांसारखा शिवरायांच्या समीप वावरतो. (पू. २०८ पहावे.) रायबाधन, जिजाबाई, नेताजी पालकर, शाहिस्तेखान आदींच्या शारीरवर्णनापेक्षा पाटलांनी त्यांची व्यक्तिमत्त्वत्वृत्तीच प्रभावीपणे दाखवली आहे. एकूणातच असे पानक्रमांक देऊन काही शाबीत करणे पोरमनाचेच. संपूर्ण कादंबरी हा एका कर्तृत्वाचा आलेख आहे. आखलेल्या डावपेचांचा पट आहे. सागरकिल्ला उभारण्याची निकड, शत्रूशी केलेले गनिमीकावे, माणसांची केलेली पारख, राज्यउभारणीसाठी तयार केलेला माहौल भविष्यवेधी आखणी राखलेले अष्टावधान, महाराष्ट्राच्या मातीशी राखलेले इमान केलेल्या कड़क सजा, केलेल गौरव लोकसंग्रह... भूतकाळाला पालाण घालून वर्तमानकाळ गाठतात. म्हणूनच हो ऐतिहासिक कादंबरी असूनही तिला गूढरम्य अशा गोष्टींचे वलय सहजतेने लाभले आहे. जणू नाथमाधवांच्या कादंबरीजगात विश्वास पाटलांचे बोट धरून वाचक शिरतो, रंजकतेला जवळ करून इतिहासात रमतो. नेम धरिता राजकारणा प्रसंग पाहोन चालावे असे शिवरायांचे वागणे, त्यांची कर्तबगारी, त्यांनी घडवलेला इतिहास म्हणजे रणखैंदळ च आहे जशी. ही घमासान घटनांची एकामागोमाग येणारी वावटळच नेटके सूत्र घेऊन विश्वास पाटील यांनी वाचकांसमोर उभी केली आहे. मात्र या वावटळीत वाचक भ्रमित होत नाही. याचे कारण ती कुठेही संथ (कंटाळवाणी) नाही. महाराष्ट्रधर्म वाढवावा म्हणजे काय; ते त्याला महाकादंबरीतील महातुकड्यांतून आपोआपच कळते. तो पुढील भागाची निश्चितच प्रतीक्षा करू लागतो.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
किंमत
175.00
समुदायाने जोडले
बंद