मुखपृष्ठ
मोरावळा

माझे शेल्फ

मोरावळा

इंग्रजी शीर्षक
Moravala
सारांश

‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत यांना त्यांच्या आयुष्यात भेटलेल्या काही व्यक्तींची शब्दचित्रे ‘मोरावळा’ या संग्रहात समाविष्ट करण्यात आली आहेत. यात राजकारणी-समाजकारणी, कवी-लेखक प्रकाशक आहेत. तशा काही निखळ ग्रामीण व्यक्तिरेखाही आहेत. अण्णा (ग. दि. मा), ना.स. इनामदार, कॉटिनेंटलचे अनंतराव कुलकर्णी या व्यक्ती शिवाजी सावंत यांनी आपल्या शब्दसामथ्र्याने वाचकांसमोर साक्षात् उभ्या केल्या आहेत. ज्यांनी अण्णांना पाहिले नसेल त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांचे रसिक अघळ-पघळ व्यक्तिमत्त्व उभे करण्याची किमया सावंतांच्या भाषेत आहे. अनंतराव कुलकर्णी हे ‘मृत्युंजय’चे प्रकाशक. त्यांच्यात आणि लेखकात या कादंबरीच्या शेवटाबाबत घडलेला प्रसंग यात रंगविला आहे. त्यातून प्रकाशक म्हणून अनंतराव किती बारकाईने विचार करतात आणि अखेर लेखकाला प्रभावीपणे आपले म्हणणेच कसे पटवून देतात याचे दर्शन घडते आणि त्यांच्या यशाचे रहस्यही सहजपणे उमगते. कै. यशवंतराव चव्हाणांमधली रसिकता आपल्याला जाणवते तसा केज गावी एका गावरान वृद्धेनं यशवंतरावाना मुलांच्या खाऊसाठी म्हणून वाटेत अडवून दिलेला सव्वा रूपया आणि त्यावेळची चव्हाणांची वागणूक हा एखाद्या ऐतिहासिक कादंबरीत शोभावा असाच प्रसंग आहे. ना. स. इनामदार आणि लेखक यांच्यातील स्नेह आणि लेखाला दिलेले स्नेहश्रीमंत इनामदार हे शीर्षक इनामदारांचे ऐतिहासिक लेखनही सूचित करते. ही झाली नामवंतांची व्यक्तिचित्रे, पण तानमावशी आणि चिलू मोरवळा ही दोन ग्रामीण व्यक्तिचित्रेही वाचनीय आहेत. सावंतांचा हा मोरावळा संग्रही ठेवावा असाच आहे.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
किंमत
60.00
समुदायाने जोडले
बंद