माझे शेल्फ
मृत्युंजय
मृत्युंजय ही मराठीतील एक अजरामर कलाकृती आहे. 2005 ला डी.एड् ला असताना वाचली होती... पण आता परत वाचावीशी वाटली... 1800 पानांचे हे हस्तलिखित पूर्णत्वास नेण्यासाठी लेखकांना 7 वर्षांचा कालावधी लागला.प्रचंड मोठा आवाका असणारे मराठी भाषेतील अग्रगण्य लेखक शिवाजी सावंत.... लेखकांच्या अफाट मेहनतीला,तळपत्या लेखनीला व वाचकाला खिळवून ठेवणार्या लेखनशैलीला मानाचा मुजरा!!! कर्णकथा,दानशूर कर्ण,ज्येष्ठ कौतेय,राधेय सूर्यपूत्र कर्ण ! कर्ण ! कर्ण ! त्याचा त्याग,त्याने भोवलेल्या यातना,सोसलेले कष्ट,सूर्यपूत्र असूनही त्याला आयुष्यभर सूतपुत्राची अवहेलना सहन करावी लागली,त्याचे निव्वळ मित्रप्रेम,त्याचा आदर्शवाद.....कादंबरी मधील पात्रांचे आत्मकथन सारं काही खिळवून ठेवणारं आहे.आज जेव्हा शिवाजी सावंत यांची लोकप्रिय कादंबरी मृत्यूंजय वाचून समाप्ती झाली तेव्हा कळाले. "अंगराज कर्ण..... सुतपुञ कर्ण..... कौरव दिग्विजयी सेनापती कर्ण .....जेष्ठ कौंतिया कर्ण..... राधेय कर्ण ...... साक्षात इंद्रदेवाला आपल्या दारात याचक म्हणून उभा करणारा दानी कर्ण ......आपला मिञ दुर्योधन व कौरव पराभूत होणार माहीत असताना मिञाला दिलेल्या शब्द खातीर शेवट पर्यंत जिगरांने लढणारा कर्ण...... मृत्यू च्या दारात उभा असताना याचक वृद्ध ब्राम्हणाला स्वतःचे दोन सोन्याचे दात दगडाने तोडून देण्याचे मुलाला आदेश देणारा दानविर कर्ण .......प्रत्येक माणसात एक कर्ण असतोच..! १० दिवस डोक्यात गरागरा फिरणारा कर्ण आज डोक्यासह शांत झाला.! कादंबरी कार शिवाजी सांवत ना कोटि कोटि प्रणाम.