मुखपृष्ठ
मृत्यू. . . माझ्या उंबरठ्याशी

माझे शेल्फ

मृत्यू. . . माझ्या उंबरठ्याशी

इंग्रजी शीर्षक
Mrutyu Mazya Umbarthyashi
सारांश

जगण्याचा संदेश देणारा ‘मृत्यू’... ‘डेथ अॅट माय डोअरस्टेप’ हे खुशवंत सिंग यांचं सुंदर पुस्तक आता मराठी वाचकांनाही वाचायला मिळेल. ‘मृत्यू... माझ्या उंबरठ्याशी’ हा मूळ पुस्तकाची खुमारी कायम ठेवणारा सुरेख अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला आहे. या पुस्तकत मृत्यूविषयीच लेखक बोलत राहतो. खुशवंत सिंग यांनी मृत्युलेख अनेक लिहिले; पण पहिला मृत्युलेख ऐन विशीत असताना लिहिला. ‘मृत्यूनंतर’ या दुसऱ्या भागात हे मृत्युलेख समाविष्ट आहेत. तरुण हुकूमशहा संजय गांधी, मार्क्सवादी लक्षाधीश रजनी पटेल, आर. के. नारायण, प्रोतिमा बेदी, भीष्म सहानी, धर्माकुमार, चेतन आनंद यांच्यावरील मृत्युलेख विशेष वाचनीय आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातील या माणसांची लेखकाने केलेली निरीक्षणे विलक्षण आहेत. त्यातून ती माणसे, त्यांचे कार्य नेमकेपणाने मांडले जाते. ‘मृत्यू आणि मरण’ या शीर्षकाचा पहिला भाग मला विशेष आवडला. दलाई लामांचे मृत्यूविषयक विचार, आचार्य रजनीश यांचे मृत्यूचे भय हे लेख सुन्न करतात. मृत्यूनंतरचे जीवन, मृत्यूचा अनुभव हिटलिस्ट या लेखांमधील अनुभव थरारून सोडतो. हे पुस्तक मृत्यूविषयी आहे, त्यामुळे काही काळ आपण अस्वस्थही होतो. पण वाचून पूर्ण झाल्यानंतर हे पुस्तक जगण्याचाच संदेश देत आहे, असा सुंदर अनुभव येतो.

खुशवंत सिंगानी प्रथम म्रुत्यु संबंधी आचार्य रजनीश,दलाई लामा आदिंचे विचार नमुद केले आहेत आणि नंतर अनेक व्यक्तिं चा नमुनेदार जीवनपट व त्यांचा अंत या विषयी अतिशय शैलीदार भाषेत विवेचन केलेले.संग्रहणीय पुस्तक!

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद