मुखपृष्ठ
नागकेशर

माझे शेल्फ

नागकेशर

इंग्रजी शीर्षक
Nagkeshar
सारांश

विश्वास पाटील याचे लेखणीतून उतरलेली आणि सत्तासंघर्ष कुटुंबातही कसे थैमान घालतो या ज्वलंत व जळजळीत विषयावरील कादंबरी. काल्पनिक पात्रे सत्ताधीश,जेते,योद्धे आदींच्या लढाया, डावपेच, मोहिमा करत नाहीत.ती सत्ता, प्रतिष्ठा, पैसा, प्रभाव कसही करून काबी करण्याच्या जीवघेण्या स्पर्धेतील प्यादी आहेत. भले वजीर,हत्ती,घोडे,उंट नसतीलही; पण तोच झगडा करतात.तसेच वागतात.तसाच खुनशीपणा करतात.तशीच लालसा बाळगतात.तसेच छुपे डावपेच आखतात. तशीच उघड ईर्षा करत मत्सराचे फुत्कार सोडत एकत्र रहातात.तशीच बेपर्वाई दाखवत जीवन जगतात.आणि तितक्याच कोडगेपणे परिणामांना सामोरे जातात. मानवी जीवनातील खेळते प्रवाह व सुप्त अंतःप्रेरणा शेवटी एकच आहेत हे सूत्र मनावर बिंबवतात. काम,क्रोध,मद,मोह इत्यादि षड्रिपू यांनी प्रत्येकाचा भावनिक पिंड बनलेला आहे. कोणी बाह्यजगाने बहाल केलेली पद व सत्ता ही कवचकुंडलांचे आड या तमोगुणांना झाकतो. कोणी यांची ढाल वापरून आपली लालसा व कामना पूर्ण करतो.कुणी या कवचांनी लादलेली जबाबदारी गुंडाळतो व लोक,नोकरवर्ग, कामगार,शेतकरी,मतदार यांना दारीही उभा करत नाही. आणि आपली स्वप्ने व हाव यांचे दावणीला बांधतो. माणस शहरी असोत वा खेडूत ,सभ्यता व संस्कृती यांचा किमान सामाजिक बुरखा संपत्ती व ऐयाशी हा भुलभुलैया प्राप्त करणेकरता कसा टरटरा फाडतात याचे बिनधास्त वर्णन "नागकेशर"मध्ये आहे.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद