माझे शेल्फ
नॉट गॉन विथ द विंड
‘स्वप्ननगरीची जादुई सफर’... चित्रपट हे माध्यम इतकं ताकदीचं आणि विलक्षण परिणामकारक आहे की, यांच्या तडाख्यातून भलेभले दिग्गज स्वत:ला वाचवू शकत नाही. आजवर या माध्यमावर एवढं प्रचंड लिखाण झालयं की, असं दुसऱ्या माध्यमावर, चितच झालं असेल. एखादा विचार किंवा एखादं कथानक जेव्हा योग्य हाती जातं तेव्हा याचं दृकश्राव्य रूपांतरण आपल्याला अचंबित करतं. एखादी कादंबरी फक्त तीन तासांच्या अवधीत तुमच्यासमोर सामथ्र्याने पेश करणं म्हणजे महाकठीण कामं आणि जगभरातील काही शहेनशहा मात्र लीलया हे चमचमणारं रत्न तुमच्यासमोर दिमाखात पेश करतात. चित्रपटसृष्टीचा जगभराचा सुवर्णकाळ म्हणजे ६० ते ७० चे दशक. या काळात भारतासारखेच इटली, फ्रेंच, ब्रिटिश चित्रपटसृष्टीने चित्रपटप्रेमींना अजरामर चित्रपट दिले. ‘नॉट गॉन विथ द विंड’ हे विश्वास पाटील यांचे चित्रपट दुनियेची जादुई सफर घडवणारे ललित. या संग्रहात आजवरच्या जगभरातल्या उत्तमोत्तम चित्रपटांच्या कथेबरोबर चित्रपटामागची भूमिका, त्याची निर्मिती, निर्मिती दरम्यानचा प्रवास, चित्रपटातील व्यक्तिरेखा, अभिनेते, दिग्दर्शक, कालानुसार राजकीय संदर्भ आणि जनमानसावर होणारा परिणाम या सगळ्यांचे अंतर्बाह्य वर्णन तुम्हाला वाचायला मिळते. याची सुरुवात ‘गॉन विथ द विंड’ या कादंबरीची लेखिका, त्या कादंबरीची निर्मिती त्यातून तिचा चित्रपट होण्यापर्यंतचा काळ आणि दिग्दर्शकाची भूमिका अशी होऊन पुढे जात ऑथेल्लो, अॅना करनीना, ऑल, , देवदास, प्रिन्स मिश्किन, दर्यावर स्वारी मॉबिडीक, द ब्रीज ऑन द रिव्हर.. , शिंडलर्स लिस्ट, द गॉडफादर, द ब्ल्यू एंजेल, पिंजरा, स्ट्रीटकार, द गुड अर्थ, मदर इंडिया, टेस, स्पार्टाकस, बे्रव्हहार्ट, लगान, मुघल-ए-आझम, या चित्रपटांचा आस्वाद घेताना काय काय माहिती करून घ्यावी? आणि तो चित्रपट वाचनातून मूर्तिमंत तुमच्यासमोर पुन्हा उभा राहून तुम्हाला वेगळाच आनंद मिळतो कसा? याचा स्वानुभव नक्कीच घ्यावासा वाटेल. विश्वास पाटील यांच्या खमंग आणि चुरचुरीत लेखनामुळे हा संग्रह चित्रपटप्रेमींसाठी चंगळ ठरावी. व्हिक्टर फ्लेमिंग, डेव्हिड लोन, जॉन ह्युस्टन, दिग्दर्शक डिशिका, स्टॅनले क्युबिक, रोमन पोलन्स्की, जॉन फोर्ड, एलियाकझान, स्टिव्हन स्पिलबर्ग, भारतीय दिग्दर्शक विमल रॉय, के आसीफ, आशुतोष गोवारीकर, अनंत माने या सगळ्या श्रेष्ठ दिग्दर्शकांची कामगिरी आणि त्यांनी दिलेले नितांत सुंदर चित्रपट यांची माहिती सुरेख कृष्णधवल आणि रंगीत छायाचित्रांसह संग्रहात समाविष्ट आहे. ‘ द गुड अर्थ’ हा चित्रपट एका चिनी शेतकऱ्याची जीवनकथा असून ही कथा बनली जगप्रसिद्ध नोबेल कादंबरीवरून. पर्लबकच्या या कादंबरीवर पुढे हा महान चित्रपट बनला. पुढे ‘मदर इंडिया’ हा चित्रपट भारतीय चित्रपटांसाठी मैलाचा दगड ठरला. मातीशी माणसाचे असणारे नाते जगात कुठेही जा एकसारखे असते, याची प्रचिती येते. नर्गिस ही भूमिका अक्षरश: जगलीय. ‘शिंडलर्स लिस्ट’ हा ऑस्कर पुरस्कारप्राप्त चित्रपट काय आहे नेमकं या चित्रपटात? शिंडलर्स लिस्ट पाहून मानवी मन बैचेन होतं ते का? या सगळ्यांची उकल या संग्रहात आहे. विश्वास पाटील यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, प्रेम आणि निष्ठा यामुळे हे परदेशी चित्रपट केव्हा आपले होतात कळत नाही.