माझे शेल्फ
नवरा म्हणावा आपला
खुसखुशीत कथांचा संग्रह... श्री. काळे हे एक यशस्वी कथालेखक आहेत. त्यांनी ‘नवरा’ या नावाभोवती गुंफलेल्या पंधरा कथा या संग्रहात आहेत. या सर्व कथांची गुंफण सांसारिक स्त्री आणि पुरुष यांच्याभोवती गुंफलेली आहे. .... प्रधान आणि खुसखुशीत गप्पा या कथा आहेत. ेखक सुरुवातीला एखाद्या रोजच्या सामान्य घटनेला घेऊन त्यातून आपल्या कन्येचा आशय प्रकट करतो. नवरा म्हणावा आपला’ या कथेत एका विवाहीत स्त्रीच्या भावना यासुद्धा लेखकाने मोठ्या खूशीने उलगडला आहे. ‘घरोघरी’ सर कथ्रेत मुंबईच्या पांढरपेश्या घरात रोज घडत असलेली ... शब्दबद्ध करून या कथेत मांडली आहे. ‘भांडण्यात मजा आहे’ या कथेत एका कारकून महाशयाला लोकलमध्ये एक गृहीणी दिसते आणि त्या मुलींना पुन्हा गुन्हा घडण्यासाठी हे महाशय काय करतात आणि कसे बेचैन होतात त्याचे वर्णन आहे. ‘श्रावणी सोमवार’ या कथेत एखादे दिवशी उपवास नसूनसुद्धा तोंडात पाणी पडायचे नसले तर दिवसभर कशा घटना घडून येतात. त्याचे चित्रण लेखकाने केले आहे. ते चित्रण काहीसे अतिशयोक्तीचे वाटते. प्रातिनिधिक कथाविश्व ‘आठ त्रिक चोवीस’ या कथेत प्रेम करणाऱ्या श्रीमंत नसलेल्या मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात प्रेमाचा पाढा चुकल्यामुळे कसा फजितवाडा होतो त्याचे चित्रण आहे. ‘वसा-वसाचा वसा’ या कथेत पत्नीने कोणता वसा घेतला असता संसार सुखाचा होतो त्याचे खुमासदार पण अतिशयोक्तीचे वर्णन आहे. ‘किक् ’ या कथेत स्टार्ट न होणारी स्कुटर आणि माणसांचे स्टार्ट न होणारे मन प्रसंगाच्या किकमुळे कसे स्टार्ट होते त्याचे वर्णन आहे. ‘भित्यापाठी’ या कथेत मुंबईहून पुण्याला टॅक्स चुकवून रेडिओ नेण्याची भीती आणि त्या भीतीपाठी घडलेल्या अतिशयोक्तीपूर्ण घटनांचे वर्णन आहे. ‘किल्ली,’ ‘दोनच,’ ‘तूर्त दान महापुण्य’, ‘वह कौन थी’, ‘घास’, ‘मी दिवाळी अंक विकत घेतो’ या कथांत जीवनात घडणाऱ्या विविध प्रसंगाचे परिचित दर्शन वाचकाला घडते. लेखकाची भाषा सोपी असून त्याच्या अवलोकन शक्तीमुळे त्याचे हे कथाविश्व मर्यादित असले तरी बरेचसे प्रातिनिधिक झाले आहे.