माझे शेल्फ
पितृऋण
सुधा मूर्तीच्या सर्वच कथा या मानवी मूल्यांवर आधारित व त्या कथेतून सकारात्मक संदेश व शिकवण देऊन जातात. अशीच ही एक कथा पितृऋण. बेंगलोर मध्ये एक कुटुंब राहत असते. वेंकटेश नावाचे ज्येष्ठ व्यक्ती त्या कुटुंबातील एक जबाबदार सहृदय अत्यंत शांत व सदै इतरांना मदत कारणारा स्वभाव असणारे गृहस्थ जे SBI मध्ये नोकरी करतात. तर त्याच विरुद्ध स्वभावाची त्यांची पत्नी शांता की अत्यंत व्यवहारी जिला नेहमीच व्यवहार, पैसा गुंतवणे, शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग, महिला मंडळ लेडीज पार्टी आदीत आवड सोबत प्रतिष्ठा वगैरे प्रिय. त्यांना 2 मुले मुलगा रवी सॉफ्टवेअर इंजिनियरिंग केलेला आई प्रमाणेच व्यवहारी तर मुलगी गौरी MBBS करून स्त्रीरोगतज्ज्ञ चे शिक्षण सुरू आणि भविष्यात स्त्रीरोगतज्ज्ञ होऊन रुग्णांची सेवा हेच तिचे ध्येय, वडीलांप्रमाणे तिचा स्वभाव मनमिळाऊ, शांत, इतरांना मदतीसाठी सदैव तत्पर. एकदा वेंकटेश यांची बदली हुबळी येथे होते तिथे ते गौरी ची मैत्रीण पाटील यांच्या घरी किरायदार म्हणून राहू लागतात. एकदा एका मुंजच्या कार्यक्रम निमित्त शिग्गावी जातात केंव्हा अनेक जण त्यांना शंकर मास्तर समजून आवाज देतात, एकदा घोळ होऊ शकतो पम तीनदा ... ते म्हणतात ना जगात एकाच प्रमाणे दिसणाऱ्या 7 व्यक्ती असू शकतात. पण एकाच गावात 3 लोक त्यांना शंकर मास्तर म्हणून हाक मारतात म्हणून मग शोध सुरू होतो. शंकर मास्तर कोण आहेत त्याचा.....त्यांना जाऊन वेंकटेश भेटतात.....तिथे शंकर मास्तरांची मुलगी देखील वडील समजून हाक मारते.....मग दोघांची चर्चा कुटुंबविषयी....शंकर मास्तरांचे कुटुंब अत्यंत साधे दारिद्र्यात परंतु स्वाभिमानाने जीवन जगत असतात. वेंकटेश यांचा शोध त्यांना शंकर मास्तर यांच्या मूळ गावी शिशुनाळ ला पोहोचतात तिथे त्यांची भेट शंकर मास्तरांची आई भागव्वा शी भेट होते. आणि वेंकटेश यांना श्राद्ध पूजेतून पीत्रांचे स्मरण करतांना आपल्या पूर्वजांच्या नावाशी साम्य दिसल्यावर मग ते रहस्य जाणून घेण्यासाठी ते भागव्वा ला विनंती करतात. भागव्वा कडून त्यांना त्यांच्या वडील सेतुमाधवराव विषयीच्या पूर्वायुष्याची कहाणी, त्यात गैरसमज व नियतीने घेतलेल्या कठीण परीक्षा, परिस्थिती सर्व गोष्टी तुटक तुटक उलगडत जातात. या सर्व कठीण परिस्थितीत आपल्या आज्जीच्या स्वभावामुळे, गुंडप्पा, गावातील लोकांच्या बोलणे, गैरसमज आदींमुळे भागव्वा व शंकरराव वर ओढवलेली आर्थिक परिस्थिती, अवेळी आलेले वैधव्य, केशवपन ........ नियतीचा बळी ठरलेल्या पित्याची जबाबदारी स्वतःचे अर्घ्य देऊन पूर्ण करणाऱ्या कर्तव्यशील पुत्र वेंकटेश याचे अस्वस्थपन या कादंबरीत पावलोपावली दिसून येते. आता खरी भूमिका नायक वेंकटेश यांची ही परिस्थिती जाणून घेतल्यावर वेंकटेशराव आपल्या वडिलांचे पितृऋण अर्थात भागव्वा व शंकर च्या प्रति त्यांची असलेली जबाबदारी व पितृऋण फेडण्यासाठी काय भूमिका घेतात ? अत्यंत व्यवहारी अशी त्यांची पत्नी शांता व मुलगा रवी त्यांना हे पितृऋण फेडण्यासाठी साथ देईल का ? मुलगी गौरी तिच्या वडिलांचे पितृऋण हे आपलेच समजून ते पूर्ण करण्यासाठी काय भूमिका घेईल..... मानवी भावना, मूल्यांची जपवणूक शिकवणारी अशी ही कादंबरी पितृऋण नक्कीच आपण सर्वांनी एकदा तरी वाचावी.