मुखपृष्ठ

माझे शेल्फ

परीघ

इंग्रजी शीर्षक
Parigh
सारांश

सुधा मूर्ती यांची जीवनशैली जितकी साधी आहे तोच साधेपणा त्यांच्या प्रत्येक साहित्यामध्ये उतरलेला दिसतो. आपल्या समाजामध्ये असणाऱ्या विविध प्रवृत्तीच्या माणसांचे चित्रण त्यांच्या लेखनातून प्रकर्षाने जाणवते . त्याच पठडीतले सुधा मूर्तींचे एक पुस्तक म्हणजे रीघ ! आपल्या आजूबाजूला पाहिलं तर आपल्याला दिसतं की काही माणसं भोगवादाला महत्त्व देतात तर काही जण आदर्शवाद पाळतात. ह्याच दोन वृत्तींच्या मधलं द्वंद्व लेखिकेने या पुस्तकात मांडले आहे. उत्तर कर्नाटकातल्या एका लहान गावातून आलेल्या , छोट्या गोष्टींमध्ये समाधानी असणाऱ्या मृदुलाची आणि तिच्या जीवनात येणाऱ्या हेलकाव्यांची ही गोष्ट ! गोष्टीचं आशय दिसताना अगदी साधा सरळ वाटतो ; पण त्यातला गभितार्थ खूप गहिरा आहे. साधा विषय अत्यंत खोलात जाऊन मांडणे हे सुधा मूर्तींच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे आणि ते ह्या पुस्तकातून प्रकर्षाने जाणवते. साध्या सरळ स्वभावाची , सगळ्या गोष्टींच्या मध्ये समाधानी असणारी , आदर्श वादाला प्राधान्य देणारी मृदुला , सुरुवातीला तत्व आणि मूल्य यांची पाठराखण करणारा परंतु काळाच्या ओघात आणि पैशाच्या कैफ चढल्याने भोगवादात सुख मानणारा तिचा नवरा संजय , भौतिक गोष्टींच्या हव्यासापायी पैशाची हवी तशी उधळपट्टी करणारे , थोड्याशा आतल्या गाठीची मृदुलाची नणंद लक्ष्मी आणि तिचा नवरा शंकर , काटकसर आणि पैसे साठवण्याच्या सवयीमुळे साध्या खर्चाला ही उधळपट्टी मानणारी तिची सासू , गावाकडे राहणाऱ्या आणि तेवढ्याच साध्या स्वभावाचे मृदुलाचे आईवडील , सुरुवातीला उत्साह आणि उपभोग यांच्यात रमलेली परंतु काही अपघातांच्या मुळे विरक्ती कडे वळलेली मृदूलाची मैत्रीण अनिता , अतीलाडाने बिघडलेला मृदुलाचा मुलगा शिशिर आणि मृदुला च्या आयुष्यात वेळीच येऊन तिला सावरणारे तिचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. राव यांसारख्या कितीतरी परस्पर विरोधी पात्र , त्यांचे संवाद आणि त्यांची अवस्था वाचताना खरच आपण अंतर्मुख होऊन जातो. उत्तर कर्नाटक ते बेंगलोर पर्यंत बदलत्या कर्नाटकाच्या विविध छटांचे आरेखन , माणसाच्या आत चाललेल्या द्वंद्वाचे कथन , एकाच समाजात किंबहुना एकाच घरात राहणाऱ्या व्यक्तींच्या विविध मनोवृत्तीचे चित्रण आणि कुठेही अतिशयोक्ती वाटणार नाहीत अश्या प्रसंगांची मांडणी ही ह्या पुस्तकांची वैशिष्ट्ये मानायला हवीत. कथेचा शेवट जरी सुखांतिके कडे वळणारा असला तरीही हे पुस्तक ठिकठिकाणी आपल्या मनावर प्रभाव पडून जात. वाचताना ठिकठिकाणी आपल्याला दोन गोष्टींच्या मधली एकची निवड करायला भाग पाडत आणि शेवटी एक मोठा इम्पॅक्ट मनावर ठेऊन जात. आयुष्याबद्दल गंभीरपणे विचार करण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचायला हवं !

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2025
पृष्ठसंख्या
224
भाषा
मराठी
किंमत
260.00
ISBN
9788184985184
समुदायाने जोडले
बंद