मुखपृष्ठ
पर्व

माझे शेल्फ

पर्व

इंग्रजी शीर्षक
Parva
सारांश

#पर्व लेखक - डॉ. एस. एल. #भैरप्पा अनुवाद : उमा कुलकर्णी व्यास लिखित महाभारत म्हणजे एक अद्भुत महाकाव्य, जे काही हजार वर्षांपूर्वी लिहून ठेवलं. नंतरच्या कालखंडात त्यात आणखीही काही श्लोकांची भर पडली. या महाकाव्यातली पात्रं इतकी भव्य नि भारदस्त कि अदी देवत्वाला पोहोचलेली. हल्ली तर त्यातील केवळ एकाद-दुसऱ्या पात्रावरही महान महान लेखकांनी ग्रंथनिर्मिती केली. तर या उदात्त आणि देवत्वाला पोहोचलेल्या पात्रांना पुन्हा साधारण माणसं भैरप्पांनी पर्व मध्ये केली.व्यासरचित महाभारतातील आभाळाएवढ्या उंचीची पात्रे; परंतु सगळ्यांचे पाय मातीचे. अवघी जीवनमूल्ये कसोटीला लावणारे समरप्रसंग. संघर्ष. प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व वेगळे. प्रत्येकाच्या प्रेरणा वेगळ्या. प्रत्येकाचे प्राक्तनही वेगळे. त्याचबरोबर अनेक चमत्कार; दैवी शाप; दैवी वर. मानवी पातळीपेक्षा वेगळ्या पातळीवर जाणारे कथानक. कर्नाटकमधील अग्रगण्य कादंबरीकार तत्त्वचिंतक डॉ. एस.एल. भैरप्पा यांनी या चमत्कारांच्या, शापांच्या आणि वरदानांच्या भरभक्कम पडद्याआड लपलेल्या माणसांचा शोध घेतला. आधुनिक मानववंशशास्त्रीय, समाजशास्त्रीय, संकल्पनांच्या प्रकाशझोतात महाभारतातल्या व्यक्तिरेखांच्या वर्तनाची संगती लावली. त्यामुळेच पर्व ही महाभारताची एक विलक्षण प्रत्ययकारी अनुभूती देणारी कलाकृती ठरली. तशीच खळबळजनकही. त्या महाकादंबरीचा हा रसपूर्ण मराठी अनुवाद. सहजसुंदर.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद