मुखपृष्ठ
फुकट

माझे शेल्फ

फुकट

इंग्रजी शीर्षक
Phukat
सारांश

दर्जेदार विनोदी कथांचा संग्रह... मराठीतील विनोदी कथांचं दालन समृद्ध करणाऱ्या लेखकांमध्ये द.मा. मिरासदार हे नाव अग्रस्थानी आहे. फुकट’हा द.मा. मिरासदारांच्या रूपांतरित आणि स्वतंत्र कथांचा संग्रह. अर्थातच या संग्रहातील त्यांच्या स्वतंत्र विनोदी कथा ल्ष वेधून घेतात. ‘शिवाजी महाराजांची पत्रकारांशी बातचीत’, ‘टगेवाडी फेस्टिव्हल’, ‘मंत्र्यांवर ओढवलेला प्रसंग’ आणि ‘एका शोकसभेचा वृत्तांत’ या चार कथांतून मिरासदारांच्या विनोदी कथेच्या दालनातील अग्रस्थानाचा प्रत्यय येतो. काही पत्रकार रायगडावर गेलेले असताना त्यांची शिवाजी महाराजांशी भेट होते आणि पत्रकार व शिवाजी महाराज यांच्यात प्रश्नोत्तररूपी जो संवाद होतो, तो आपल्या खास मिरासदारी शैलीत द. मां. नी रंगवला आहे. त्या प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून द.मा. आजच्या राजकीय विसंगतींवर बोट ठेवतात. ‘टगेवाडी फेस्टिव्हल’मध्येही द.मां. नी राजकीय आणि सामाजिक विसंगतींवर बोट ठेवलं आहे. ‘पुणे फेस्टिव्हल’च्या धर्तीवर टगेवाडीत फेस्टिव्हल करायचं ठरतं. फेस्टिव्हलची तयारी कशी होते आणि प्रत्यक्षात फेस्टिव्हल कसा पार पडतो, याचं रंगतदार वर्णन द.मां. नी केलं आहे. ‘मंत्र्यांवर ओढवलेला प्रसंग’ ही त्याच वाटेवरची आणखी एक कथा. बाबूराव टोणग्यांचा गृहमंत्री पदापर्यंतचा प्रवास आणि गृहमंत्री झाल्यानंतर त्यांच्यावर ओढवलेला एक प्रसंग याचं खास मिरासदारी शैलीत द.मां.नी वर्णन केलं आहे. एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी टोणगेंची लाल दिव्याची गाडी थांबते. ड्रायव्हर खाली उतरतो आणि टोणगे ड्रायव्हरच्या नकळत लघुशंकेसाठी उतरतात. टोणगे गाडीत बसले आहेत, असं समजून ड्रायव्हर गाडी घेऊन निघून जातो आणि नंतर जी धमाल उडते ती प्रत्यक्ष कथेत वाचताना हसून हसून मुरकुंडी वळते. ‘एका शोकसभेचा वृत्तांत’ ही अशीच खळखळून हसवणारी कथा आहे. एका नगराध्यक्षाला श्रद्धांजली वाहण्यासाठी मंडळी जमतात आणि मग तिथे माणसं कशी वागतात आणि कसं भाषण करतात याची हकिगत द.मा. खुसखुशीत शैलीत वर्णन करतात. ही कथाही अर्थातच मुळातून वाचण्यासारखी. तेव्हा या चारही कथांचा मनसोक्त आस्वाद घेऊन हसण्यासाठी ‘फुकट’ हा कथासंग्रह वाचलाच पाहिजे. त्यातील स्वभावनिष्ठ आणि प्रसंगनिष्ठ विनोदाचा अनुभव घेतला पाहिजे. यातील रूपांतरित कथा आणि ‘नेम’ ही आबाच्या विठ्ठलभक्तीची थोडी गंभीर वळणाने जाणारी स्वतंत्र कथाही वाचनीय आहेत.

ते पाहून तिचे अंत:करण तीळ तीळ तुटते. पंधरा दिवसांसाठी आपल्या देशात राहायला गेलेली कल्याणी दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीच निराश मनाने आणि भरल्या अंत:करणाने परत येण्यासाठी निघते. या कादंबरीत लेखिकेने कल्याणीच्या भावजीवनाचे विविध छटांसह चित्रण केलेले आहे. हे भावविश्व त्या नायिकेपुरतेच मर्यादित राहात नाही तर मायभूमीपासून, मातीपासून तुटलेल्या माणसाचे ते प्रातिनिधक चित्रण बनते. मानवी भावभावानांचा जिवंत आणि ज्वलंत आविष्कार या कादंबरीचा गाभा आहे. सरळ, साध्या अंत:करणाला भिडणाऱ्या निवेदनामुळे या कादंबरीचा परिणामकारकता वाढते. आठवणीच्या रूपाने निवेदन तंत्र वापरल्याने कथानकात काही ठिकाणी अवरोध निर्माण झाल्यासारखे वाटते. लहान लहान उदाहरणांमधून लेखिकेने मानवी मनाच्या बदलांचे प्रभावी चित्रण केलेले आहे. लहान मुलांच्या मनावर हिंदू लोकांविषयी द्वेष कसा बिंबविला जातो. त्याचे अतिशय समर्पक उदाहरण लेखिकेने दिलेले आहे. काळ्या मुंग्या म्हणजे मुसलमान आणि तांबड्या मुंग्या म्हणजे हिंदू. काळ्या मुंग्यांना सोडून द्यायचे आणि तांबड्या मुंग्यांना मारायचे. या लहान मुलांच्या मुंग्या-मुंग्याच्या खेळाचे उदाहरण सूचकपणे आणि मार्मिकपणे दिलेले आहे. फाळणीमुळे केवळ भूप्रदेशच विभागला गेला नाही तर माणसा-माणसांची मनेही विभागली गेली आहेत, याचे विदारक चित्रण या कादंबरीत केलेले आहे. देश, प्रांत, प्रदेश येथील समानपणे बदलत जाणाऱ्या आणि वाह्यात बनत चाललेल्या तरुण पिढीसंबंधीचे वास्तव निरीक्षणही लेखिकेने स्पष्टपणे नोंदविलेले आहे. या कादंबरीतील नायिकेने उपस्थित केलेले, माणसांपेक्षा धर्म, देश, भाषा यालाच अधिक महत्त्व द्यावे का? माणूस धर्माचा गुलाम का बनतो? माणुसकीपासून दूर का जातो? यासारखे प्रश्न वाचकांना अस्वस्थ तर करतातच पण विचार करायलाही भाग पाडतात. उत्कट अनुभव आणि मानवतेला केंद्रस्थानी ठेवून घेतलेल्या बदलत्या वास्तवाचा वेध यामुळे या कादंबरीला कलात्मक उंची प्राप्त झालेली आहे. ही छोटीशी कादंबरी प्रांताच्या धर्माच्या, भाषेच्या आणि देशाच्या सीमा ओलांडून व्यापक मानवतेचा विचार करते म्हणूनच तिचे महत्त्व अनन्य साधारण आहे. या कादंबरीचा मृणालिनी गडकरी यांनी केलेला मराठी अनुवादही सहज ओषवत्या भाषेत आहे. हा अनुवाद लेखिकेच्या भूमिकेला, कथानकाला न्याय देणारा असाच झाला आहे.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद