माझे शेल्फ
रंगपंचमी
आपल्या अवतीभोवतीचेच जग आपल्या समोर उभे करणारे खुसखुशीत शैलीतील सहज लेखन. रंगपंचमी साजरी होते ती त्यातील माणसांच्या उत्साही सहभागामुळे, विविध रंगांच्या उधळणीमुळे. आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळी माणसे आपल्याला सामील होतात. आपल्या आयुष्याला बहरायला, फुलवायला, रंगीबेरंगी करायला ही माणसेच हातभार लावतात; प्रत्येकाचे रंग निराळे, मग हे रंग कधी शहाणपणाचे असतात, कधी वेडेपणाचे, कधी उत्साहाचे; तर कधी नैराश्याचे. वपुंची त्यांच्या आयुष्यातल्या छोट्याछोट्या प्रसंगांनी सजलेली ही ‘रंगपंचमी’कुठेतरी ‘आपल्याही आयुष्यात असं घडलं होतं बरं का’असं म्हणायला लावते. हसवते. खिन्नता आणते, विचारही करायला लावते.
त्याला आपल्याबद्दल वाटणारे कुतूहूल तिला जाणवते; आणि आपली ही कहाणी त्याला सांगते. ती कहाणी ऐकल्यावर आपल्यात व तिच्यात एक नवे नाते निर्माण झाले आहे, असे त्याला वाटते. पार्टीहून घरी पोहचल्यावर तो दार उघडतो. खोलीत काळोख नसतो. संबंध खोली निळ्याजांभळ्या रंगांनी झगमगत आहे, असे त्याला दिसते. मतकरी यांनी या कथेला शेवटी दिलेले हे वळण त्यांच्या गूढकथाकारांच्या प्रतिभेची खरी कमाल दाखवते. त्या तरुणीने रंगनाथच्या डोळ्यांना आपल्या डोळ्यातून बघण्यास मज्जाव केला खरा, पण तिच्याच माध्यमातून नवपरिचित तरुणाच्या डोळ्यांचा ताबा घेऊन रंगनाथ आपले अस्तित्व सिद्ध करायला सज्ज झाला होता! रत्नाकर मतकरी यांच्या अत्यंत नावजलेल्या गूढकथामंध्ये ‘रंगांधळा’ गणली जाते. तिची केंद्रीभूत कल्पना खरोखरच नावीन्यपूर्ण आणि चमत्कृतीपूर्ण आहे. वाचकांना शेवटी आणखी एक धक्का देणारी मतकरींचा मास्टर स्ट्रोक या कथेची परिणामकारकता वाढतो. रंगांशी निगडित असणाऱ्या परिचित संवेदनेला मतकरींनी उलटेपालटे करून, ‘रंगाच्या अभावाऐवजी रंगांच्या अतिरंजित जाणिवेचे परिणाम दिले आहे; त्यामुळे चित्रकाराच्या चित्रांवर पडलल्या प्रभावाचे स्वरूपही दाखवले आहे. रंगाचा हा मुक्तसंचार बघणारे रंगनाथचे डोळे, ते त्याच्या मृत्यूनेही बंद होत नाहीत. अतृप्त आत्म्याने आपल्या इच्छेच्या पूर्ततेसाठी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीस संचार करावा त्याप्रमाणे रंगनाथचे हे डोळे त्या तरुणीच्या डोळ्यांचा उपयोग करू पाहतात; तिने ते डोळे निकामी करून घेतल्यावर तिच्यात रस घेणाऱ्या अन्य तरुणाचा ताबा ते घेऊन टाकतात. असा आपल्या पारंपारिक कल्पनेचा वेगळा अविष्कार या कथेत दिसतो. चित्रकाराला दिसणाऱ्या रंगांच्या अचाट वैभवाची चुणूक रंगनाथच्या संवदेनक्षमतेद्वारे मतकरी लक्षात आणून देतात. एखादी कल्पना चौफेर फुलवण्याची,निसर्ग-व्यक्तीरेखा कलाविशेष- भावाविष्कार- भाषविशेष अशा विविध घटकांचे एकजीव रसायन साधण्याची मतकरींची करामत वाचकांना मंत्रमुग्ध करण्यात यशस्वी ठरतो. तिच्या अंधत्वाची कल्पना असूनही तो जेव्हा तिच्याजवळ जातो तेव्हा ती त्याला विचारते, ‘तुम्ही कधी कुणावर प्रेम केलंय? नसेल तर नको करू. प्रेमात माणूस फसतं. इतकी सुंदर वाटणारी आणि इतकी डेड्ली गोष्ट जगात दुसरी नसेल. नाही आणखी एक गोष्ट जगात आहे. रंग.. कथा वस्तूत रंग भरायलाही अशी विधाने केली जातात असे वाचकाला वाटते, पण या रंगांचे वेगळे जे अस्तित्व नंतर जाणवते त्यामुळे अशा विधानातले खरे रहस्य पुढे लक्षात येते....‘आयरनी’चे दैवदुर्विलासाचे हे प्रलयकारी दर्शन असते. या संग्रहातील ती दोन मुलं, चिखल, पुलावरचा माणूस, झुंबर कथांमध्येही अशाच कल्पना वापरलेल्या आहेत. उत्कंठावर्धक निवेदनशैलीमुळे आणि थरारक कथा कल्पनांमुळे या गूढकथा वाचकांना गुंतवून ठेवतात.