माझे शेल्फ
साहित्यिकाचा गाव
अस्वस्थ ग्रामीण चित्रण... समकालीन मराठी साहित्यिकांमध्ये डॉ. आनंद यादव हे एक महत्त्वाचं नाव आहे. ग्रामीण साहित्य हा वाङ्मय प्रकार मराठी साहित्याला नवा आहे, असे नव्हे. पण मराठीतले बहुतेक ग्रामीण कथाकार हे बालपणी खेड्यात, गावात राहिलेले होते. त्यांचे ्रामीण कथाविश्व हे त्यांच्या त्यावेळच्या अनुभवांवर, आठवणींवर आधारलेले म्हणजेच स्मरणरंजनात्मक असे होते. त्यात फक्त भूतकाळ होता. वर्तमानकाळ किंवा अगदी नजिकच्या भूतकाळातील ग्रामीण जीवनाचा त्यांना काही परिचयच नव्हता. कारण शिक्षण, नोकरी, व्यवसाय यासाठी ते जे एकदा शहरात आले, ते कायमचे शहरवासीच झाले. नोकरी व्यवसाय करताकरता ते कथा लिहू लागले. साहित्यिक म्हणून प्रतिष्ठित झाले. परंतु त्यांची ग्रामीण कथा वर्तमानात आलीच नाही. मधल्या कालखंडात देशाच्या, महाराष्ट्राच्या समाजजीवनात फार मोठी स्थित्यंतरं घडली. देश स्वतंत्र झाला, संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला. परकी सत्ता आणि सरंजामदारी समाजव्यवस्था बदलून लोकशाही अवतरली. विविध सरकारी योजना, विकास कार्ये, शेतीच्या तंत्रातले बदल, कारखानदारी यांचे बरे नि वाईट परिणाम ग्रामीण जीवनावरही होऊ लागले. त्या जुन्या प्रतिष्ठित ग्रामीण कथाकारांच्या कथांमध्ये हा बदलता महाराष्ट्र कुठेच दिसेना. कारण त्यांच्या भावविश्वात तो नव्हताच मुळी. त्यांचा ग्रामीण जीवनाशी असलेला संबंध, सुट्टीत गावात जाऊन चार दिवस मौजमजा करण्यापुरताच उरला होता. ही कोंडी फोडून मराठी ग्रामीण कथेत वर्तमानकाळ आणण्याचे काम करणाऱ्या मोजक्या साहित्यिकांमध्ये डॉ. आनंद यादवांचे स्थान अव्वल आहे. यादवही तसे आता शहरवासीच बनलेले आहेत. पण त्यांची ग्रामजीवनाची नाळ अजिबात तुटलेली नाही. उलट अभिजात मराठी साहित्य नि अभिजात इंग्रजी साहित्य यांच्या अध्ययनातून त्यांच्या साहित्यिक जाणिवांची मुळे ग्रामीण मातीत अधिकच घट्टपणे रुजलेली दिसतात. विविध ग्रामीण साहित्यिकांच्या कथांमधून वाचकांच्या डोळ्यासमोर ग्रामीण जीवनाची काही ठराविक चित्रे निर्माण झालेली आहेत. दारिद्र्य, अवकळा, दुष्काळ, लाचारी, वतनदार मंडळींचा मुजोरपणा, लंपटपणा, सण, उत्सव, जत्रा, तमाशे, फरशा, कुऱ्हाडी, दरोडे, हिरवाकंच निसर्ग, प्राणीजीवन, पक्षीजीवन, शिकारी, सुगीच वर्णनं इत्यादी चित्रे आता ठरीव साच्याची बनून गेली आहेत. यादवांच्या कथा-कादंबऱ्यांमध्ये ही चित्रे नसतातच असे नाही; ती असतातच; पण त्यापेक्षाही वेगळे असे काही असते, जे वाचकाला आजच्या ग्रामजीवनाचं नेमकं भान आणून देते. याचे कारण असे की, यादवच ग्रामीण जीवनाकडे नुसते कथालेखनाचा कच्चा माल म्हणून बघत नाहीत. त्यांच्या चिंतनात समग्र समाज, साहित्य आणि मराठी संस्कृती यांचे जे ताणेबाणे विणले जात असतात, तेच शब्दरूपाने कागदावर उतरतात आणि म्हणूनच ते वाचकाच्या मनाला कुठेतरी जाऊन भिडतात. प्रस्तुत ‘साहित्यिकाचा गाव’ हा डॉ. यादवांचा नवा कथासंग्रह रूढार्थाने ग्रामीण कथांचा संग्रह नाही. किंबहुंना यातल्या कथा या कथाही नव्हेत. कथेच्या बाजाने लिहिलेल्या चिंतनात्मक ललित लेखांचा हा संग्रह आहे. माणूस आधुनिक बनला आहे. विज्ञानयुगाने त्याला सर्व सुखसोयी दिल्या आहेत. अगदी खेड्यापाड्यात डांबरी रस्ते सुगीची वर्णनं इत्यादी चित्रे आता ठरवी साच्याची बनून गेली आहेत. यादवांच्या कथा-कादंबऱ्यांमध्ये ही चित्रे नसतातच असे नाही; ती असतातच; पण त्यापेक्षाही वेगळे असे काही असते, जे वाचकाला आजच्या ग्रामजीवनाचं नेमकं भान आणून देते. याचे कारण असे की, यादव ग्रामीण जीवनाकडे नुसते कथालेखनाचा कच्चा माल म्हणून बघत नाहीत. त्यांच्या चिंतनात समग्र समाज, साहित्य आणि मराठी संस्कृती यांचे जे ताणेबाणे विणले जात असतात, तेच शब्दरूपाने कागदावर उतरतात आणि म्हणूनच ते वाचकाच्या मनाला कुठेतरी जाऊन भिडतात. प्रस्तुत ‘साहित्यिकाचा गाव’ हा डॉ. यादवांचा नाव कथासंग्रह रूढार्थाने ग्रामीण कथांचा संग्रह नाही. किंबहुंना यातल्या कथा या कथाही नव्हेत. कथेच्या बाजाने लिहिलेल्या चिंतनात्मक ललित लेखांचा हा संग्रह आहे. माणूस आधुनिक बनला आहे. विज्ञानयुगाने त्याला सर्व सुखसोयी दिल्या आहेत. अगदी खेड्यापाड्यांत डांबरी रस्ते नि वीज पोहोचली आहे. धरणं नि कालव्याच्या पाण्याने ग्रामीण भागातही भौतिक समृद्ध पोहोचली आहे.सध्या यालाच विकास असे म्हणतात. पण हा विकास होत असताना काही चांगले हरवत चालले आहे. माणूस कृत्रिम, पोषाखी आणि आळशी बनतो आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनातला हा ‘विकास’ लेखकाला अस्वस्थ करतो, ती अस्वस्थता आक्रस्ताळी, राणाभीमदेवी थाटाच्या भाषणांमधून मांडण्याऐवजी लेखक कथेच्या अंगाने इथे मांडतो आहे. एकंदरीत लेखसंग्रह वाचनीय, अस्वस्थ करणारा, ज्याला प्रत्यक्ष काम करायचंय त्याला प्रेरणा देणारा असा आहे. निर्मिती, कोल्हापूर यांनी तयार केलेले मुखपृष्ठ अत्यंत आकर्षक. मेहता प्रकाशनाची निर्मिती सुबक.