मुखपृष्ठ
सखी

माझे शेल्फ

सखी

इंग्रजी शीर्षक
Sakhi
सारांश

व.पुं. च लिखाण काल्पनीक अजीबात वाटत नाहि.त्यांच्या कथांची पाञ आपल्या आजुबाजुलाच असतात.किंबहुना वाचक बर्याचदा स्व:तालाच वपुंच्या लेखणीतुन अनुभवत असतो..!वपु आपलेसे का वाटतात? कारण त्यांच्या कथांमधील पात्र आपल्या आजूबाजूचीच असतात. त्यामधील घटना देखील आपल्या डोळ्यादेखत घडत असतात. पण आपला आणि वपु चा त्या गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगवेगळा आहे. आजूबाजूच्या लहान माणसातील मोठेपणा, आणि मोठयामाणसाती लहानपणा वपु खूप मार्मिकपणे दाखवतात. जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायचं मला वपु नी शिकवलं. मनस्तिती कोणतीही असो, वपु च्या कथा वाचताना हलकं हलकं वाटत.सखी पासून झकासराव पर्यंत नऊ कथांद्वारे वाचकांना निर्मळ आनंद देणारा वपुंचा हा कथासंग्रह. ह्यात केवळ हा आनंदच मिळतो असे नाही तर जीवनाकडे कोणत्या दृष्टीने बघावे आणि आला क्षण कसा सुखद करावा ह्याचीही नकळत शिकवण मिळते. खुद्द लेखकाची अशी एक स्वच्छ दृष्टीआहे आणि हा दृष्टिकोन सहजगत्या मांडण्याचे कसब त्यांना साधले आहे म्हणून लेखकाची सखी वाचकाचीही सखी` होऊन जाते. तसे झाल्याने लेखकाला दुस्वास वाटणे शक्यच नाही कारण तसे व्हावे म्हणून तर त्याने हा लेखनप्रपंच केला असावा ! नव्हे केलाआहेच ! वपुंचे एक वाक्य आहे - "सावली देऊ शकणार्या वटवृक्षानं विश्रांतीला आलेल्या पांथस्थाला बाकीची झाडं सोडून तुला नेमका मीच सापडलो का, असं विचारायचं नसतं !

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
180
भाषा
मराठी
किंमत
120.00
समुदायाने जोडले
बंद