मुखपृष्ठ
संभाजी

माझे शेल्फ

संभाजी

इंग्रजी शीर्षक
Sambhaji
सारांश

पानिपतकार विश्वास पाटील यांची एक अप्रतिम कादंबरी. जवळ पास साडे आठशे पानांची ही कादंबरी सुरुवातीपासून खिळवून ठेवते. शिवाजी महाराजांच्या हत्येसाठी रचलेल्या कटाची खबर घेऊन गोदू रायगडा वर येते आणी संभाजी महाराजांच्या मदतीने कट उधळून टाकते यापासून कादंबरी ची सुरुवात होते. संभाजी महाराज आणी अष्ट प्रधान यांच्या मधली दरी हळूहळू वाढत जाते. संभाजी महाराजांचा एकाकी लढा, अष्टप्रधानांच्या कागाळ्या यांचे उत्कृष्ट चित्रण पानिपतकारांनी उभे केलेले आहे. औरंगजेबाची अजस्त्र पाच लाख फौज, पातशाहाचा जामानिमा, सरदार, दरकदार, जनानखाना, तोफा, बारूद यांचे वर्णन विश्वास पाटीलांनी फार बारकाईने केले आहे. संभाजी महाराजांची मनातली घुसमट, त्यांचे कवीमन, कवी कलशांची दोस्ती, सिद्धी बरोबरचा जंजिऱ्याचा लढा, दक्षिणेकडची घोडदौड,पोर्तुगीजांना शिकवलेला धडा यांचे ओघवते वर्णन कादंबरीत गुंतवून ठेवते. पातशहा चे आठ वर्षांच्या महाराष्ट्रातील लढ्यानंतरचे अपयश आणि नैराष्य, मराठ्यांचा कडवा प्रतीकार अधोरेखीत करते. पातशहाचे क्रौर्य, संभाजी महाराज आणी कवी कलशांचे केलेले अपरीमित आणी अमानुष हाल डोळ्यात पाणी आणते.संभाजी महाराजांचा पराक्रम, त्यांचे पूर्ण चरित्र विश्वास पाटील खुपच सुंदर चितारतात. जरूर जरूर वाचावी आणी संग्रहीत असावी अशी कादंबरी...

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2008
पृष्ठसंख्या
498
भाषा
मराठी
किंमत
480.00
ISBN
9788177667288
समुदायाने जोडले
बंद