मुखपृष्ठ
माझे शेल्फ
संभ्रमाच्या लाटा
इंग्रजी शीर्षक
Sambhramachya Laata
सारांश
काळोखातून आपल्याच दु:खाची वात चालत नंदिता स्मशानभूमीत येऊन पोहोचलेली. लांबवर एक चिता जळत असलेली. तीच अंधुक उजेड सगळीकडे पसरलेला.तोही मधूनमधून कमीजास्त होत असलेला. धाप लागल्यासारखा. इथेचइथेच तो आला! सैरभैर ती त्याला शोधते. हे सगळे हरवलेल्यांचे जग? इथे कोण कुठे, अग्नीचे पांघरूण लपेटून चिरनिद्रा घेता घेता नाहीसे झाले, ते कसे कळणार? पण नाहीसे झाले म्हणजे सर्वत्र पसरले... पंचमहाभूतात विलीन होता येईल का? का नाही येणार? ... समोर पसरलेले हे पात्र... काळोखाचे रहस्य उघडणारे हे दार... मी या दारातून आत गेले, तर काळोखात मिसळलेल्या नंदनशी माझी भेट होईल...? रत्नाकर मतकरी यांच्या विलक्षण वर्णनशैलीने नटलेल्या, वास्तव आणि त्यापलीकडचेवास्तव, यांच्यातील धूसर सीमारेषेवरच्या गूढकथांचा हा संग्रह.
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2021
पृष्ठसंख्या
134
भाषा
मराठी
किंमत
110.00
ISBN
9788177669480
समुदायाने जोडले
बंद