मुखपृष्ठ
संस्कृति जर्मन भाषिकांची

माझे शेल्फ

संस्कृति जर्मन भाषिकांची

सारांश

" सम्राट शार्लमान्य (Charlemagne) हा जर्मन भाषिक राष्ट्रांचा राष्ट्रपिता. ह्याच्या नावावरून माक्स म्युॅलरनं बनवलेला ‘शार्मण्य’ हा शब्द आपल्याकडे विद्वानांनी स्वीकारला.
इन्डॉलॉजीच्या निमित्तानं जर्मन भाषिक देशांशी भारताचा, विशेषत: महाराष्ट्राचा बर्‍यापैकी सम्बन्ध आला, पण जर्मनांच्या इन्डॉलॉजीचं कौतुक झालं तरी गेर्मानिस्टिककडे म्हणजे जर्मनांच्या संस्कृतीकडे आपण बर्‍यापैकी दुर्लक्ष केलेलं दिसतं !
आज जग पुन: एकदा अधिक जवळ यायला लागलं आहे, नव्या कारणांनी जा-ये खूपच वाढली आहे. अशा परिस्थितीत जर्मन भाषिक देशांमध्ये नोकरी-व्यवसाय-उद्योगांच्या निमित्तानं जाणार्‍याला तिथल्यांच्या संस्कृतीबद्दल माहिती असणं महत्त्वाचं आहे. आपल्याला ज्यांच्याशी व्यवहार करायचा आहे ती माणसं आहेत तरी कशी हे कळणं केवळ बौद्धिक समाधान देणारं नाही तर व्यावहारिक फायद्याचंही ठरणार आहे !"

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2006
पृष्ठसंख्या
152
भाषा
मराठी
किंमत
125.00
ISBN
8189724487
समुदायाने जोडले
बंद