माझे शेल्फ
सर्पाचा सूड
सुधा मूर्ती, ह्यांचे हे १७५ पानांचे पुस्तक म्हणजे जणू संपूर्ण महाभारताचा सारांश म्हटला तरी अतिशोयक्ती ठरणार नाही. महाभारत सुरू होण्या पूर्वची पार्श्वभूमी, महाभारत मधील घटना आणि महाभारत समाप्ती नंतर घडलेल्या घटनाक्रम याच्याशी निगडित बरयाच लहान लहानगोष्टी ह्या पुस्तकामध्ये दिल्या गेल्या आहेत. विविध घटना कश्या प्रकारे निर्माण झाल्या, त्यामागील पार्श्वभूमी, वरदान, शाप त्यांचे परिणाम, विविध महानुभवांनी घेतलेले निर्णय आणि त्यांचे बरे वाईट परिणाम अश्या सर्व विषयांवर ह्या पुस्तका मध्ये गोष्ट स्वरूपात माहिती दिली गेली आहे. ह्या पुस्तकाचे एक वैशिष्ट्य म्हणजे, हे पुस्तक लहान मुलं उत्साहाने गोष्टी स्वरूपात वाचू शकतील आणि प्रौढ माणसं हे पुस्तक वाचून महाभारत मधील घनाक्रम आणि इतर बरीच माहिती समजून घेऊ शकतील.अर्जुनाची एकूण नावे किती? यमाला शाप का मिळाला? लहानशा मुंगसाने युधिष्ठिराला कोणता धडा शिकविला? महाभारतामध्ये कुरुक्षेत्री जे घनघोर युद्ध झालं, त्यात अखेर देवदेवतांनासुद्धा कोणत्या ना कोणत्या पक्षाची बाजू घेणं भाग पडलं. युद्धाविषयी तर पुष्कळमाहिती सर्वत्र उपलब्ध आहे; परंतु या युद्धाच्या आधी, युद्धाच्या दरम्यान किंवा युद्धाच्या नंतर असंख्य कथा घडल्या आहेत. या कथांमुळेच महाभारताला रंग भरतो. या कथासंग्रहांमधून अनेक पुरस्कार प्राप्त केलेल्या लेखिका सुधा मूर्ती भारताच्या या महाकाव्याचं विस्मयकारी जग वाचकांपुढे खुलं करतात. या संग्रहाद्वारे त्यांनी सांगितलेल्या गोष्टी सर्वश्रुत नसल्यामुळेच त्यांचं हे वेगळेपण वाचकाला मंत्रमुग्ध करतं.