मुखपृष्ठ
स्वर

माझे शेल्फ

स्वर

इंग्रजी शीर्षक
Swar
सारांश

मध्यमवर्गीय जीवनातील समस्यांचे वैशिष्ट्यपूर्ण आकलन... लोकप्रिय कथाकार वपु काळे अतिशय सहजतेनं चपखल उदाहरणांद्वारे आयुष्यातील गुंतागुंत सोपी करण्याचा नेमका धागा वाचकांच्या हाती सोपवतात. त्यांच्या प्रत्येक कथेत चिंतनाचे सूर उमटत राहतात आणि त्या चिंतनाचया सुरांनी अर्थांची वेगवेगळी वलये मनात फेर धरू लागतात. मुळात अत्यंत खुमासदार घटना; चमत्कृतिपूर्ण प्रसंग व व्यक्ती; आणि त्यांच्या अनपेक्षित वर्तनामुळे उडणारा गोंधळ... पण तो वपु आपल्या खास कथाकथनतंत्रशैलीने कमालीचा उत्कंठापूर्ण बनवतात. त्यामुळे त्यांच्या कथेचा शेवट एकतर ध्यानीमनी नसलेली कलाटणी देऊन होतो किंवा आसमंत लख्खकन चकाकून सोडणारे जीवनविषयक तत्त्वज्ञान किंवा सत्य सांगून होतो. जीवनविषयक प्रसन्न, आशावादी व उदार जाणीव ही त्यांच्या प्रत्येक कथेला एक वेगळीच उंची देऊन जाते. ‘स्वर’ या कथासंग्रहाच्या शेवटच्या पृष्ठावर हा आशय व्यक्त करणारा ‘ब्लर्ब’ दिला आहे; तो यथोचितच आहे. वपुंच्या कथचे मर्म प्रकट करणारा आहे. ‘स्वर’ मध्ये एकूण पंधरा कथा आहेत. ठुमरी, सोळा जानेवारी, स्वर, सत्कार, धर्म, किक्, पराभव, जिद्द, दुर्वास, भाऊचा धक्का, पहिली खेप, वसावसाचा वसा, मोले घातले बोलाया, मला समजतंय, आणि ‘मी, माझी सौ व तिचा प्रियकर’, ठुमरी ही गोष्ट वीस पृष्ठांची आहे. बाकीच्या सहा ते पंधरा पृष्ठांच्या.मुळात कथा अतिशय खुमासदार; सहसा कुणाच्या ध्यानीमनी न येणाया क्षणांच्या, घटनांच्या झालेल्या. त्याची अभिव्यक्ती असते वपुंच्या खास मिस्कील शैलीत! त्यांच्या लेखनातील जीवनविषयक प्रसन्न, उदार, आशावादी दृष्टिकोनामुळे त्यांची प्रत्येक कथा वाचकाचं मन जिंकून घेते. ‘स्वर’मधील कथाही वाचून संपल्या तरी मनात दीर्घकाळ रेंगाळत राहतील...

कारण पाण्याचा फवारा पडत नाही आणि तांब्या उलटा केला तर पाणीही पडत नाही. ओल्या सुगंधी टॉवेलने अंग पुसणे हीच अंघोळ सर्वांत कठीण काम म्हणजे मलमूत्र विसर्जन. ती एक कसरतच असते. कारण गुरुत्वाकर्षण नसल्याने काहीही खाली पडत नाही. द्रव पदार्थ स्ट्रॉने ओढून प्यावे लागतात. नियोजित वेळेआधी ६१ मिनिटे कल्पनाने कोलंबियाचा ताशी २८,००० कि.मी. असलेला वेग कमी केला. परतीच्या प्रवासाला सुरुवात झाल्याचा संदेश पृथ्वीवरील नासाच्या नियंत्रण कक्षाला पोचला गती कमी करताना त्याची दिशा बदलून पृथ्वीपासूनची उंची कमी करण्यात आली. तेव्हा साधारण ऑस्ट्रेलियावर कुठेतरी ‘कोलंबिया’ने वातावरण प्रवेश केला. नियोजन वेळेआधी फक्त १६ मिनिटे कोलंबियाचा आणि कक्षाचा संपर्क तुटला. तेव्हा कोलंबिया जमिनीपासून सुमारे ६० कि.मी. अंतरावर होते. लुझियानातील लोकांना स्फोट झाल्याचा मोठा आवाज ऐकू आला आणि श्वास रोखून नियंत्रण कक्षात बसलेल्या नासाच्या वरिष्ठ तंत्रज्ञानां ‘कोलंबिया’ जळून नष्ट झाल्याची बातमी जाहीर करावी लागली.कल्पना जीवनाला पारखी झाली. भारतभेटीचे स्वप्न स्वप्नच राहिले. ‘मरावे परी किर्ती रूपी उरावे’ कल्पनाच्या मृत्यूने हे शब्द खरे करून दाखविले. भव्य यश मिळवून ती परत आली असती तर...! कल्पना चावलाचे आयुष्य, तिची धडपड, चिकाटी व तिचा प्रयत्नवाद लेखिकेने उत्कटपणे मांडला आहे. समाजाला विज्ञानभिमुख करण्यासाठी कल्पना चावला ही प्रवृत्ती नव्यापिढी समोर ठेवण्याचा लेखिकेचा प्रयत्न स्तुत्य वाटतो.

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
158
भाषा
मराठी
किंमत
100.00
समुदायाने जोडले
बंद