माझे शेल्फ

स्वर्गाच्या वाटेवर काहीतरी घडलं

इंग्रजी शीर्षक
Swargachya Vatevar Kahitari Ghadala
सारांश

प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांच्या अनुभवसंपन्न संपादक दृष्टीतून निवडल्या गेलेल्या या सत्यकथा आहेत. लीना सोहोनी यांनी या कथांचा अनुवाद केला आहे. या कथासंग्रहातून आपापल्या गोष्टी वाचकांसाठी घेऊन आलेले हे सगळे लेखक तरुण पिढीवरचा विश्वास नक्कीच दृढ करतात. जे सत्य आहे, ते तसंच्या तसं कथन करण्यासाठी जे धाडस लागतं, ते त्यांनी केलं आहे.पहिलीच "स्वीकार" नावाची कौटुंबिक कथा जी चेन्नईस्थित भास्कर मुखर्जी यांची आहे ती वाचायला सुरवात करतानाच आपल्याच घरातील वाटू लागते .. घरोघरी जे चित्र दिसतं ते लेखकानी सफाईदाररित्या रेखाटलं आहे .. ह्या कथेमधला नायक अशोक हा वर्तमानपत्र वाचत असताना एका वेगळ्याच विषयावरची बातमी त्याच्या नजरेत येते की समाजातल्या तृतीयपंथींनाही मानानी सन्मानानी जगण्याचा हक्क मिळाला पाहिजे .. माणूस म्हणून त्यांना देखील सर्व हक्क समानतेनी मिळाले पाहिजेत .. अशोकची पत्नी रमा तिची कामवाली काम सोडून गेल्यामुळे अतिशय त्रासलेली असते .. घरातली सगळी कामं ऊरकणं .. स्वत:च्या ऑफिसमधून सुट्टी मिळणे अशक्य असणं आणि काही दिवसांसाठी आलेल्या आपल्या सासूवर कामांचा भार टाकायची रमाची इच्छा नसणं ह्या सगळ्यां समस्यांमधून कसा मार्ग काढावा याबद्दल रमा तिच्या पतीशी चर्चा करत असते .. शिवाय त्यांच्या तीन वर्षाच्या छोट्या विजयला सांभाळण्यासाठीही त्यांना घरात बाईची गरज असते .. आणि त्याचवेळी त्यांच्या दारात अचानक अनपेक्षितपणे एक तृतीयपंथी व्यक्ति येऊन ऊभी ठाकते .. तिला बघून आधी घाबरून गेलेली रमा मनातून माणुसकीच्या दृष्टीनी तृतीयपंथींबद्दल विचार करत असते .. ती व्यक्ति खरं तर कामाच्या शोधातच आलेली असते पण अशा कुणाला आपल्या घरात कामासाठी ठेवायला अशोक आणि त्याची आई अजिबातच तयार नसतात .. रमाचा तसा विचार चालालय हे बघून तिची सासू तिच्यावर खेकसते .. अशोक आपल्या पत्नीची समजूत घालू बघतो पण नंतर कथेच्या ऊत्तरार्धात असा काही प्रसंग घडला की अशोकच्या मनाचा कायापालट होतो आणि तो स्वत:हून त्याच तृतीयपंथीला घरात कामासाठी ठेवण्यासाठी आनंदात तयार होतो .. हा मधला थरारक प्रसंग कथेत खूप सुरेख हाताळला गेला आहे .. रमाच्या लहान मुलाच्या बाबतीत काही क्षणांत घडलेला प्रसंग वाचताना समोर टीव्हीवर चालू असलेल्या चित्रपटातला एखादं दृश्य आपण बघतोय .. असंच वाटतं दुसरी कथा "लाल गुलाब" सौरभ कुमार यांची आहे .. त्यात त्यांनी आजोबांचे नातवडांवर असलेले ऊत्कट प्रेम अनेक घटनांद्वारे सुंदर दाखवले आहे .. कडक शिस्तिच्या आणि मुलांना वळण लावणा-या आजोबांबद्दल वाचताना भान हरपून जातं .. नातवालाही आपल्या आजोबांच्याप्रती असलेला अत्यंत आदर पाहून त्याचं कौतुक वाजल्यावाचून राहवत नाही आजोबांच्या समजूतदार व प्रेमळ स्वभावाच्या अगदी ऊलट स्वभावाच्या असलेल्या आपल्या आजीबद्दल देखील लेखकानी छान लिहिलं आहे .. कधीच समाधानी नसलेल्या, कुककुरी चिडचिडी वृत्तीच्या आजीला तिनी स्वत: निगा राखून फुलवलेली तिची बाग जीव की प्राण होती .. बागेचं सुंदर वर्णन वाचताना ती बाग डोळयासमोर ऊभी राहते .. आजीनी लावलेल्या त-हेत-हेच्या गुलांबाच्या रोपांवरची फुले व इतर फुले लेखकाला नेहमीच भुरळ घालत असत .. आजीचा डोळा चूकवून ती फुले तोडून आपल्या घरी नेण्यासाठी केलेल्या वाह्यातपणामुळे अनेकदा त्यानी आजीचा मार खाल्ला हे वाचून नक्कीच गंमत वाटली .. लेखक पुढे असंही म्हणतो की आजीच्या असंख्य झाडांवरच्या फुलांपैकी त्याला लाल गुलाबाचे प्रचंड वेड होते .. तो लाल गुलाब मिळवण्यासाठी त्याची अधिकच धडपड चाले पण त्यासाठी त्याला आजीच्या रागाला सामोरं जावं लागे आजीआजोबांचं घर सुरवातीला लेखकाच्या घरापासून लांब होतं .. पण नंतर आजोबांना "अल्झायमर" नावाचा आजार झाला, हळूहळू तो वाढला .. दुर्दैवानी ह्या आजारावर औषध नसल्यामुळे आणि अनेकदा आजोबांच्या ह्या आजारानी हिंस्त्र रूप धारण करून कठीण प्रसंग वरचेवर घडू लागल्यामुळे आजोबाआजींना लेखकाच्या घरातच वरती राहायला आणले गेले .. अर्थातच जिद्दी हट्टी स्वभावाची आजी तिचं राहतं घर आणि त्याहीपेक्षा त्याची प्राणप्रिय बाग सोडून जायला तयार नव्हतीच .. पण लेखकाच्या घरच्यांनी तिला त्यासाठी तयार केले .. इथेही आजोबांच्या आजारामुळे घडलेले विचित्र प्रसंग वाचताना आपण कथेशी एकरूप होऊन जातो .. कधी कधी आजोबा अचानक काही वेळासाठी त्यांचं सगळयांशी असलेलं नातंच विसरतात व त्यामुळे घरात त्रेधातिरपीट ऊडते .. अशाच एका दिवशी आजोबांच्या गफलतीमुळे लेखकाला प्रचंड त्रास सहन करावा लागला पण काही वेळानंतर ते आपोआप कसे पूर्ववत झाले .. हे सांगताना लेखक हेलावून गेला ह्या पुस्तकातील इतरही कथा खूप सुंदर आहेत .. पुस्तक अतिशय वाचनीय आहे.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी