माझे शेल्फ
ताण
"सध्या जगभर लोक अनेक प्रकारचे ताणतणाव अनुभवत आहेत. त्याची अनेक कारणे आहेत - कामधंद्यात येणार्या अडचणी, काळज्या, वैवाहिक आयुष्यातील किंवा कौटुंबिक ताण, बदलती सामाजिक मूल्ये, वगैरे. हे सर्व ताण प्रकृती खालावत जाण्यास कारणीभूत होतात. विशेषत: जीवनपद्धतीतील बदलामुळे मधुमेह आणि गंभीर हृदयरोगाचे प्रमाण वाढत आहे.
लेखकाने ताणतणावाच्या संकल्पनेचा लक्षवेधी व परिपूर्ण दृष्टिकोनातून विचार मांडला असून ताणाचा शरीरावर होणारा परिणाम आणि शरीराची त्यावर होणारी प्रतिक्रिया व त्याची होणारी निष्पत्ती याचा वेध घेतला आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या ताणांचे व्यवस्थापन करण्यासाठी कोणती योग्य तंत्रे वापरावीत व आरोग्य कसे सुधारावे याचे मार्गदर्शन केलेले आहे.
ओघवत्या भाषेत लिहिलेल्या या पुस्तकात विविध विषय सविस्तरपणे हाताळले आहेत.
व्यक्तिमत्त्वाचे प्रकार व स्वभाव
ताण आणि प्रजोत्पादन
रोगप्रतिकारशक्ती
खिन्नता
स्मरणशक्ती आणि ताण
वृद्ध होण्याची प्रक्रिया
गंभीर मानसिक ताण
मधुमेह
हृदयरोग
या पुस्तकात, आपल्या आरोग्यावर का आणि कशाप्रकारे ताणतणावांचा परिणाम होतो याचे सविस्तर विवेचन असून त्याचे व्यवस्थापन कसे करावे हेही सविस्तरपणे सांगितले आहे. व्यावसायिक आणि सामान्य वाचकाला हे पुस्तक भावेल.
"