मुखपृष्ठ
टारफुला

माझे शेल्फ

टारफुला

इंग्रजी शीर्षक
Tarphula
सारांश

टारफुला ......ग्रामीण कथालेखक शंकर पाटील यांचं टारफुला पुस्तक वाचण्यात आलं.या पुस्तकात स्वातंत्र्य पूर्वीच्या व काही स्वातंत्र्य उत्तर काळात महाराष्ट्रात असलेल्या खेडे गावाची परिस्थिती वर्णन आपल्याला दिसून येते.यात वर्णन केलेल्या खेड हे महारष्ट्र-कर्नाटक सीमेवरील आहे. सुरुवातीला या गावात सुभानराव पाटील या नावाच्या गाव पाटलांचा खूप वचक असतो आणि त्याच्याच वचकांमुळेच गावात चोरीमारी खून दरोडा या गोष्टी कमी होत असतात आणि गाव व्यवस्थित नांदत असतं...पण त्याच्या अचानक मृत्यू गावात कसं गावगुंडांचा हैदोस वाढतो.म्हणतात ना.... वाघाच्या मेल्यानंतर, कोल्ही सुद्धा वाघ बनतात... गावात कुणाचा कुणाला पायपूस राहत नाही आणि गावात अराजक माजत...याच काळात पाटील मेल्यामुळे पाटलीन ही एकाकी होते.पाटलाला मूल नसल्यामुळे कुणाचा मूल पाटलांना दत्तक जाणार यासाठी गावात दोन तट पडलेले असतात एका बाजूला केरू नाना दुसऱ्या बाजूला, देसायांचा गट असतो.. पाटलांचे जुने सहकारी गाव वतन दार कुलकर्णी यांना मात्र यातून काहीच निर्णय घेता येत नसतो तो जरी वतनदार माणूस जरी असला तरी त्यांच्या कडे काहीसे करण्याची काही धमक नसते व गाव गुंडांना सामोरे जाण्याची ताकद त्यांच्यात नसते, त्यांच्या पाठीमागे उभा होणारा तसा कोणताच माणूस नसतो...पाटलीन बाई घाबरून गाव सोडून जातात आणि आपल्या भावाच्या मुलाला दत्तक विधान करण्यासाठी कोल्हापूरातच रहतात. या दरम्यानच्या काळात गावातील गुंडांना वाटते की कुलकर्णी यांनी पाटलीणबाई ना सल्ला दिला आणि भावाच्या मुलाला दत्तक घ्यायला लावलं.त्यामुळे त्यांचाही खून होतो गावात परत एकदा आणखी अराजक माजते...आणि याच दरम्यान गावातील लोक पाटलांची शेती बळकावतात काही शेती केरू ना ना काही देसाई यांचा पण नंतर गावात बदली पाटील येतात, बदली पाटील परशुराम आणि त्याची तीन भावंडं त्याचा सगळा लवाजमा आल्यानंतर गावातील पूर्ण परिस्थिती बदलून जाते त्यांनी गावावर एकछत्री अंमल करायला सुरुवात करतात आणि गावातील सर्व गावगुंडांना सगळ्यांनाच धडा शिकवतात पण त्याच बरोबर त्यांची नियत काही साफ नसते, गावातल्या गरिबांना कसे नाड तात, वेळोवेळी पोलिसांचा वापर करून कसे ते गावातील लोकांना अडकून आपला गावावर कसा हक्क राहील वर्चस्व राहील याचा प्रयत्न सुरू होतात. यानंतर गावात गट पडल्यामुळे, गरिबांना कोणीच वाली राहत नाही पण एक वेळ अशी येते की ते परशुराम पाटील यांना सुद्धा त्यांच्या तालमीत तयार झालेला हिंदुराव आव्हान देतो आणि परशुरामना सुद्धा असे दिसून येते की शेरास सव्वाशेर हा कोणी तरी असतो एकंदरीत काय या गावगाड्यात चालणारी उलाढाल आणि गावाकडचे तिरक व बेरकी राजकारण शंकर पाटील यांनी अतिशय उत्कृष्टपणे मांडले आहे.खोबरं तिकडं चांगभलं म्हणणारी म्हादू कोळी सारखी मंडळी व गादीची इमानाने चाकरी करणारी महादू तराळ सारखी माणसं ही गावात भेटतात....म्हणजेच गावातील राजकारण हे कोणत्या पद्धतीने खेळलं जातं,गावातील मंडळी कशी एकमेकाची जिरवा जिरवी करण्यासाठी, कुठल्या थराला जातात आणि या गावातला मोठ्या मंडळी च्या नादात जी गावातील लहान मंडळी किंवा सरळ मंडळी असतात त्यांचा कसा बळी दिला जातो हे अतिशय वेधक पणे मांडले आहे गावात होणारे सण, समारंभ जत्रा याचाही त्यांनी अचूक वर्णन केलेले आणि यामुळे गावातील मातीचा गंध आपल्याला आल्यावाचून राहत नाही.

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
290
भाषा
मराठी
किंमत
240.00
समुदायाने जोडले
बंद