मुखपृष्ठ
तंतू

माझे शेल्फ

तंतू

इंग्रजी शीर्षक
Tantu
सारांश

कन्नड साहित्यातील थोर तत्वविवेचक आणि निर्भिड कादंबरीकार श्री. एस. एल. भैरप्पा यांनी चित्रविचित्र धाग्यांनी विणलेले महावस्त्र : तंतू.आणीबाणीची काळरात्र काही अचानक अवतरली नाही. स्वातंत्र्योत्तर काळात नैतिक मूल्यांची घसरण होत राहिली. अनैतिकतेचा धागा सर्वच क्षेत्रांमध्ये फिरला आणि त्या तंतूंनी सारं आकाश झाकोळून गेलं. रविंद्र, कांती आणि त्यांचा मुलगा अनुप हे याच काळाचं प्रातिनिधिक कुटुंब! रविंद्र पत्रकार असल्यामुळे अनेक क्षेत्रात त्याचा वावर आहे. पत्रकारिता, शिक्षणक्षेत्र, राजकारण, कला-क्षेत्र, धार्मिक-क्षेत्र यासारख्या जीवनाला स्पर्श करणाऱ्या प्रत्येक क्षेत्रात चाललेल्या सार्वजनिक आणि वैयक्तिक पातळीवरील नैतिक मूल्यांच्या घसरणीचा आलेख भैरप्पांनी या कादंबरीत मांडला आहे. असंख्य पात्रे आणि प्रसंग यांच्या साहाय्यानं लेखक येथे आधुनिक भारतातील समाज-जीवनातली गुंतागुंत मांडतो. कुठल्याही प्रकारे रसहानी होऊ न देता ही बृहद् कादंबरी मराठीत आणण्याचं श्रेय सौ. उमा वि. कुलकर्णी यांचं!

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद