माझे शेल्फ
ठिकरी
प्रियकराच्या शब्दात फसलेली चैत्राली विमानतळावर एकटीच पडते. मग सोनाली तिला स्वतःच्या घरी घेऊन येते. अनोळखी शहरात तिला आसरा देते. रात्री जेव्हा दोघी जणी गप्पा मारत बसतात, तेव्हा सोनाली एक कथा सांगते, ज्यामध्ये पुरूषांची वासनालोलुपता भडकून कोण्या एक सोनाचा कोमल देह,कोमल हृदय होरपळून निघालेलं असतं. नराचा नारायण झाला, तरी नरातला नराधम मात्र जिवंतच असतो. कोण्या एका दिवशी तो डसतो अन् नारीचं जीवनच उद्ध्वस्त करून टाकतो. शरीर सुख, धन-दौलत, मान-प्रतिष्ठा या नराच्या त्रिकोणात बंदिस्त झालेली नारी, जेव्हा आझाद होते, तेव्हा तिचं मन किती भावनाशून्य अन् निगरगट्ट झालेलं असतं, हे या कादंबरीत मांडलेलं आहे. व. पु. काळे ठिकरी या शब्दाचा अर्थ सांगतात की मनुष्य ठिकरीसारखा असतो; ज्याला अलीकडे खेळण्याच्या भाषेत जिबलीसुद्धा म्हणतात. ती कुठल्या चौकटीत पडेल ही तिलाच ठाऊक नसतं. तरीही सगळा खेळ तिच्यावरच अवलंबून असतो.हि कथा वाचून मन अगदी ढवळून निघालं आहे, अगदी छोटं पुस्तक पण यातील विषय हा हिमालयापेक्षाही मोठा आहे. आपला समाजातील पुरुषांचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, स्त्रीचा वापर आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी करून घेण्याची मनोवृत्ती वपुंनी अगदी सहज पणे दाखवली हे, या कथेत कथानायिका सोना हिच्या आयुष्यातील प्रसंग अधोरेखित केले आहेत. तिने स्वतः यातना सहन केल्या पण बाकीच्या मुलींना यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला,, तिसाव्या वर्षीच समवयीन मुलींची ती आई झाली,, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तिच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक पुरुषाने तिला फक्त एक सुखवस्तुच समजले आहे.तिच्या भावभावनांचा उपयोग सुद्धा स्वतःचा फायद्यासाठीच केला. कथेतील विषय स्त्री अत्याचारावरच असला तरी तो अगदी वेगळ्या पद्धतीने मांडला आहे, ज्यातून माणूस काहीतरी धडा घेईल. प्रत्येकाने एकदा आवर्जून वाचावेच असे हे पुस्तक आहे.
सुरुवातीच्या दिवसात एस्सो रॉकेल डेपोचे व्यवस्थापक नूर मोहम्मद शेख यांचे सहकार्य लाभले. त्यांची स्मृती जपण्यासाठी त्यांनी जळगावात त्यांच्या नावाने उर्दू ज्युनिअर कॉलेज काढले. आत्मकथेतील काही भाग जैन चोरडिया परिवारातील व्यक्तिरेखे भोवती फिरत राहतो, घुटमळत रहातो. काही गोष्टीची दुरुक्ती, पुनरावृत्ती झालेली आहे. चहापानाला सुध्दा विषपान समजणाऱ्या भवरलालजी जैन यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. कॉफर्ड ग्रीड, पद्मश्री पुरस्कार आदिंनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. लाख तर होतच रहातील, पण लाखांचा पोशिंदा होण्याची ताकद, हिंमत ठेवावी असा संदेश देण्यात लेखिका यशस्वी झालेल्या आहेत.