माझे शेल्फ
उद्ध्वस्त
‘झाकली मूठ’ ही आबा पाटलाची कथा द्रष्टेपण शिकविणारी. ‘गोष्ट त्याज्या जल्माची’ मधील म्हातारी मुलगा पोटी जन्मावा म्हणून स्त्रीजन्माचा जुगार खेळते व समाजाबाहेर फेकली जाते.मुलगा होतो तो अपघातात मरण पावतो;मग नातवाला जगवण्यासाठी म्हातारी प्राणपणानं लढते.‘व्हरपळ’कथेतील दगडू ठकीचं लग्न अजाणतेपणी लावतो... आणि तिच्या आयुष्याची होरपळ बघवत नाही. ‘बंड’या रूपकात्मक कथेतील ‘कावळे व सभापती डोमकावळा’ माणसाची स्वार्थी,दुष्ट व कपटी नीती उघड करतो. ‘म्हातारचळ’ मधील देखणी लंकी तरुणपणी सदामामाला घाबरते व लग्न न करता भावंडांना शिकवते... पण नंतर पश्चाताप व दु:ख करत बसते.‘बाजीराव नाना’ मधील दारूडा तुक्या ्तीन लग्न करून शेवटी गोत्यात येतो. ‘आग’ कथेतील शेवंताला माहेर पारखं होतं...दुष्ट जगात तिची फरपट होते. ‘रोजचं मढं त्याला कोण रडं?’तली सीता सख्खी बहीण मधूच्या जीवाचा सौदा करते. ‘हार्या-नार्या’,‘सर्ग इतभरच र्हायला’ ...ती चंपा! ‘गलांगू’ या कथाही अगदी वास्तव व वेगळ्या धाटणीच्या. आदिवांसीच्या अशिक्षित जीवनातले अमानवी दु:ख व कर्मकहाणी सांगणार्या या सर्व कथा. ज्या दु:ख-यातनांची आपण कल्पनाही करू शकणार नाही अशा.