माझे शेल्फ
उत्तरकांड
उत्तरकांड" एस. एल. भैरप्पा यांचं प्रत्येक साहित्य वाचकाच्या मन आणि मेंदूचा ताबा घेणारं असतं, वाचत असताना वाचक एका वेगळ्याच विचारचक्रात हरवून जातो.प्रख्यात भारतीय कादंबरीकार डॉ.एस.एल.भैरप्पा यांनी लिहिलेली २०१५ साली कन्नड भाषेत प्रसिद्ध झालेली उत्तरकांड ही महर्षी वाल्मिकी यांच्या अभिजात असणाऱ्या महाकाव्य रामायणातील सीता या उत्तुंग पात्राभोवती गुंफलेली कलाकृती. राम हे अखिल भारत वर्षाचे हृदय्थ दैवत.राम आणि त्याचे धर्माचरण हे ही एक मिथक च पण प्रत्येक भारतीय लोकमनाचा ठाव व्यापून राहिलेलं गूढ पण लोभस असं सत्य.रामाचा वनवास,सीताहरण,लंकेवर स्वारी त्या नंतर प्राप्त केलेला विजय नन्तर अयोध्येत आल्यावर लोकभिचाराला सामोरं जाऊन रामाने केलेला सीतात्याग.त्यानंतर सीते च्या मनातील विचारांचे काहूर आणि त्यावर तिने केलेली मात, जनकाने भूमीतून सापडलेल्या एका कन्येचा केलेला सांभाळ पण त्या भूमी बद्दल सीतेची असणारी ओढ, त्या ओढीच्या माध्यमातून च कृषक म्हणून केलेली शेतीची कामे. महर्षी वाल्मीकींच्या आश्रमात व्यतीत केलेला काळ,केलेले लव कुशांचे संगोपन, कळते झालेले लवकुश यांनी पकडलेला अश्वमेध यज्ञाचा घोडा तो सोडून न देता वाल्मिकी नि केलेली मध्यस्थी त्यातून झालेली अयोध्येतील धर्मसभा आणि त्यात सीतेने बजावलेली स्त्री च्या हक्कासाठी ची भूमिका. एक सूंदर अशी पौराणिक पार्श्वभूमीवर आधारलेली पण वास्तवातही सही सही लागू होणारी अशी कलाकृती.