माझे शेल्फ
वाइज अँड अदरवाइज
वाइज अँड अदरवाईज अतिशय छान पुस्तक. पुस्तक वाचल्यानंतर त्यांची विशाल महानता कळते. 204 पानाच्या या पुस्तकामध्ये सुमारे 51 कथा आहेत. आदरणीय सुधा मुर्ती यांच्या विशाल कार्याचा आढावा या पुस्तकामधुन होतो .प्रत्येक कथेमधुन सुधा मुर्ती यांच्या कार्याची णि त्यांच्या जीवनाविषयीच तत्वज्ञान या पुस्तकाच्या माध्यमातुन दिसुन येते.सुधा मूर्ती वाइज अँड अदरवाइज गोष्टी अनुभवाच्या त्यांनी त्यांच्या अनुभवातून त्याचबरोबर त्यांच्या मित्र मैत्रिणीच्या अनुभवातून ज्या काही गोष्टी सांगीतल्या आहे त्यातून बऱ्याच गोष्टी आपल्या मनाला स्पर्श करून जातात..! त्या चांगल्या वाईट अनुभवातुन ते काहींना काही शिकतमोठे झाले. ते म्हणतात ना अनुभव हा माणसाचा खरा गुरु असतो. तसेच या यशस्वी लोकांचा खरा गुरु हा त्यांना आलेला अनुभव असतो. यशस्वी व्यक्ती त्यांना आलेल्या अनुभवातुन ते शिकतात. वाइज अँड आदर वाईज एक प्रसिद्ध पुस्तक! भारताच्या अत्यंत मागास भागामध्ये त्या फिरल्या.रेल्वे, बस प्रसंगी पायी फिरून जाणून घेतले तेथील दारिद्र्य! आपल्या व्यवसायात कार्यमग्न असतानाही सामाजिक भान ठेवून टिपलेल्या अनुभवांचे हे लेखन. भारताच्या आर्थिकदृष्ट्या अत्यंत मागासभागांमध्ये सुधा मूर्ती यांनी भटकंती केली आहे. त्या पायी फिरल्या आहेत, त्यांच्यासाठी मग आरोग्य,शिक्षण आणि स्वावलंबनासाठीची सुरू केल्या अनेक योजना! त्या साठी झगडल्या.अटोकाट प्रयत्न केले.अनेक प्रकारच्या लोकांचा संपर्क आणि संबंध आला.मन हेलावून टाकणारा एक एक प्रसंग जणू त्यांचा गुरूच! जसे आठरा विश्वं दारिद्र्याचे त्यांना स्वामी भेटले तसेच त्यांना भेटले करोडो रुपयांच्या रकमेचे चेक देणारे अनामिक दाते! "इन्फोसिस फाऊंडेशन" च्या माध्यमातून त्यांनी स्वतः अनेक कार्य चालवले आहेत.इतरांना ही मदत करतात. अश्या अनुभवातून निर्माण झाले एक तत्वज्ञान! त्याची मांडणी खूपच प्रेरक आसते! त्यांच्या या प्रवासामध्ये त्यांना कधी अत्यंत गरीब लोक भेटले तर कधी धूर्त राजकारणी यातुन आलेले अनुभव आणि त्यांना भेटलेली माणसे. यातुन समजलेला मनुष्यस्वभाव.वाईस अँड अदरवाइज या पुस्तकातुन त्यांनी मांडला आहे. सुधा मुर्ती यांनी परतफेडीची अपेक्षा न करता न ठेवता अनेकांना मदत केली. काहींनी त्या मदती बद्दल कृतज्ञता व्यक्त केली तर काहींनी मिळालेल्या मदतीचा उल्लेखही केला नाही. त्यांच्या या प्रवासामध्ये त्यांना खुप लहान-मोठी माणसे भेटली त्या प्रत्येकाकडुन बरंच काही त्यांना शिकायला मिळाले. हि अशी माणसं हीच माझी माणसं,तेच माझे नातेवाईक.मी त्यांच्यासाठी काम करते.मग त्यांची जात,उपजात,लिंग,भाषा किंवा राजकीय निष्ठा कोणतीही असो..! या पुस्तकातून बरंचस शिकायला मिळाले..! खरंच आपल्याला यशाच्या उंच शिखरावर पोहोचायचं असेल तर आपल्याला अनुभवातुन शिकलं पाहिजे. हे पुस्तक वाचल्यावर समजत कि माणसाचा खरा गुरु हा त्याला आलेले अनुभव होय. जो अनुभवातुन शिकतो तो सदैव यशस्वी होत रहातो.