मुखपृष्ठ

माझे शेल्फ

वावरी शेंग

इंग्रजी शीर्षक
Vavari Sheng
सारांश

मराठी साहित्यात प्रामुख्यानं पांढरपेशा मध्यमवर्गियांच्या आयुष्याचं चित्रण कथा-कादंबऱ्यांतून रंगवलं जायचं. या अनुभवविश्वाला पहिला तडा दिला तो ग्रामीण साहित्यानं आणि पाठोपाठ दलित साहित्यानं. १९५०-६० च्या दशकात व्यंकटेश माडगुळकर, द. मा. मिरासदार, वसंत सनीस यांच्या ग्रामीण ढगांच्या कथांनी मराठी साहित्याची एक वेगळीच धारा येऊन मिळाली. या ग्रामीण साहित्यात मोलाची अन लक्षणीय भर टाकली ती शंकर पाटील यांच्या ग्रामीण कथांनी. शहरी जीवनानुभवापेक्षा या ग्रामीण कथांमधून रेखाटलेलं सामान्य माणसाचं जगणं पांढरपेशा मध्यमवर्गासाठी नवं होतं. त्यांच्या जगण्याच्या झगडा, दैन्य-दारिद्र्य, शोषकांची दांडगाई, शोषितांची परिस्थिती शरणता हे सारंच धक्कादायक होतं. दलित साहित्यानं तर कल्पनेपलीकडचं जीवन वास्तव, अनलंकृत भाषेत, थेटपणे मांडल्यानं मराठी साहित्याचं सारं सौंदर्यशास्त्रच कोलमडून पडलं. अन् या साहित्याच्या मूल्यमापनासाठी नव्या निकषांची निकड भासू लागली. ग्रामीण साहित्याचं लेखन विपुलतेनं झालं. नवनवे लेखक लिहिते झाले. त्या ग्रामीण साहित्यात शंकर पाटील यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य मोठं आहे. शंकर पाटील यांनी केवळ विनोदापेक्षा ग्रामीण जीवनातील रोजच्या जगण्याचा, सामान्य माणसाचा झगडा, परिस्थितीशी दोन हात करत जीवनाला सामोरं जाण्याची विजिगिजू वृत्ती, माणसातील माणुसकी जपणारी नाती, (अन् त्यांच्याबरोबर त्याचं पशुत्व), मानवी स्वभावाची जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती या साऱ्यांचं चित्रण आपल्या कथांमधून केलं. त्यांच्या कथांमधून ग्रामीण जीवनाचं प्रातिनिधक चित्रण दिसतं. तसं जीवनाची नीतिमूल्यं, तत्व यांचही दर्शन होतं. मेहता पब्लिशिंग हाऊस यांनी शंकर पाटील यांच्या कथांचं कालातीत महत्त्व लक्षात घेऊन त्याचं ‘वावरी शेंग’, ‘बंधारा’ आणि ‘घालमेल’ या कथासंग्रहाच्या नव्या आवृत्त्या प्रकाशित केल्या आहेत. या कथासंग्रहामधून शंकर पाटलांची चित्रमय वर्णनशैली प्रकर्षानं जाणवते. बारीक तपशिलासह ते सारं चित्र वाचकांच्या डोळ्यांसमोर उभं करतात. ग्रामीण भाषा, बोलके शब्द, म्हणी यांचा वापर, ग्रामीण वातावरण त्याचं जीवन, दैन्य-दारिद्र्य तपशिलानं वर्णन करतात. त्यांच्या काही कथांमध्ये नाट्यमय शेवट आहे. कथांतर्गत लेखकानं निर्माण केलेला समज शेवटच्या धक्क्यातून पार उधळला जातो आणि कथा वेगळ्याच वळणानं रंजक ठरते. उदा. ‘पुरावा’ (वावरी शेंग). आत्यंतिक दैन्य-दारिद्र्याचं चित्रण ते करतात, पण त्यावर आपलं भाष्य करीत नाहीत. शंकर पाटलांच्या उपमाही ग्रामीण वातावरणाशी, जीवनाशी निगडित येतात. उदा. ‘पदर आलेली गजरा कापसाच्या बोडागत उमलून आली होती. पृ. ६२ (वावरी शेंग) किंवा आतला गाभाच जर कडू, तर वरचं टरपाल घेऊन काय काराययं?’ पृ. ८७ (खोड). ग्रामीण कथांमधून येणारे इरसाल नमुनेही या कथांमधून दिसतात. शंकर पाटलांच्या कथांतून ग्रामीण जीवनाच्या चित्रणाबरोबरच मानवी जीवनाची गुंतागुंत, जगण्याची आस, नीतिमूल्यं सारं जाणवतं. त्यांच्या कथांकडे म्हणूनच गांभीर्याने पहायला हवं.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
पृष्ठसंख्या
94
भाषा
मराठी
किंमत
80.00
ISBN
9788177669121
समुदायाने जोडले
बंद