माझे शेल्फ
वावटळ
३० जानेवारी १९४८ च्या सायंकाळी नथुराम गोडसे नामक एका ब्राम्हण युवकाने गांधीजींची गोळी घालून हत्या केली आणि देशाचं राजकारण, समाजकारण सगळं एका रात्रीत बदलून गेलं. हया घटनेचे परिणाम शहर, गाव, खेड ह्यापुरते मर्यादित राहिले नाही. तर दुर्लक्षित भागातले लोक सुद्धा ह्या आगीत होरपळून निघाले. तेव्हाची जीवन व्यवस्था ढवळून निघालीच सोबत येणाऱ्या आगामी पिढ्या सुद्धा ह्या घटनेच्या शिकार झाल्या. पुण्यात राहणारे ३ युवक. गांधी हत्येच्या संध्याकाळ नंतर त्यांच्या आयुष्यात आलेली वावटळ मांडणारी ही कादंबरी आहे. त्याचा पुण्यातून गावाकडे झालेला प्रवास, प्रवासात गावागावातून माणसांच्या आयुष्यात होणारे बदल आणि मग आपापल्या गावी पोहोचल्यावर त्यांची उर्ध्वस्थ झालेली घर, गावं ह्यांचं वर्णन तुम्हाला आज सुद्धा अस्वस्थ करतं. विशिष्ट जातीद्वेष्टा समाज आज पण आहेच. त्याची पाळमुळ किती आधीपासून रुजलेली आहेत ते ही कादंबरी वाचल्यावर लक्षात येतं. पण एक गोष्ट खूप नकळत जाणवली ती म्हणजे प्रत्येक समाज दुसऱ्या समाजावर किंवा स्वतःवर नकळत अन्याय हा करत असतोच आणि त्या सगळ्याची आपल्याला इतकी सवय झालीये की आपल्या ते लक्षात ही येत नाही.