मुखपृष्ठ

माझे शेल्फ

वेध नवनिर्मितीचा

सारांश

नवनिर्मितीसाठी सृजनशीलता हा अत्यावश्यक गुण आहे. प्रत्येक व्यक्तीला सृजनशीलबुद्धी व कल्पनाशक्ती कमी-अधिक प्रमाणात असते. ह्या कल्पकतेची वाढ कशा प्रकारे झाली आहे ? तिच्या विकासाला योग्य चालना मिळाली आहे, किंवा कसे ? यावर सृजनशीलतेचा विकास अवलंबून असतो. एखादी संकल्पना, विचार अथवा इच्छा अत्यंत तीव्रतेने जाणवल्यानंतर सृजनशील विचारशक्ती कार्यप्रवण होते. काही अभूतपूर्व कल्पना व विचारांचा जन्म तर अनेकदा स्वप्नावस्थेतच झाल्याचे आढळते.
समस्यांचे निराकरण करण्यासाठी सृजनशीलतेचे महत्त्व असाधारण आहे. नवीन विचारांना, नवीन तत्त्वे आणि प्रयोगांना पडताळून पाहण्यासाठी सृजनशील वृत्तीची गरज कोणीही अमान्य करणार नाही. सृजनशील विचारसरणीची निर्मिती करता येते. ही विचारसरणी वाढविता येते आणि त्या माध्यमातून नव्या कल्पनांना अधिक योग्य स्वरूपात सादर करता येते. सर्जक वृत्ती निर्माण होण्यासाठी, सृजनशील विचारसरणीचा कल्पकतेने विविध पैलू तपासून पाहण्याचा दृष्टिकोन विकसित व्हावयास हवा.
सृजनशीलतेच्या विकासामुळेच कुठल्याही क्षेत्रात नवनिमिर्ती घडत असते. कुठल्याही क्षेत्राची प्रगती ही नवनिर्मितीचीच फलश्रृती असते.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2009
पृष्ठसंख्या
141
भाषा
मराठी
किंमत
100.00
ISBN
9788184831368
समुदायाने जोडले
बंद