वेगळी माती वेगळा वास
इंग्रजी शीर्षक
Vegali Mati, Vegala Vas
सारांश
प्रवासाची आवड माणसाच्या रक्तातच असते का?की ती नंतर हळुहळू निर्माण होत जाते?सवयीच्या झालेल्या गोष्टींपासून ते दूर पळणं असतं कीस्वत:मधलं चैतन्य टिकवणार्या रसदीची कोठारंशोधणं असतं? मग तो प्रवास भौगोलिक असो,की काळात किंवा इतिहास-परंपरेत केलेला प्रवास असो;पुष्कळदा वर्तमानातल्या भौगोलिक प्रवासात हेइतर प्रवास गुंतलेलेच असतात. कारण आपली भूमीआजच्या माणसांबरोबरच प्राचीन माणसांचं जगणंही जपते आहे.त्यामुळेच प्रवास करताना आपलं देशाचं आणिकाळाचं भान तर वाढतंच पण माणसाविषयी जाणून घेण्याचंआपलं कुतूहलही न शमता वाढतच राहतं.आणि वाढण्याचा अनुभव नेहमीच आपल्याला नैसर्गिकपणे हवासा असतो. म्हणून मग प्रवासही हवाच असतो.