मुखपृष्ठ
वळीव

माझे शेल्फ

वळीव

इंग्रजी शीर्षक
Valiv
सारांश

शंकर पाटील असे लेखक आहेत ज्यांनी मराठी कथालेखनाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.शंकर पाटलांनी लिहिलेली टारफुला कादंबरी वाचताना लक्षात येत की एखदी व्यक्तिरेखा रंगवताना किती बारिकाईने लक्ष दिल गेलं असेल. वाचकांच्या डोळ्यासमोर एखादं गाव, एखादं जनावर, नदी, ओढा, पारावरची निवांत बसलेली माणसं अगदी हुबेहुब रंगवलेली दिसतात. कथानकाचा आपणही एक भाग आहोत, आपल्या डोळ्यासमोर ती गोष्ट घडते आहे असा भास निर्माण होत राहतो. शकर पाटील एक भन्नाट लेखक होते. वाचकांना एक वेगळा अनुभव देणारा लेखक म्हणजे शंकर पाटील.

‘वळीव’ कथासंग्रहातील ‘सूड’ ही कथा ‘वर्णनात्मक शैली’ म्हणजे काय असते याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. बैलगाड्यांची शर्यत म्हणजे एक मानबिंदू ठरतो. त्यातील हार-जीत प्राणांपेक्षाही मोलाची कशी वाटते, गावकऱ्यांची उत्सुकता, शर्यतीचा वेग कसा टिपेला पोहचतो याचे प्रत्ययकारी वर्णन या कथेत आहे. वाचकासंही जणू त्या शर्यतीचा वेग येतो! ‘यशस्वी चित्रपट कथाकार’ हा नावलौकिक शंकर पाटलांच्या मागे का आहे? याचे उत्तर ‘सूड’ ही कथा देते. एक चलतचित्रपट शब्दाच्या माध्यमातुन दिसू लागतो. यातील काही भाग पाहू. ‘विस्त्याच्या खेंडागत तापलेली ती जनावरं आवरणं आता त्याच्या देवालाही शक्य नव्हतं. गाडी दुसऱ्यांदा भकली. वाट सोडून रानात शिरली. चार-चार बोटं चाकं जमिनीत घुसू लागली तरी गाडीचा वेग काही आवरत नव्हता. हरबाही दात खाऊन कासरे ओढत होता. त्या कासऱ्यांची त्याच्या हातांचे पळके निघत होते: पण त्याला कशाचीच शुद्ध नव्हती. वेसणीला ओढलागून बैलांची नाकं फाटली होती. फड्याच्या पिकलेल्या बोंडागत त्यांचे डोळे लालभडक झाले होते. त्यांच्या रेशमासारख्या मऊ अंगावर आडवेतिडवे वळ उठून कुंड झाले होते. जागजागी कातडी सोलून निघाली होती. असं विलक्षण झपाटणारे वर्णन इतर सर्व कथांमधून आढळून येते. एक ‘काव्य’च गद्यलेखनातून प्रगटतं. ‘वळीव’ कथासंग्रहातील सर्व कथांचा आशय वास्तव असून त्याला गांभीर्यतेची आणि करूणेची एक आर्त झालर आहे.

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
154
भाषा
मराठी
किंमत
120.00
समुदायाने जोडले
बंद