माझे शेल्फ
वंशवृक्ष
वंशवृक्ष ही डॉ.भैरप्पा यांची अतिशय गाजलेली कादंबरी जीच्या वर पुढे चित्रपटही निघाला ज्यात गिरीश कर्नाड यांनी राज या मध्यवर्ती कथानकाची भूमिका चित्रपटात बजावली आहे. तशी ती भूमिका त्यांना व कथानकाला साजेशीच होती त्यामुळे कादंबरीत जेव्हा जेव्हा राज चा उल्लेख येतो तेव्हा समोर गिरीश कर्नाडच दिसतात. कादंबरीचा मध्यवर्ती विषय आहे वंश आणि त्या वंश वृध्दीसाठी आसूसलेली दोन कुटुंब आणि दोन वंशाचे दिवे ज्यात एक जण वडीलांच्या तर एक जण आईच्या प्रेमासाठी मुकलेला आहे. कथा सुरु होते सदाशिवराव आणि श्रीनिवास क्षोत्रींच्या कथानकां पासून श्रीनिवास क्षोत्रींचा तरुण मुलगा नदीत वाहून गेलेला आहे ज्यामुळे घरात एक तरुण पत्नी एका लहन मुलाची आई असून विधवा झालेली आहे. संस्कृतचे पंडीत असणार्या श्रीनिवास यांच्याकडे म्हैसूरचे प्रसिध्द इतिहासाचे अध्यापक सदाशिव राव आलेले असतात ज्यांना भारताचा बृहृत इतिहास पाच खंडात लिहायचा आहे त्यातला एक खंड लिहून झालेला असतो जो ते दाखवायला आणि मार्गदर्शन घ्यायला श्रीनिवास शास्त्रींकडे आलेले असतात. सतत संशोधनात असल्यामुळे सदाशिवरावांचे आपली बायको नागलक्ष्मी हिच्याकडे कायम दूर्लक्ष असते. तर लहान भाऊ राज नुकताच लंडन वरुन म्हैसूरला घरी आलेला असतो. राज प्राध्यापक म्हणून कॉलेज मधे त्याच्या नाटक मंडळामुळे प्रसिध्द असतो पुढे या सगळ्यांच्या आयुष्यात एक वादळ येतं श्रीनिवास शास्त्रींची विधवा सून कॉलेज शिकायला म्हैसूरला येते आणि राज आणि तीचं प्रेम एकमेकांवर बसतं , इकडे सदाशिवराव श्रीलंकन संशोधिका करुणा रत्नेमुळे हिच्यामुळे प्राभावित होऊन तिच्याशी दुसरं लग्न करतात .या नंतर असणारी कथा ही खरचं वाचायलाच हवी .या कादंबरीचा शेवट ज्या प्रकारे भैरप्पांनी केलाय त्याला तोड नाही. वंशवृक्ष वाढवण्यासाठी झालेली फसवणूक, काहींची तगमग याचं दुःख हे सर्वांनाच गुरफटून टाकतं ज्यात कात्ययनी ,करुणारत्ने यांची झालेली परवड तर नागलक्ष्मीचं टाकलेली बायको म्हणून झालेली कुचंबणा, सनातन विचारांचे श्रीनिवास,बायकोच्या सुखासाठी आसुसलेला आणि सगळ्याःची काळजी घेणारा राजा, संशोधनात गुरफटलेले सदाशिवराव ही पात्रे रंगवताना सर्वांचे भावतरंग ,विचार , समांतर चाललेली कथानके म्हणजे चित्रपटाचे उत्कृष्ट पटकथा आपण वाचतोय असंच वाटत राहतं.