मुखपृष्ठ

माझे शेल्फ

वपुर्झा

इंग्रजी शीर्षक
Vapurza
सारांश

पुस्तक - वपुर्झा , हे पुस्तक अर्पण करतांना लेखक व .पु.काळे लिहितात , शांतचित्त ज्ञाना रोखठोक तुका ह्यांचा अपूर्व संगम म्हणजे दुर्गाबाई भागवत. वपुर्झा ची हि आवृत्ती दुर्गाबाई भागवत ह्यांना . -- वपु .

पुस्तकावर लिहिलेला अभिप्राय - कोणतेही पान घडा आणि वाचा !वपुर्झा हे पुस्तक कोणासाठी ? ज्यांना मोत्यातील चमक बघायची आहे अश्या वेड्यांसाठी ! हे पुस्तक कस वाचायच? एका बैठकीत? अथ ते इति एका दमात? छे मुळीच नाही. काही हौशी घरामध्ये ड्रेसिंग टेबलवर निरनिराळ्या अत्तरांच्या बाटल्या असतात . जसा मूड असेल तस अत्तर वापरायच किंवा जसा मूड व्हावासा वाटत असेल तस अत्तर निवडायचं . हे पुस्तक असंच वाचायचं .हव ते पान आपापल्या मूडनुसार उघडायचं आणि सुगंधाने भारून जायचं .एखादा सुगंध पुन्हा घ्यावासा वाटला तर पुन्हा शोधायचा . त्या शोधात आणखी काहीतरी सापडेल .म्हणून या पुस्तकात अनुक्रमणिका ,क्रमांक , संदर्भ काहीही दिलेलं नाही . या पुस्तकाच्या शेवटच्या पानावरच वाक्य . नुसत्या वाचनाने माणूस मोठा होत नाही .वाचलेल्या विचारांना स्वतःचे अनुभव जोडायचे असतात . म्हणजे ते ते साहित्य स्वतः पुरतं चिरंजीव होत . करमणूक करवून घेतानाही स्वतःला खर्ची घातल्याशिवाय ती करमणूक भिनत नाही . साहित्य हे निव्वळ चुन्यासारखं असतं . त्यात आपल्या विचारांचा काथ टाकल्याशिवाय आपल्या आयुष्याचा ग्रंथ रंगत नाही . आणि लेखकांला हवा असतो संवाद . त्याशिवाय त्याच पान रंगत नाही .

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
पृष्ठसंख्या
264
भाषा
मराठी
किंमत
250.00
ISBN
9788177664270
समुदायाने जोडले
बंद