मुखपृष्ठ
वपुर्वाई

माझे शेल्फ

वपुर्वाई

इंग्रजी शीर्षक
Vapurwai
सारांश

सुरेख कथासंग्रह… वपुच्या आजवरच्या लेखन लौकिकात भर टाकणारा आणखी एक कथासंग्रह आहे - वपूर्वाई. वपुंची कथाकथनाची हातोटी त्यांच्या लेखनातही समर्थपणे जाणवते. लेखन आणि कथाकथन ह्या दोन्ही क्षेत्रात वपुंनी आपलं असं एक विशिष्ट स्थान निर्माण केलं आहे हे निर्विाद. ओघवत्या आणि सोप्या भाषेतून वाचकांच्या समोर प्रसंग उभा करण्याचे सामर्थ्य, मानवी भावभावनांचे वेगवेगळे पदर दाखवण्याचे वपुंचे कसब ह्या कथांतून ठायीठायी जाणवते. पुलंच्या अपुर्वाई नावाप्रमाणे वपुर्वाई हे कथासंग्रहाचे नाव असले तरी बाकी कुठल्याही प्रकारचे दोहोत साम्य नाही. अपुर्वाईमध्ये पुलंनी परदेशवर्णन, तेथील अनुभवकथन केले आहेत तर वपुर्वाईमध्ये वपुनी ७ कथांमधून कलाकाराच्या समाजाकडून अपेक्षा, स्त्रीमुक्तीचा सोपा अर्थ, माणसाची प्रेम करण्याची स्वार्थी रीत इ. कथाबीजं फुलवली आहेत. सर्वच कथा चांगल्या आहेत. त्यातल्या त्यात डावे-उजवे करायचे झाले तर ‘झापड’, ‘ठिणगी’ आणि ‘नॉट सो स्ट्रेज’ या तीन कथांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. कलावंत समाजाचं ज्याप्रमाणे काही देणं लागतो त्याप्रमाणे समाजही कलावंताचे काही देणं लागतो ह्याचं समाजानं भान ठेवावं हे आहे ‘झापड’ कथेचं सूत्र. कलाकारांच्या बाबतीत समाज फार टोकाची भूमिका घेत असतो. एखाद्या कलाकाराचे कौतुक केले तर इतके करतील की चाहत्यांच्या प्रेमाने तो गुदमरून जाईल, नाहीतर जरा कुठे त्या कलाकाराचा तोल ढळतो असे वाटले तर त्याला टोचून टोचून जीव नकोसा करून टाकतील. कलेच्या प्रांतात गरुड-भरारी घेताना जरा कुठे तोल गेला तर त्याला घसरणे हे नामाभिधान न देता कलाकाराला आलेली ती द्वाणिक झापड समजून, ‘सुबह का भुला शाम को घर लौटा तो उसे भुला नही कहते’ ह्या उक्तीप्रमाणे, समाजाने त्या कलावंताला भक्कम आधार द्यायला हवा. हे ह्या कथेतील कलावंत नायिकेचा पती स्वत:च्या कृतीने पटवून देतो. आपली पत्नी क्षणिक मोहाला बळी पडली हे कळल्यावरही तिला झालेला खराखुरा पश्चाताप अनुभवून धीरोदात्त मनाने तो तिला स्वीकारतो. इथे संसाराची व्याख्या वपु फार छान देतात- ‘‘एकमेकांचे वाभाडे काढण्यासाठी किंवा वर्मावर चोची मारण्यासाठी संसार करायचा नसतो. जिथं जोडीदार कमी पडेल तिथं आपण उभं राहायचं’’ मान गए उस्ताद! ‘‘नवऱ्याच्या नजरेत ज्या क्षणी प्रथम पशुत्वाची ठिणगी दिसते त्याच क्षणापासून स्त्रीनं बंडांच निशाण उभारायला हवं. प्रत्येक ठिणगीची चितेची ज्चाला होईल तोवर वाट बघायची नाही.’’ ‘ठिणगी’ या कथेतील नायिका सुप्रियाच्या तोंडून वपुच स्त्रीमुक्तीचा अर्थ वाचकांना सांगत आहेत असं वाटतं. स्वाभिमानी, बाणेदार वकील सासऱ्याच्या विरोधात उभी राहून एका सासुरवाशिणीच्या खुनाची हायकोर्टात दाद मागते आणि त्या खुनी नवऱ्याला फाशीची आणि सासऱ्याला जन्मठेपेची शिक्षा देववते, ही सर्वच कथा रोमांचक आहे. ‘नॉट सो स्ट्रेंज’ कथेत एक मांजर उर्फ कुत्रा, माणसाची व्यवहारी रीत सांगतो - ‘‘समोरचा माणूस जितका आपल्या मनाप्रमाणे वागेल तितकेच त्याच्यावर आपण प्रेम करतोय.’’ अपघातानंतरच्या ऑपरेशमुळे मांजर-कुत्र्यासारखं वागायला लागल्यावर त्याला मांजरंही आपलं म्हणत नाहीत आणि मांजराचे रुप असल्यामुळे कुत्रीही त्याला आपल्यात सामावून घेत नाहीत. शेवटी हा टू इन वन प्राणी म्युनिसिपालिटीच्या कुत्री पकडण्याच्या गाडीत आपणहून चढून जातो. वपु व्यवसायाने आर्किटेक्ट असल्यामुळे त्या कामाची वर्णनही ‘प्रिटेंड सर्किट’ ह्या कथेत आली आहेत. ‘हसरे दु:ख’ ही कथा मनोविश्लेषणात्मक वाटते. ‘एम.वाय. आर. ६९०’ या कथेत सर्वार्थाने मुक्त स्त्रीचं वर्णन येतं. स्त्री-पुरुष मैत्रीचे विविध पदर दाखविणारी ही कथा आहे. ‘हव्या हव्या क्षणांसह’ या कथेत दोन थरातील मित्र-मैत्रिणीच्या दोन जोड्या आहेत. एकमेकांच्या सहवासासाठी आतुरलेल्या क्लार्क जोडीतील मैत्रिणीला वाटतं - आपण दोघं मोठ्या हुद्द्यावर असतो तर उघड-उघडपणे बरोबरीने वावरता आलं असतं. मोठ्या हुद्द्यावरील जोडीतील मैत्रिणीला वाटतं, आपण सामान्य असतो तर एकमेकांच्या सहवासात मजेत राहिलो असतो. लोकांचं आपल्याकडे लक्षही गेलं नसतं. मानवी स्वभावाच्या बारक्याशा कंगोऱ्यातूनही वपु कथा फुलवतात, त्यामुळे वाचकांना त्यांच्या कथा एक आगळाच आनंद देऊन जातात.

११८-११९) कुटुंबातल्या आई-वडिलांच्या बहिण भावंडांच्या इतर अनेक आप्तांच्या, स्नेह्यांच्या आठवणी या सर्वसाधारणपणे सर्वच मध्यम वर्गीयांच्या जीवनाप्रमाणे आहेत. पण अकृत्रिम, सहजसुंदर भाषाशैलीने त्या उठावदार झाल्या आहेत. वपु आणि वसुंधरा त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग इथे चित्रपटाप्रमाणे पुढे येतात. ह कालानुरूप नसले तरी पुस्तकाच्या चित्रमयतेला आणि वाचनीयतेला बाधा आणत नाहीत. वपुंच्या अनेक साहित्यिक मित्रांची आणि अन्य स्नेहींची शब्दचित्रेही अतिशय उत्कट उतरली आहेत. वपुंचा पत्रव्यवहारही मोठा होता. त्यातून जोडली गेलेली अनेक नाती आपल्याही परिचयाची होऊन जातात. त्यातला एखादा पेडणेकर असेल किंवा विजय लोटके. पण लक्षात राहतो, विक्रमसिंह धनंजय कुलकर्णी. ही सगळी माणसं वेगवेगळ्या क्षेत्रातली पण सगळ्यांचा वीकपॉइंट वपु हाच! साहित्यिक पिढी ग. वा. बेहरे, पु. रा. बेहरे, मंगेश पाडगावकर, शंकर वैद्य, अरविंद गोखले, विंदा करंदीकर इ. अनेकांच्या अनेक आठवणींमधून बऱ्याच गोष्टींचे संचित हाती येते. वसुंधराबार्इंचं आणि वपुंचं दोघांचंही निधन चटका लावणार होतं. ते हृदयस्पर्शी वर्णन वाचून मन हेलावतं. एक महिला डॉक्टर आणि तिचे पती हे दांपत्य वपुंचे स्नेही. काही कारणानं ते वपुंच्याकडे वास्तव्यास आले. वपुंना डॉक्टराचं वास्तव्य नको होतं असं लेखिकाला खूप उशिरा कळलं. हा प्रसंग मोघमपणे येतो. शेवटी इडली खाण्याची वपुंची इच्छा अपुरी राहिली. पण त्या डॉक्टरबार्इंनी त्या त्यांनीच आणलेल्या इडल्या त्यांच्या मृत्यूनंतर लगेच खाल्या. त्या बाईबद्दलची भावनाही तशा सौम्य शब्दात करताना स्वाती चांदोरकर म्हणतात. संकटसमयी तुम्हाला (वपु) एकटं करणाऱ्या डॉक्टरांना आम्ही नाही मान्य करू शकलो. त्या इडल्या डॉक्टर खाऊ शकल्या असतील. पण आम्ही कुणीच नाही खाऊ शकलो. तुमची इडली खायची इच्छा होती आणि तुम्ही न खाता तसेच गेलात. मग आम्ही कशी खाणार होतो. आता तर आयुष्यभर इडली म्हटलं की. (पृ. १३२) पुस्तकाचा शेवट गंभीर होते. लेखिकेनं आपल्या वडिलांची अनेक वैशिष्ट्य भावना शैलीत सांगितली आहे. अनेक ना विणलं गेलेलं वपुंचं जीवनवस्त्र, पोते किती अस्सल होता हे पुस्तकामुळे समजतं. काही ठिकाणी चुकीची विराम चिन्हं वगळता, पुस्तकाची मांडणी प्रगटीकरण वेधक आहे. पुस्तक १६।।१६।। सेंमी. हा आकार आणि आतली कागदावरची पण् सुंदर कृष्णधवल छायाचित्रे पुस्तकाच्या आकर्षक भर घालतात. वपुंचं विविधा उत्तम शैलीत लिहिणाऱ्या चांदोरकरांकडून लिखाणाची आर्तता वाढवणारं हे पुस्तक आहे.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
पृष्ठसंख्या
140
भाषा
मराठी
किंमत
100.00
ISBN
9788177663433
समुदायाने जोडले
बंद