दिवाळी अंक २०१०

अनुक्रमणिका

अनुभव ग्रंथालयात भटकंती - जाँ-पॉल सार्त्र:- चितांतुर जंतु वैज्ञानिक व पुस्तकांचे जग!:- प्रभाकर नानावटी 'साभार परती'चा शिक्का:- प्रभाकर नानावटी बौद्धांचे आणि जैनांचे संस्कृत साहित्यातले योगदान - एक आढावा:- अवलिया सांगावेसे वाटले म्हणून.....:-अदिती डाऊन द मेमरी लेन:- टण्या कृतज्ञ!:…

नार्रासियोनेस संग्रह :- होर्हे लुईस बोर्हेस

होर्हे लुईस बोर्हेस (१८९९-१९८६) या आर्जेन्टीन लेखकाने आधुनिक दक्षिण अमेरिकन  स्पॅनिश ललितलेखनाचा चेहरामोहराच  बदलून टाकला. असे म्हणायचे नाही, की अन्य लेखक बोर्हेसच्या शैलीमध्ये लिहू लागले - नव्हे,  हुबेहूब त्याच्यासारखा त्याचा शागीर्द असा कोणीच नाही. मात्र अद्भुत भ…

सांगावेसे वाटले म्हणून.....

खूप लहानपणी आम्हाला एक कविता होती. सारखा सारखा वाहून वाऱ्याचे पाय दुखत कसे नाहीत? सारखी सारखी वाहून नदी थकत कशी नाही? सारखी सारखी कामं करून आई दमत कशी नाही? अशी काहीशी ही कविता होती. ती आम्हांला सगळ्यांना खूप आवडायची. पण ही कविता शिकवताना, बाई आम्हाला म्हणाल्या, “सारखं सारखं बोलू…

वैज्ञानिक व पुस्तकांचे जग!

टीव्ही, केबल टीव्ही, वेब टीव्ही, व्हिडिओ, संगणक, इंटरनेट, सीडी-रॉम, मोबाइल फोन, या माहिती तंत्रज्ञानाच्या अद्ययावत साधनांच्या वापरांचा परमोच्च बिंदू गाठणार्‍या ह्या माहितीयुगात कुणीतरी 'अमुक अमुक पुस्तक वाचलंत का?' असा (बावळट!) प्रश्न विचारल्यास प्रश्न विचारणार्‍याला पहिल्यांदा म…

वेगळ्या वाटेवरची लेखिका - कविता महाजन

 कविता महाजन. 'ब्र' या पहिल्याच कादंबरीमुळे एकदम प्रकाशझोतात आलेलं नाव. पुढे 'भिन्न' आली. मराठी पुस्तकांच्या विश्वातील एक वेगळा प्रयोग म्हणून तिच्याकडे पाहिलं गेलं. दोन वेगळीच विश्वं - जी वास्तवात अस्तित्वात होती, पण मराठी वाचकाच्या जीवनवर्तुळाच्या परिघावर किंवा त्याबाहेर अस…

बौद्धांचे आणि जैनांचे संस्कृत साहित्यातले योगदान - एक आढावा

संस्कृत. पुरातन कालापासून भारत देशातली एक प्रमुख भाषा. ह्या भाषेचे जितके समर्थक आहेत तितकेच तिचे कट्टर विरोधकदेखील आहेत. संस्कृत हीच भारताची राष्ट्रभाषा हवी या अभिनिवेशाने भांडणारे आहेत तितकेच संस्कृतच्या सर्व खुणा नष्ट केल्या जाव्यात अशी मागणी करणारेसुद्धा आहेत. मात्र या दोन्ही…

निळू दामल्यांना दिसलेलं लवासा

लवासा. कुठे आहे हे लवासा? पुणे जिल्ह्यात, मुळशी तालुक्यातल्या मोसे नामक नदीवर बांधलेलं वरसगाव धरण. धरणाच्या भिंतीमुळे तयार झालेला, चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेला असा जलाशय. ह्या डोंगरांमधून अठरा गावं वसलेली - दासवे, भोईनी, मुगाव, कोळोशी, उगावली, धामण ओहोळ, गडले, साखरी, वदवली, पड…

अमृतानुभव - माझ्या नजरेतून ग्रंथपरिचय आणि माझे त्याच्याशी नाते

वि. वा. देशपांडे अमृतानुभव/अनुभवामृत हा आकाराने लहान, पण उपनिषदांच्या तोडीचा; जणू ज्ञानोपनिषदच.  असा हा ग्रंथ का लिहिला गेला, याबद्दल एक आख्यायिका आहे. ज्ञानेश्वरी लिहून झाली.  निवृत्तिनाथ म्हणाले -"गीतार्थ सांगितलास.  ज्ञानदेवा, आता तू स्वतःच्या अनुभवाचे वर्ण…

कथा देशाच्या फाळणीची आणि अडकलेल्या तीन जीवांची

इंग्लिश भाषेत  आपल्या लेखणीच्या सामर्थ्याने  जगभर नावलौकिक मिळवलेले भारतीय लेखक कर्नल मनोहर माळगावकर यांचे या वर्षी १६ जूनला  उत्तर कन्नड जिल्ह्यातील  जगलपेट या छोट्या गावी वयाच्या  ९७व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या  निधनाने ब्रिटिश साम्राज्य  आ…