- Log in to post comments
मजकूर
मित्रांनो !
एक नवी चर्चा/जनमत
"सु.शिं चा सर्वोत्तम मानसपुत्र कोण ? व त्याची सर्वोत्कृष्ट कथा/कादंबरी कोणती ?".
आपण सर्वांनी यात आपले मत नोंदवावे/भाग घ्यावा.
आपल्या मताबरोबर आपले विश्लेषण असल्यास अधिक आंनद होईल.
तसेच जनमत हा शब्द कोणत्या पुस्तकातील ?
-
देवेंद्र प्रभुणॅ
यवतमाळ.
चर्चा प्रकार
अभिप्राय
सागर
सागर · Wed, 16 Mar 2011 - 18:33
जनमत हा शब्द 'निमित्तमात्र' कथासंग्रहातील 'सावधान' या कथेत आलाय. :)
प्रवीण, समीर, चंद्या, नित्या, अव्या हे सगळे एकत्र आल्यावर कोणाला कोंडीत पकडायचे असले की 'जनमत' म्हणायचे ;) अगदी अलका समोर देखील हे जनमत होतेच ... पण शेवट मात्र गोड होतो या कथेचा
सुशिंचा मानसपुत्र कोण? हा खरे तर एक प्रकारे अन्यायच होईल कारण प्रत्येक मानसपुत्र हा वेगळ्या साच्यातला आहे.
(ज्यांना सुशिंची ओळख नाही त्यांना कल्पना यावी यासाठी विदेशी पात्रांची उदाहरणे मुद्दाम वापरली आहेत, अन्यथा सुशि प्रेमींना या दाखल्यांची गरजच नाही)
जेम्स बाँड स्टाईल बुटात लपवलेल्या स्प्रिंग तंत्राने उंचच उंच उड्या मारु शकणारा फिरोज इराणी जसा बायकांपासून लांब तरी बायकांच्याच लफड्यात अडकलेला. ज्याला स्वतःहून संकटे ओढवून घ्यायची सवय आहे
मंदार पटवर्धन सारखा सालस देखणा हिरो, त्याच्या अचाट क्षमतांनी जेम्स बाँड आणि शेरलॉक होम्स यांची एकत्रित आठवण करुन देतो...
दारा बुलंद हा प्रचंड ताकदीचा आभास थेट समोर उभा करतो. खांद्याच्या एका धडकेत भिंत फोडून टाकणारा पहाडी ताकदीचा दारा बुलंद एक अद्वितीय आनंद देतो. आणि हा दारा बुलंद अर्नॉल्ड पेक्षा कित्येक पटींने तगडा असावा असा फील वाचकाला देतो.
तर बॅरिस्टर अमर विश्वास प्रचंड बुद्धीमत्तेच्या जोरावर कोर्टात केसचा कशा फडशा पाडतो ते उत्कंठा ताणणारे असते. केस सुटलेली जोपर्यंत वाचून होत नाही तोपर्यंत वाचक अमर विश्वास चे पुस्तक सहसा खाली ठेवत नाही. शेरलॉक होम्स याच्याकडूनच शिकला असावा इतके सुंदर गुंता सोडवण्याचे कौशल्य अमर विश्वासचे आहे.
अशा चार हरहुन्नरी मानसपुत्रांत काय तुलना करणार? :)
मला तर आपले सगळेच वाचायला आवडतात.
निवड करायचीच आहे अशीच अगदी अट असेन तर पहिली पसंती अमर विश्वास या मानसपुत्राला देईन.
पण माझ्या लेखी सगळे मानसपुत्र तितकेच छान आहेत.
सुशिंची सर्वोत्कृष्ट कथा किंवा कादंबरी कोणती?
हाही असाच कूटप्रश्न आहे.
सुशिंचे जवळपास प्रत्येक पुस्तक पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटते, यातच सुशिंचे यश दडलेले आहे.
मला तरी पण वैयक्तिकरित्या
अनुभव ही कथा
आणि
जाई ही कादंबरी फार आवडते...
माफ करा मधुचंद्र राहिले ;) ... मला सर्वात जास्त मधुचंद्र आवडते
का कोसळ?
का दुनियादारी
का कोवळीक.....????
छे ..छे ..छे ..
सगळा गोंधळच उडाला आहे.
तरी पण जाई माझ्या खूप खूप आवडीची आहे :)
चित्रा राजेन्द्र जोशी
चित्रा राजेन्द… · Wed, 16 Mar 2011 - 15:25
देवेन्द्र आणि समस्त `सुशि'प्रेमी.......
ह्या चर्चेत मला थेट भाग घेता येणे अशक्य! कारण मी तर त्यांचे काहीही वाचलेले नाही. एक मुख्य फायदा म्हणजे `सुशि'प्रेमींकडून त्यांच्याविषयी सविस्तर माहिती समजेल. आणि मी नेमके काय वाचावे हे ठरवण्यासाठी त्याचा उपयोग होईल, एवढे मात्र नक्की........
वल्ली
वल्ली · Wed, 16 Mar 2011 - 16:49
देवेंद्र धन्यवाद. खास आमच्यासारख्या 'सुशि' प्रेमीसाठी हा धागा म्हणजे आनंदाचे झाडच.
सागरने मानसपुत्रांची ओळख करून दिलेली आहेच. त्याच्याशी सहमतच. मानसपुत्रांमध्ये तुलना अशक्यच. तरी सागरप्रमाणेच
माझीही पहिली पसंती 'बॅ. अमर विश्वास'
वेगवान कोर्टकथा, टकलावर खारका मारणारे बॅ. सी. पी दीक्षित, चांगला मित्र असलेला पण कोर्टात कायमच सरकारपक्षाच्या बाजूने साक्ष देत असलेला इ. ब्रिजेश लाल, गालातल्या गालात हसणारे जज्ज केसर. अमरचा गुप्तहेर मित्र गोल्डन डिटेक्टीव एजन्सीचा गोल्डी व सोनाली व खुनाचा खोटा आरोप आलेली व त्यातून अमरने सोडवलेली व पुढे त्याची प्रेयसी झालेली मोहिनी. सर्वच पात्र अगदी डोळ्यांसमोर तरळून जातात.
पण काही खटल्यातले अमर विश्वासचे रात्रीचे रूप 'रातों का राजा' फारसे पटले नाही. मूळ कोर्टकथेपासून जरा हे अतिशयोक्तीकडे जाणारे वाटते.
दुसरी पसंती म्हणजे 'साम' चा दारा बुलंद.
आम्हाला राजस्थान परिचीत झाला तो 'बुलंद' कथांनी. दाराचे जीवाला जीव देणारे ३ साथीदार-मधुर, बादल, शीतल, दाराची बहीण सलोनी. शान-ए. जैसलमेरचा अड्डा व त्यातील मारामार्या. राजस्थानातील क्रूरकर्मी डाकू. सद:रक्षणाय खलनिग्रहणाय वसा घेतलेला दारा बुलंद.
माणसांच्या सूक्ष्म निरीक्षणातून सुशिंनी अनेकानेक कादंबर्या फुलवल्या. त्यातली माझ्या आवडीची सर्वाधिक म्हणजे 'बरसात चांदण्यांची' एक हलकीफुलकी कादंबरी.
तर सर्वोत्कृष्ट कथेमध्ये मी त्यांची 'देवाघरची फुले' या कथेला अग्रकम देईन.
बाकी चर्चा जशी जशी पुढे सरकेल तसा तसा यात अधिक भाग घेत राहीनच.
अवांतरः दुनियादारी ही सुशिंची सर्वाधिक लोकप्रिय, अत्यंत गाजलेली कादंबरी पण माझ्या व सागरच्या दोघांच्याही सर्वोत्कृष्ट सुशि मध्ये तिचा समावेश नाही. हे जरा आश्चर्यच. नाही का?
सागर
सागर · Wed, 16 Mar 2011 - 18:48 · उत्तर
वल्ली मित्रा,
तुझा सविस्तर प्रतिसाद पाहून खरे तर प्रतिसाद कसा लिहायला हवा हेच कळाले...
अमर विश्वास ला पूर्णत्व देणारे गोल्डी, इन्स्पेक्टर ब्रिज, सोनाली, मोहिनी, जज केसर आणि अमर विश्वासचा खास बकरा बॅ. दिक्षित. या बॅ.दिक्षितांच्या २ खुबींनी त्यांच्या व्यक्तीमत्त्वाला एक मस्त उठाव आणला होता. एक त्यांचे टक्कल आणि दुसरे अमरच्या युक्तिवादाने छातीत कळ आली की जीभेखाली धरायच्या सर्बिट्रॉसच्या गोळ्या :)
या पात्रांनी मस्तच उठाव आणला होता अमर सिरिज मध्ये... रातोंका राजा बद्दल तुझ्याशी अगदी सहमत. मला वाटते म्हणूनच सुशिंनी अमर सिरिज मध्ये नंतर त्याला परत आणला नाही.
तीच गोष्ट दाराबद्दलही... मधुर, बादल, शीतल आणि सलोनी यांच्याशिवाय दाराची ओळख पूर्ण होऊच शकत नाही. मधुर च्या ट्रिक्स पण अफलातून. खास करुन आपटबार बॉम्ब आणि तत्सम कल्पनांमुळे एक वेगळे वजन होते त्याच्या व्यक्तीमत्त्वाला.
बाकीच्या विषयाबद्दल बोलायचे झाले तर 'बरसात चांदण्यांची' तर केवळ अप्रतिम पुस्तक आहे रे. एकदम सहीच.
चंद्रवदन आणि (केतकी का?) तिच्या प्रेमाची कथा अशी सुंदर फुलत जाते की बस्स ... त्यात तो किशोर अधेमधे तडमडत असतो... तुफान विनोदी पुस्तक आहे बरसात चांदण्यांची :)
सुशिंची विनोदी पुस्तके वाचायची लहर येते तेव्हा 'बरसात चांदण्यांची' , जाता येता, निमित्तमात्र, मधुचंद्र (ही शोकांतिका आहे तरी वाचताना खूप ठिकाणी हसू येते) या सर्व कादंबर्या एका ओळीने वाचतो...
तर सर्वोत्कृष्ट कथेमध्ये मी त्यांची 'देवाघरची फुले' या कथेला अग्रकम देईन.
याबद्दल काय बोलू मी आता? :( सुशिंची एक बेस्ट कथा मी वाचलीच नाही ...
अजून काहीतरी वाचायचे राहिलेच आहे रे सुशिंचे... पट्कन् सांग बरे ही कथा कोणत्या कथासंग्रहातील आहे ते?
म्हणजे पुण्याच्या भेटीत घेऊन टाकेन मिळत असेन तर...
अवांतरः दुनियादारी ही सुशिंची सर्वाधिक लोकप्रिय, अत्यंत गाजलेली कादंबरी पण माझ्या व सागरच्या दोघांच्याही सर्वोत्कृष्ट सुशि मध्ये तिचा समावेश नाही. हे जरा आश्चर्यच. नाही का?
दुनियादारी जरी गाजलेली असली तरी ही कादंबरी कित्येकांच्या मते सर्वोत्कृष्ट होऊ पण शकते आणि नाही पण.
कारण सुशिंचे साहित्यच एवढे दर्जेदार आणि विपुल आहे की त्यांतून सर्वोत्कृष्ट निवडणे कठीणच आहे. हे म्हणजे एकसारख्या सुंदर दिसणार्या मोत्यांच्या माळेतील त्यातल्या त्यात सुंदर मोती कोणता हे सांगणे झाले. जे खरे तर अवघडच आहे. तरी पण प्रत्येकाची एक आवड असते त्यानुसार सुशिंच्या आवडीच्या पुस्तकात दुनियादारी येईनही आणि नाही पण ... नाही आली तरी दुनियादारी ती दुनियादारीच ... तिचे महत्त्व अबाधितच राहीन :)
वल्ली
वल्ली · गुरुवार, 17 Mar 2011 - 05:00 · उत्तर
देवेंद्रचा धाग्याला तुझा प्रतिसाद पाहूनच सुशिंच्या मानसपुत्रांच्या आठवणी मनात अगदी रूंजी घालू लागल्या. मानसपुत्रांच्या बरोबरीने येणारी इतरही पात्रेपण महत्वाचीच. नाही का? तीच पात्रे तर मानसपुत्राला पुढे पुढे नेत असतात.
माझ्यामते सर्वोत्कृष्ट अमर कथा म्हणजे 'स्टार हंटर्स'. ही सर्वाधिक पृष्ठसंख्येची पण. यात मुळात अमरची एंट्री होती तीच मुळी जवळपास २०० पानांनंतर. त्याआधीचे कथासूत्र हे पण सुशिंच्या खास शैलीतले. ही शेवटची अमर कथा. किंबहुना सुशिंनी रहस्यकथा लिहिणे थांबवून सामाजिक कथांकडे मोर्चा वळवल्यानंतर १५/२० वर्षांनी वाचकांच्या मागणीनुसार 'अमर विश्वास'ला स्टार हंटर्स मधून परत आणले.
गावठी बाँब असे त्या प्रकारचे नाव. बाँबमध्ये विषारी पदार्थ भरलेले. अंगावर आपटल्यावर खाजल्यासारखी जाणीव. पाच मिनिटात खेळ खल्लास.
दाराचा सहकारी बादलचाही एका कथेत मृत्यु दाखवलाय. पण त्याचीही परत वापसी झालीच.
केतकी नाही. ती गंधाली. बरसात... तर अप्रतिम पुस्तक आहे. कधीही, कुठल्याही मनस्थितीत वाचायला घ्या. निखळ आनंदच देईल.
'देवाघरची फुले' सुशिंच्या गूढकथासंग्रहातील एक कथा आहे. पुस्तक बहुधा शेड्स किंवा मूड्स असावे. नक्की आठवत नाही. अत्यंत करूण कथा आहे ही. एका कुत्र्याच्या पिल्लाला केवळ मजा म्हणून दगड मारून त्याचा अंत करणार्या लहान मुलांची-देवाघरच्या फुलांची. पण ही कथा वाचू नकोस. वाचतांना अक्षरशः रडू येते.
यात तर काहीच संशय नाही.
मागे अल्फा मराठीवर (सध्याचा झी मराठी) दुनियादारी मालिकारूपात आणली होती. मालिका साफ फसली होती व यावर सुशिंनी वेळोवेळी खंत व्यक्त केली होती.
सागर
सागर · गुरुवार, 17 Mar 2011 - 07:30 · उत्तर
खरे तर स्टार हंटर्स मी फक्त तुझ्यामुळे विकत घेतली. कारण अमर विश्वासचे पुनरागमन माहिती असले तरी स्टार हंटर्स हे त्या पुस्तकाचे नाव आहे हे माहिती नव्हते. त्याबद्दल तुला मनापासून धन्यवाद :) अमरविश्वासची बहुतेक सगळी सिरिज आता माझ्या संग्रहात आली असेन :)
हो बादलचा मृत्यु चटका लावून जातो. पण त्याची वापसी पण आनंद देऊन जाते.
होय गंधालीच... तेच वाटत होते की काहीतरी नावात घोळ आहे. आणि तुझी आवडती कादंबरी म्हटल्यावर तुला आठवणारच :) चंद्रवदन नुसते गंधा गंधा करताना मजा येते वाचायला :)
देवाघरची फुले मी वाचणारच आहे. जाईने रडवले तर ही कथा का सोडेन?
तशा कोसळ, कोवळीक या कादंबर्याही रडवतात. इतकेच काय दुनियादारी पण रडवते
दिग्दर्शकाने दुनियादारीची जी वाट लावली ते पाहून सुशिंना खूपच राग आला होता. व ती खंत जाहीरपणे व्यक्तही केली होती...
कैवल्य
कैवल्य · गुरुवार, 17 Mar 2011 - 11:16 · उत्तर
च्यायला! त्या नुसत्या नावानंच मी त्या न पाहिलेल्या नाशिककरणीच्या प्रेमात पडलो होतो. आणि खून-मारामार्या, स्मगलिंग वगैरे भानगडींवर लिलया लिहिणार्या सु.शि.नं गंधा जी काही रंगवली आहे...वेऽऽड अगदी.
मिष्टर वल्ली, 'स्टार हंटर्स' मिळते आहे का? ह्या शनिवारी लगेच उचलेन म्हणतो. :)
कित्येकदा सहमत.
डीएसपीच्या भुमिकेत संजय नार्वेकर होता बहुतेक. आणि शिरिनच्या भुमिकेत शर्वरी असावी. (म्हणजे, शर्वरी आठवतेय, भुमिका आठवत नाहीये.)
नित्या घोडकेचा रोल केलेला आमचा एक मित्र संध्याकाळी भेटला की कथेची वाट लावलेली पाहून इतका कचाकचा शिव्या द्यायचा की बस्स. असो.
अवांतर: च्यायला... मंत्रजागर, माध्यम, काळंशार वगैरेला वाली आहे की नाही कुणी? :)
सागर
सागर · गुरुवार, 17 Mar 2011 - 11:24 · उत्तर
धम्या,
लेका स्टार हंटर्स आहे उपलब्ध. उचल बाजारातून. नाही मिळाली तर रसिक साहित्यमधे बघ १००% मिळेल. मी स्टार हंटर्स उचलून फक्त २०-२५ दिवसच झाले आहेत :)
अवांतर: च्यायला... मंत्रजागर, माध्यम, काळंशार वगैरेला वाली आहे की नाही कुणी?
हे काय धमू... भयकथांना वाली कसा मिळणार रे? बाकी समथिंग आणि सनसनाटी मला जास्त भारी वाटली होती. सुशिंच्या भयकथां मध्ये या २ कादंबर्या ...च् च् च् च् .... प्राक्तन राहिले... या ३ कादंबर्या थरकापवून सोडतात. तशा जाणीव, माध्यम , मरणोत्तर, अशी मालिका वाढतच जाते. तरी भयकथा हे सर्वोत्कृष्ट आवडीच्या पुस्तकात तसे येणे अवघडच आहे. कारण त्यात एकच रस असतो आणि बहुसंख्य सुशि प्रेमींना दुनियादारीसारख्या वातावरणात रमायला आवडते...
बाकी वल्ली सांगेनच
कैवल्य
कैवल्य · गुरुवार, 17 Mar 2011 - 11:44 · उत्तर
रसिकवाले सवलत देताना काचकुच करतात. मी सुशिची पुस्तकं 'भारत बुक हाऊस' मधून घेतो. वट्ट ५०% सवलतीत. :)
सागरु, प्राक्तनबद्दल असहमत. प्राक्तन भयकथेमध्ये नाही येऊ शकत. गूढकथा - येस. प्राक्तन ऐवजी काळंबेरं टाक त्या यादीत. सादिक अलीचा माथेरानचा बंगला, माकडं आणि शुकाबाबा.
आणि हो, अंमल, मातम विसरलास?
ह्याबाबत सहमत. पण ती मजाच और आहे.
थोडी वेगळी असलेली आणि मला आवडलेली २:
चुक भूल देणे घेणे.
लटकंती
सागर
सागर · गुरुवार, 17 Mar 2011 - 13:25 · उत्तर
रसिकवाले किमान २०-३० % तरी देतात रे
प्राक्तन मध्ये एक थरार अनुभवता येतो रे. अधून मधून अंगावर काटा आणणारी वर्णने भारी आहेत. म्हणून ती गूढकथा असली तरी भयकथा मानतो मी.
लटकंती जबर्याच आहे.. तुफान कॉमेडी ... प्रेतात्म्यांचा धुडगुस आणि मरणातही तुफान मज्जा :)
वाचक
वाचक · Fri, 18 Mar 2011 - 02:36 · उत्तर
नाही का आठवत कोणाला ? त्या सु. शिच्याच ना? का माझी काही चूक होतेय?
(मला आता ही सगळी पुस्तके वाचून २० च्या वर वर्षे झाली), इथे फक्त 'दुनियादारी' आहे माझ्याकडे.
मला तरी त्यांच्या इंगर्जी सिनेमावरुन बेतलेल्या मानसपुत्रांपेक्षा वेगवेगळ्या कथ/कादंबर्यात आलेले नायकच जास्त आवडतात. दुनियादारी मधले सगळेच, अट्टल मधला 'सालम' (चू भू द्या घ्या), बरसात.. मधला चंद्रवदन सगळेच 'अस्सल' वाटतात - 'ग्रे शेड्स' असलेले.
(साला तेव्हा पुस्तके समोर होती तेव्हा घ्यायला पैसे नव्हते, आता.... असो. )
वल्ली
वल्ली · Fri, 18 Mar 2011 - 04:16 · उत्तर
"अट्ट्ल" आणि "कट्टर" दोन्ही सुशिंच्याच, पण अट्टल चा नायक 'सालम' नाही. सालम हा 'सालम' कादंबरीतूनच भेटीस येतो. 'कट्टर' तर 'बुलंद' कथा आहे. 'अट्टल' बहुधा 'फिरोज' कथा आहे.
सागर
सागर · Mon, 21 Mar 2011 - 07:30 · उत्तर
पण अट्टल चा नायक 'सालम' नाही. सालम हा 'सालम' कादंबरीतूनच भेटीस येतो
सालम आहे माझ्याकडे. त्यातले वातावरण दारा बुलंदच्या कादंबर्यांत असलेली वातावरण निर्मिती करतात. तरी सालम स्वतःचे वेगळेपण टिकवून आहे. मस्तच आहे सालम. :)
कैवल्य
कैवल्य · Fri, 18 Mar 2011 - 11:50 · उत्तर
पहिला कंस सोडून बाकी संपुर्ण प्रतिसादाशी शब्दशः सहमती. (अगदी दुसर्या कंसातल्या वाक्याशीही.)
एके काळी मजा वाटायची, पण नंतर अमर विश्वासच्या केसेस पलटवण्याच्या मुद्द्यांसाठी, आणि मंदारच्या गुप्तहेरगिरीसाठी पुस्तकं वाचायला हवीहवीशी वाटत गेली.
दाराबद्दल काय बोलावं? खरं सांगतो, स्पॅगॅटी वेस्टर्न सिनेमे न पाहण्याचं, आणि पाहिले तरी कणभरही न कळण्याचं जे वय होतं, त्या वयात दारा बुलंदच्या गोष्टी वाचून वाचून नंतर क्लिंट इस्टवूडला पाहतानाही मला दारा बुलंदच आठवायचा. :) सु.शि.नं एव्हढं मोठं गारुड केलं राव.
वल्ली
वल्ली · गुरुवार, 17 Mar 2011 - 18:47 · उत्तर
समथिंग तर खरोखरच जबरदस्त आहे. अदृश्य शक्तीचे 'समथिंग' वर्णन सुशिंनी खिळवून टाकणार्या शैलीत केले आहे.
त्यांच्या अजून काही भयकथांमध्ये
सैतानघर-ही तितकीशी नीट आठवत नाही.
धुकं धुकं - ही बहुधा जहाजावर आधारलेली कादंबरी. सर्व जहाजाला हळूहळू कवेत घेउन वेढून टाकणारे दाट धुके. व धुक्यातून दिसणारे गूढ डोळे. कादंबरी अगदी भयव्याकूळ करून टाकते.
माझ्यामते तरी समथिंग आणि धुकं धुकं सुशिंच्या सर्वोत्तम भयकथा.
सागर
सागर · Mon, 21 Mar 2011 - 07:38 · उत्तर
सुशिंचे समथिंग माझ्यामते सर्वात खिळवून ठेवणारी भयकादंबरी आहे.
२ जुळ्या भावांची ही कादंबरी, हिरवे डोळे... लोंबत्या जीभा... अक्राळविक्राळ आकृत्या अशी कोणतीही वर्णने नसूनही केवळ शब्दसामर्थ्यांच्या बळावर प्रचंड भय निर्माण करण्यात यशस्वी झालेली आहे. यातल्या दानिश या जिवंत राहिलेल्या जुळ्या भावाच्या भूमिकेने मला वेड लावले होते :)
गढूळ ही देखील अशीच सुंदर कादंबरी आहे सुशिंची. गढूळ मी खूप वर्षांपूर्वी वाचलेली होती आणि आता ती बहुतेक मिळतही नाही बाजारात. पण समथिंगनंतर गढूळ जास्त आवडली होती मला. आणि त्यानंतरची सनसनाटी...
बाकी माध्यम, जाणीव, मरणोत्तर, इ...... अनेक आहेत. पण वरील ३ जास्त आवडत्या आहेत माझ्या.
(धुकं धुकं वाचायची राहिली आहे त्यामुळे ती कशी आहे ते माहिती नाही.)
वल्ली
वल्ली · Mon, 21 Mar 2011 - 07:46 · उत्तर
मी पण गढूळ खूप वर्षांपैकी वाचलेली होती. आता आठवत नाही तिचे कथानक.
'जाणीव' थोडीफार ड्रॅक्युलावरच आधारीत आहे ना. मला तिचे मुखपृष्ठ आठवते. ड्रॅक्युलासारखेच टोकदार सुळे आलेल्या माणसासारखेच काहीसे होते ते.
सागर
सागर · Mon, 21 Mar 2011 - 07:57 · उत्तर
होय ड्रॅक्युला वरच आहे. पण माध्यमही तशीच आहे.
जाणीव आणि माध्यम जवळपास एकसारख्या थीमवर आहेत तरी दोन्ही पूर्ण वेगळी आहेत
देवेन्द्र प्रभुणे
देवेन्द्र प्रभुणे · Wed, 16 Mar 2011 - 17:21
मित्रानो,
मी सु.शिं.चा एकेरी उल्लेख कसा करेल?
सर्वोत्क्रुष्ट कथा/कादंब्ररी म्हण़जे,त्या मानसपुत्राची क/का!
तरीपण,एकूणातील सर्वोत्तम कथा/कादंबरी देखील नोंदवा.
म्हणजे तीन गोष्टी- मानसपुत्र,त्याची बेस्ट क्था/कादंबरी
व ए़कूणातील बेस्ट कथा/कादंबरी,
-देवेन्द्र प्रभुणॅ,यवतमाळ.
सागर
सागर · Wed, 16 Mar 2011 - 18:29 · उत्तर
एकतर त्या मानसपुत्राच्या सर्व कथा वाचलेल्या हव्यात
त्यातही चांगली निवडायची म्हणजे कठीणच काम आहे देवेन्द्र
पण तरी थोडा प्रयत्न करतो....
अमर विश्वास - ऑर्डर ऑर्डर / वन्डर ट्वेल्व्ह
फिरोज इराणी - ट्रेलर गर्ल / पांचाली ( टोपाझ प्रकरणाच्या पुस्तकाचे नाव आठवत नाही :( )
मंदार पटवर्धन - ब्लॅक किंग / पाशवी
दारा बुलंद - सन्नाटा / खजिना
संदीप चित्रे
संदीप चित्रे · Wed, 23 Mar 2011 - 18:54 · उत्तर
'जुगार' !
फिरोज इराणी ह्या मानसपुत्राचे पहिले पुस्तक..
आणि ... 'शॅली... शॅली'चा कुणीच कसा उल्लेख केला नाही?
ते पुस्तक वाचतानाच सिनेमास्कोप सिनेमा बघत असल्याचा भास होतो :)
सागर
सागर · Wed, 23 Mar 2011 - 18:59 · उत्तर
शॅली शॅली आणि धुकं धुकं ही २ पुस्तके मला लायब्ररीत कधीच मिळाली नाहीत त्यामुळे राहिली वाचायची :(
अर्थात दोन्ही पुस्तके परस्पर विरोधी आहेत. एक मानसपुत्रकथा तर एक भयकथा :)
देवेन्द्र प्रभुणे
देवेन्द्र प्रभुणे · गुरुवार, 17 Mar 2011 - 14:02
मित्रानो,
वरील दोन्ही पुस्तके सध्या ई-रसिक वर तरी उपलब्ध नाहीत.
यवतमाळ च्या ग्रंथालयात देखील नाहीत.
कोणी पंखा मिळवून देऊ शकेल काय?
(स्टार हंट्रर्स वाचली आहे.(खुपदा).
बरसात चांद्ण्यांची अजून अनुभवायची आहे.
प्लीज्,जरा तेवढे पुस्तकांचे पघा राव्,लै उपकार व्हतील की वो!
-देवेन्द्र प्रभुणॅ,यवतमाळ.
कैवल्य
कैवल्य · गुरुवार, 17 Mar 2011 - 14:09 · उत्तर
माझ्या माहितीनुसार 'बरसात चांदण्यांची' आउट ऑफ प्रिंट आहे. :(
सागर
सागर · Mon, 21 Mar 2011 - 08:01 · उत्तर
खरे आहे.
वल्ली पण हे पुस्तक मिळवण्यासाठी आतुर आहे.
मी नशीबवान आहे याबाबतीत :)
मी हे सुंदर पुस्तक कधीच घेतले होते ...
जरा सबुर मित्रांनो.... सुशिंची पुस्तके ऑफप्रिंट झाली तरी पुन्हा बाजारात येतात... आणि बरसात चांदण्यांची तर तुफान खपणारे पुस्तक आहे. तेव्हा लवकरच हेही पुस्तक बाजारात येईन ... तोपर्यंत सबुरीने वाट बघा :)
वल्ली
वल्ली · Mon, 21 Mar 2011 - 07:43
सुशिंच्या मानसपुत्रांची वाहने पण अगदी खास सुशि स्टाईल. एकदम अत्याधुनिक, टकाटक, अत्यंत दुर्मिळ असलेली.
मंदार पटवर्धन- फेअरडील
डॅनी- पाँटेक (डॅनी हे पात्र सुशिंनी अगदी डॅनी डेंन्झोपा या कलाकारावरून घेतले होते की काय कोण जाणे. मला तर तो कलाकारच डोळ्यांसमोर यायचा वाचताना)
प्रिन्स- हा धिप्पाड असल्याने याची डॉज होती. (सागर-नक्की ना?)
फिरोज इराणी- स्पीडब्रेक
बॅ. अमर विश्वास - डॅमलर
दिनेश सायगल, ब्रिजेश लाल आणि मुकेश भाटीया या विचार्या पोलीसांना मात्र जीप यायची वाट्याला.
आणि हो, दारा बुलंद राहिलाच.
त्याचा मात्र घोडा- तुफान नावाचा. एकदम लाजवाब.
सागर
सागर · Mon, 21 Mar 2011 - 07:54 · उत्तर
वल्ली मित्रा तू सुशिंचा एक तुफान पंखा आहेस... तुझी माहिती चुकीची असूच शकणार नाही :)
प्रिन्सची डॉजच होती...
मला पण डॅनीचे पात्र वाचताना डॅनी डेंन्झोपाच आठवायचा. :) हा सुरे खूप छान फेकायचा नाही ? ;)
प्रत्येक मानसपुत्रांची आणि त्याच्या मित्रांची वाहने वेगळी ... हाणामारीची पद्धत वेगळी... पण प्रत्येक पात्राला एक सुंदर उठाव देणारी. फिरोज इराणीची बैदुले... स्प्रिंगवाले शूज... जबरदस्तच...
तितक्याच तुल्यबळ शत्रूचा जवळपास प्रत्येक कादंबरीत उल्लेख.
जसा
मंदार पटवर्धन चा शत्रू ब्लॅक किंग
फिरोजचे टोपाझ प्रकरण
भन्नाट मध्ये मंदार आणि फिरोज एकत्र... बहुतेक हव्यास मध्येदेखील दोघे एकत्र होते...
तर
एका कादंबरीत तर फिरोज आणि अमर एकत्र आलेले. फिरोजची केस अमरने लढवलेली आहे. कोणते बरे ते पुस्तक??? आठवत नाही बुवा. तुला माहिती आहे का रे मित्रा ? टेरिफिक..?? बहुतेक टेरिफिकच असावे.पण दुसरे असेन तर प्लीज सांग :)
वल्ली
वल्ली · Mon, 21 Mar 2011 - 08:08 · उत्तर
डॅनी अव्वल सुरेबाज होता. अचूक फेकायचा. :)
ब्लॅक किंग म्हणजे हरिश चंदानी
त्याचे साथीदार पण एकदम मंदारच्या तोडीस तोड. जुगलबंदी ठरलेलीच.
मंदार-ब्लॅक किंग(ब्लॅक किंगची प्रेयसी सायली ना?)
डॅनी-एल्पार
प्रिन्स (याचे नाव तपन सिन्हाच ना?)-पहाड
भन्नाट मध्ये मंदार फिरोज एकत्र होतेच. हव्यासबद्दल इतके आठवत नाही.
टेरीफीक मध्येच फिरोज -अमर आहेतच दुसरे मलाही आठवत नाही. :(
इ. ब्रिजेश लालही खुनामध्ये आरोपी झाला होता एकदा. ती कादंबरी कुठली रे? बहुधा 'कायद्याचे हात' ??
सागर
सागर · Mon, 21 Mar 2011 - 08:19 · उत्तर
हे डिटेल्स मलाही आठवायला डोक्यावर ताण द्यावा लागतो
तू तर जबरदस्त मेंदूचा मालक आहेस रे मित्रा :)
येस्स सायली, एल्पार, पहाड या सर्वांचा सव्वाशेर हरिश चंदानी...
पण ब्लॅक किंगची सिरिज जबरदस्तच होती. मला मंदार सिरिजमध्ये ब्लॅक किंगनेच सगळ्यात जास्त मोहात पाडले होते... :)
ब्रिज ला खुनाचा आरोपी नीटसे आठवत नाही रे... पण कायद्याचे हात असू शकेन... जरा निवांत बघून सांगेन... कारण या आठवड्यात अमर सिरिजचेच पुस्तक वाचणार आहे तेव्हा पुस्तके चाळताना हे नक्की कळेन मला :)
वल्ली
वल्ली · Mon, 21 Mar 2011 - 08:27 · उत्तर
ह्याचे श्रेय सुशिंनाच. त्यांनीच त्यांच्या पुस्तकांकरवी मनावर एव्हढे गारूड करून ठेवलेय की त्यांच्या पात्रांच्या आठवणी पुसल्या जाणे इतक्यात तरी अशक्यच.
सुशिंशिवाय इतरांचा विचार करू जाता माझा मेंदू काही नीट काम करत नाही. अपवाद श्री. ना आणि गोनीदांचा.:)
आणि तू तरी काय कमी आहेस का रे लेका. तू तर सुशिंचा एसी आहेस. ;)
सागर
सागर · Mon, 21 Mar 2011 - 08:36 · उत्तर
एसी होण्यासाठी समग्र सुशि वाचून पूर्ण करावा लागेन आधी ;)
कैवल्य
कैवल्य · Fri, 18 Mar 2011 - 11:06
एकेक करत बरेच सुशिवेडे जमलेत की कट्ट्यावर! :)
मस्त रे.
वल्ली
वल्ली · Mon, 21 Mar 2011 - 09:33
सुशिंची 'प्रयास' वाचलीय का कोणी?
एका गावात नुकताच ब्यांकेत नोकरीवर लागलेला एक साधाभोळा तरूण. बॅंकेवर दरोडा पडतो. तरूणाचे आयुष्य उधवस्त होते. दरोड्यात सामील असल्याच्या संशयावरून दरोडेखोरांबरोबरच त्यालाही आत टाकले जाते. त्यांच्याबरोबर राहून त्यांच्याच ट्रिक्स शिकून दरोडेखोरांचा बदला घेतो. स्वतःवरचा कलंक धुवून काढतो.
एकदम जबरदस्त विनोदी, गंभीर, थरार असे रस असलेली कादंबरी-प्रयास
अजून एक कादंबरी आहे. कथानायक-हर्षद. एक जीव द्यायला निघालेला एक तरूण. अशिच एक तरूणी भेटते. आयुष्यात अचानक बदल घडून येतो. एका माणसाच्या तावडीत सापडतो. त्यातून हे दोघे कशी सुटका करून घेतात त्याचे मनोवेधक चित्रण.
कादंबरीचे नाव नेमके आठवत नाही आता.
कैवल्य
कैवल्य · Mon, 21 Mar 2011 - 09:52 · उत्तर
>>सुशिंची 'प्रयास' वाचलीय का कोणी?
सुशांत ठाकूर. :)
व्हिलनः पाशा आणि ३ साथीदार.
बदल्याचं ठिकाण : आझादपूर. :)
वल्ली
वल्ली · Mon, 21 Mar 2011 - 10:19 · उत्तर
भारी रे धम्या. :)
सागर
सागर · Mon, 21 Mar 2011 - 10:38 · उत्तर
अरे देवा...सुशिंची अजून किती पुस्तके राहिली आहेत वाचायची :(
कैवल्य
कैवल्य · Mon, 21 Mar 2011 - 10:53 · उत्तर
वल्लीनं सांगितलेल्यातलं दुसरं मलाही आठवत नाहीये. :)
सागरु,
तू 'चुक भूल देणे घेणे' वाचलंयस का? नक्की वाच. आपल्यासारख्यांच्या मनात सु.शि. नावाची एक टिपीकल प्रतिमा झालेली असते ती पुर्ण चुकीची ठरवणारं पुस्तक आहे हे.
अवांतरः संदेह कथासंग्रह वाचलाय? भुताटकीपेश्शल आहे.
सागर
सागर · Mon, 21 Mar 2011 - 11:06 · उत्तर
चुक भूल देणे घेणे' वाचले आहे रे धम्मू... अगदी अलिकडेच वाचलंय. ३-४ महिन्यांपूर्वी.
तुझ्याशी सहमत आहे. सुशिंचे रंग तरी किती आहेत? असा प्रश्न हे पुस्तक वाचल्यानंतर पडल्याशिवाय रहात नाही :)
संदेह नाय वाचला रे :(
सुशिंचे हे अजून एक वाचायचे राहिले यार ..
आता जरा सुहास शिरवळकरांची सगळी पुस्तके झाडून बाजारातून उचलली पाहिजेत...
बघतोच आता कायकाय मिळते ते :)
अंतिम वाचले आहे का कोणी ?
एकदम सुंदर आहे,
समुद्रावरची एक सुंदर विस्मयकथा आहे :)
अवांतरः वल्लीला पडलेला प्रश्न मलापण पडलेला आहे. हर्षदची कथा मी वाचलीय पण नाव आठवत नाहीये :(
वल्ली
वल्ली · Mon, 21 Mar 2011 - 16:24 · उत्तर
चूकभूल देणे घेणे कदाचित वाचले असावे फार पुर्वि. आता काहीच आठवत नाही. 'अंतिम'चेही तसेच.
संदेह नावच पहिल्यांदा ऐकतोय. बहुतेक आधीच्या कथासंग्रहाचे पुनर्मुद्रण असावे व त्यात पहिले नाव बदलून 'संदेह' करण्यात आले असावे.
स्वगतः सुशिंची पुस्तके परत वाचायला लायब्ररीच लावावी म्हणतोय. २०० पेक्षा जास्त पुस्तके विकत घेणे तसे अशक्यच.
सागर
सागर · Tue, 22 Mar 2011 - 07:19 · उत्तर
अंतिम ही कादंबरी एका तांडेलाच्या ७ पिढ्यांची कहाणी आहे. दरवेळी तांडेलाचा कर्ता पुरुष वंशाला दिवा देऊन देवमाशाशी लढायला जातो... तो परत कधी येत नसे.... सातव्या पिढीतला तांडेलांचा वारस (बहुतेक भोला नाव होतं त्याचं) तो यावेळी देवमाशाला जिंकायचंच असा प्रण करतो. आणि तयारीनिशी निघतो.
बाकी पुढे काय होते ते कळण्यासाठी 'अंतिम' वाचाच ;)
संदेहबद्दल वल्लीशी सहमत आहे. जुन्या पुस्तकाचे नव्या नावाने पुनर्मुद्रण असावे संदेह म्हणजे. मीही कधी ऐकले नाही या पुस्तकाबद्दल.
वल्ली
वल्ली · Tue, 22 Mar 2011 - 07:30 · उत्तर
आता आठवले अंतिम.
परत एकदा वाचून त्याचा आस्वाद घेउ म्हणतोय.
सागर
सागर · Tue, 22 Mar 2011 - 07:35 · उत्तर
ऑर्डर दिली आहे कालच
मिळेल लवकरच :)
वल्ली
वल्ली · Mon, 21 Mar 2011 - 16:37
'बुलंद' कथांतील खलनायक आठवतात का काही?
अख्तर सुलतान, फिदा कुरेशी, धिल्लन हे काही पुस्तकांत परत परत आले होते. त्यातला अख्तर सुलतान तर बरेच पुस्तकांत होता.
गोरख च्या टोळीशी लढतांना कदाचित पहिल्या 'बादल'चा मृत्यु झालाय ना.
अजून काही नाव घेण्याजोगे खलनायक फारसे आठवत नाही.
'खजिना' मधला (?) ठाकूर जर्नेलसिंहाचा जबरदत देह नजरेसमोर उभा राहतो. पण ते खलनायक नव्हेत ना?
पोखरणच्या वाळवंटातील वाळूची पोकळी आठवतेय का मित्रांनो?
कैवल्य
कैवल्य · Mon, 21 Mar 2011 - 16:54 · उत्तर
बादल एकदा मरुन परत 'लोकाग्रहास्तव' जिवंत झाला. :)
>>पोखरणच्या वाळवंटातील वाळूची पोकळी आठवतेय का मित्रांनो?
बास का देवा?
पाठलाग करणार्याला चकवून, फिरवून वाळूच्या दलदलीपाशी आणायचं ही तर खासियतच की. :)
एक कोणतीशी वाचलेली गोष्ट अर्धवट आठवतेय.
एक तरुण ठाकूर, तो लक्षवेधी. दुसर्या ठाकूराच्या मुलीवर त्याचं प्रेम. तिथे मुलीचा बाप त्याला नकार देतो. शाकोरीमध्ये बाजारात बंदुकांच्या कारखान्यात काम करतो. त्या मुलीच्या स्वयंवरात की कायसं तो पोचतो. ठाकूराशी युध्द होतं, त्या डाकू येतात, म्हातार्या ठाकूराला मारतात, मुलीवर बलात्कार करतात. दारा तिथे येतो, ठाकूर की मुलगी बदला घे अशी विनंती करुन प्राण सोडतो/ते. त्यापुढं टिपीकल दारा बुलंद! (बहुतेक मी दोन कथांची सरमिसळ करतोय.)
पण ते पुस्तक कोणतं?
वल्ली
वल्ली · Mon, 21 Mar 2011 - 17:01 · उत्तर
ते माहित नसून कसं चालंल राव.
कायसं दोन अक्षरीच नाव आहे त्या पुस्तकाचं
काय ते आठवत नाही.
शाका का शिवा का अजून काही???
कैवल्य
कैवल्य · Mon, 21 Mar 2011 - 17:04 · उत्तर
आता आलं का सागरुची वाट पाहणं?
तोवर डोक्याला नुसता भुंगा! :(
वल्ली
वल्ली · Tue, 22 Mar 2011 - 04:07 · उत्तर
आठवलं...आठवलं म्हाराज.
काल रात्री संगणक बंद करून झोपायला गेलो ते पुस्तक कोणते या विचारातच अन अवचित पुस्तकाचे नाव डोळ्यांसमोर चमकून गेले.
ते पुस्तक आहे 'शोला'.
सागर
सागर · Tue, 22 Mar 2011 - 07:15 · उत्तर
ते पुस्तक आहे 'शोला' :)
शोला जो भडके बादल जो बरसे ;)
संदीप चित्रे
संदीप चित्रे · Wed, 23 Mar 2011 - 18:50 · उत्तर
माझ्या आठवणीप्रमाणे 'गिधाड' ह्या पुस्तकात पहिला बादल मरतो.
वल्ली
वल्ली · Tue, 22 Mar 2011 - 07:40
फिरोजचे मानलेले वडील कोण रे? फिरोजला लहानपणापासून सांभाळतात ते. कायतरी बंगाली उद्योगपती ना ते? सरकार का असेच काहीसे नाव आहे त्यांचे.
आणि दाराची पहिली कथा 'वॉटेड'च ना?