- Log in to post comments
मजकूर
मित्रांनो !
एक नवी चर्चा/जनमत
"सु.शिं चा सर्वोत्तम मानसपुत्र कोण ? व त्याची सर्वोत्कृष्ट कथा/कादंबरी कोणती ?".
आपण सर्वांनी यात आपले मत नोंदवावे/भाग घ्यावा.
आपल्या मताबरोबर आपले विश्लेषण असल्यास अधिक आंनद होईल.
तसेच जनमत हा शब्द कोणत्या पुस्तकातील ?
-
देवेंद्र प्रभुणॅ
यवतमाळ.
चर्चा प्रकार
अभिप्राय
सागर
सागर · Tue, 22 Mar 2011 - 07:45 · उत्तर
फिरोजबद्दल बरोबर आहे. बंगाली उद्योगपतीच ते...
पण दाराच्या पहिल्या कथेबद्दल शंका आहे. वॉन्टेड असूही शकेन. पण मला सन्नाटा किंवा असह्य असावेसे वाटते आहे ..
वॉन्टेड मध्ये हिम्मत बुलंदचा (दाराच्या वडिलांचा) इतिहास असेन तर मग तेच पहिले असावे.
वल्ली
वल्ली · Tue, 22 Mar 2011 - 07:50 · उत्तर
हिंमत बुलंदचा इतिहास तसा अजूनही काही पुस्तकांतून डोकावून गेलेला आहे.
हिंमत बुलंद ला अख्तर सुलतानच मारतो ना?
सागर
सागर · Tue, 22 Mar 2011 - 08:11 · उत्तर
बहुतेक अख्तर सुलतानच मारतो हिम्मत बुलंदला आणि दारा बदला घेतो असे वाचलेय
वल्ली
वल्ली · Tue, 22 Mar 2011 - 08:18 · उत्तर
धम्याच काय ते सांगेल आता.
असो. ५० प्रतिक्रिया झाल्यात या सुशिंच्या धाग्यावर.
त्याबद्दल देवेंद्र प्रभुनेंचे अभिनंदन.
त्यांच्या प्रतिक्रियांची पण वाट पाहतोय.
सुशिंच्या अजूनही काही हटके कादंबर्यांवर चर्चा करू इथेच.
सागर
सागर · Tue, 22 Mar 2011 - 08:47 · उत्तर
असो. ५० प्रतिक्रिया झाल्यात या सुशिंच्या धाग्यावर.
त्याबद्दल देवेंद्र प्रभुनेंचे अभिनंदन.
सेम टू सेम :)
सुशिंच्या अजूनही काही हटके कादंबर्यांवर चर्चा करू इथेच.
हा धागा दुसर्या पानावर गेलाय तेव्हा नवीन धागा सुरु केला तर जास्त चांगली चर्चा करता येईन :)
वल्ली
वल्ली · Tue, 22 Mar 2011 - 09:16 · उत्तर
कर सुरु तू नविन धागा. सुशिकट्टा २ म्हणून. :)
सागर
सागर · Tue, 22 Mar 2011 - 10:00 · उत्तर
भाग -२ इथे टिचकवा :)
देवेन्द्र प्रभुणे
देवेन्द्र प्रभुणे · Tue, 22 Mar 2011 - 10:06
मित्रानो,
धन्यवाद!
धागा सुरु करताना ५० वर प्रतिक्रियायेतिल असे वाटले नव्हतेच.
मी मुलत: इंग्रजी साहीत्याचा अभ्यासक पण कधीतरी,कोठेतरी सु.शिं.ची अवचित गाठ पडली अन-----
आपण अश्या वेचक प्रतिक्रिया दिल्यात की!
ये हुयी ना बात!
मला स्वत:ला देखिल अमर विश्वास कथा आवडतात.
(ऑब्जेक्शन युवर ऑनर्/स्टार हंटर्स विशेषतः),
तसेच जाई,कोवळीक्,असीम्,दास्तान्,तलखी देखिल!
फिरोज ईराणी हा एकंदर फिरोज खान वर बेतलेला असावा.
त्याचे मानसवडील म्हण़जे सर बिमल र्रोय!
ए़कंदरीत्,आपल्या प्रतिसादा ने खुष झालो!भुतकथा व गुढ्कथा फारश्या वाचल्या नाहीत.
जाता जाता-बोगम हे पात्र कोणत्या पुस्तकातील?(प्रयत्न करा)
सु.शिं.चे वैशिष्ट्य महण़जे सुरेख नावे!
-देवेन्द्र प्रभुणॅ,यवतमाळ.
वल्ली
वल्ली · Tue, 22 Mar 2011 - 10:13 · उत्तर
फिरोज इराणीच्या मानसवडीलांचे नावच डोक्यात खाजवत होतो.
ते आत्ता लक्षात आणून दिलेस. अगदी बरोबर. सर विमल रॉयच.
'बोगम' पात्र काही लक्षात येत नाहीये पण. वाचल्यासारखे पुसटसे आठवतेय.
संदीप चित्रे
संदीप चित्रे · Wed, 23 Mar 2011 - 19:00
असीम, पहाटवारा, क्षणोक्षणी, ओह! गॉड, सॉरी सर!, क्षितीज, झूम, कल्पांत
ह्या सामाजिक कादंबर्या विसरलात का मित्रांनो?
'कथा पौर्णिमा' हा कथा संग्रहही वाचलायत का?
सागर
सागर · Wed, 23 Mar 2011 - 19:22 · उत्तर
असीम, सॉरी सर, ओ गॉड आणि पहाटवारा आहेत संग्रहात :)
कथा-पौर्णिमा पण वाचलाय संग्रह. पण आठवत काही नाही आता :(
वाचायला हातात घेतल्यावर सगळे आठवेल.
संदीप सुशिंनी ग्रंथसंपदाच एवढी विपुल निर्माण केली आहे की वाचलेले पुस्तकही सहज आठवत नाही :)
वल्ली
वल्ली · गुरुवार, 24 Mar 2011 - 04:23 · उत्तर
नावावरून तरी कथा पौर्णिमा हा कौटुंबिक किंवा सामाजिक कथांचा संग्रह वाटतो.
पण प्रत्यक्षात तो आहे धमाल विनोदी कथांचा संग्रह. १५ विनोदी कथा असल्याने कथा पौर्णिमा नाव दिले गेले.
चिगो
चिगो · Mon, 4 Apr 2011 - 14:09
खुप आनंद झालाय राव ह्या कट्ट्यावर येवून... सुशिंसाठी मी पण पुरता वेडावलो आहे. सध्या आसामात त्यांच्या पुस्तकांची पारायणं सुरु असतात...