मुखपृष्ठ
सत्तांतर

माझे शेल्फ

सत्तांतर

इंग्रजी शीर्षक
Sattantar
सारांश

हे पुस्तक माडगूळकरांनी गोंदिया जिल्ह्यातील नागझिराअभयारण्यातील माकडाच्या टोळीचे निरिक्षण करून लिहिले आहे.या पुस्तकातील निसर्गाचे वर्णन,जंगलातील विविध विभ्रम,माकडांच्या टोळीचे सूक्ष्म निरिक्षण केवळ अप्रतिम!सत्तांतर हे व्यकंटेश माडगूळकर यांचं माकडांच्या टोळीमधील सत्तासंघर्षावर आणि त्यांच्या टोळीयुद्धावर आधारलेले छोटेखानी पुस्तक आहे. टोळीप्रमुख (हुप्प्या) होऊन सत्ता मिळवण्यासाठी आणि मिळालेल्या सत्तेतून उपभोग घेण्यासाठी ही माकडं कोणत्या थराला जातात याचे वर्णन या पुस्तकात आहे. साम, दाम, दंड, भेद ही नीती वापरून प्रसंगी लहानलहान माकडांना मारून सत्ता मिळवली जाते... लेखक या गोष्टीकडे जंगलमधील प्राणिजीवन यादृष्टीने पाहतात... परंतु मानवाचा पूर्वज माकड होता असे म्हंटले जाते... सध्या त्याचीच प्रचिती येत आहे.ताकदीच्या जोरावर चालणारा हा सत्तांतराचा खेळ आपल्याला समाजात सुद्धा चालताना दिसतो.फरक फक्त एवढाच की मानवाचा खेळ हा स्वार्थी असून माकडांचा खेळ स्वार्थी नसून आपल्या टोळीला सोबत घेऊन चालणारा आहे.कालचक्राप्रमाणे हा खेळ सुद्धा शेवटपर्यंत चालत राहणारा आहे..आपल्याला आयुष्यातील काही गोष्टीं खरंच किती विचित्र आणि भयानक असतात याची प्रचिती आपल्याला सत्तांतर वाचत असताना येते.. या पुस्तकाबद्दल लिहायला खूप काही आहे पण येथे वाचल्यापेक्षा ते तुम्ही पुस्तकांतच वाचून अनुभवावे...

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
77
भाषा
मराठी
किंमत
50.00
समुदायाने जोडले
बंद