माझे शेल्फ
स्थलांतर
पाने १४४
प्रथम स्थलांतर या कादंबरीचे ऑडिओ भाग ऐकताना किंवा हे पुस्तक वाचताना आपल्या असं लक्षात येतं की आपण आपल्या आयुष्यामध्ये जीवन जगत असताना खरोखरच ह्या चुका करत आहोत का किंवा हे पुस्तक आपल्या जीवनाचा एक भाग आहे का त्यातील बऱ्याच गोष्टी हे आपल्याच आहेत असं वाटतं आणि नकळत डोळ्यातून गंगा आणि यमुना वाहू लागतात व त्या वाहत वाहत आठवणींच्या सागराला जाऊन मिळतात.
१)माणसं चुकीच्या जागी, चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या नात्यांनी आणि चुकीच्या काळात ही जन्माला येतात. हेच खरं त्याला आपण काय करू शकणार? प्रवासाचे मार्ग आखणे आपल्या हाती थोडीच असतं. त्यावरून आत्तापर्यंत निमूट पणे चालत जाणं एवढेच असतं. हो की नाही?
२)दुसऱ्या कोणात स्वतःला वेड्यासारखं बांधून घ्यायचे म्हणजे स्वतःची सुटका आहे असे मी स्वतःला किती सहजपणे पटवून दिलं.
३)विसरून जाणे ही गोष्ट लहान वयातच जमते, पुढे कितीही प्रयत्न केला तर त्याची सवय होत नाही.
४)आपण आपल्याच माणसावर ज्याच्यावर आपण सगळ्यात जास्त प्रेम करतो ना त्याच्यावरच असं सारखं आणि नेहमी रागावू शकतोस. अगदी नैसर्गिकय ते.
५)लहानपण अशा दृष्टीने खूप सोयीस्कर असतं, गोष्टी जेवढ्या उत्कटतेने हव्या असतात, तेवढ्याच आवेगाने त्याची तीव्रता कमी होत जाते.
६)आपण अशी कुठलीतरीच माणसं एकत्र का येतो?, आणि विशिष्ट एकत्र का येत नाही?
वरील प्रकारे व यांसारखी अनेक प्रश्न आपल्याला हे पुस्तक वाचत असताना किंवा ऐकताना पडतात व या प्रश्नांची उत्तरे सुद्धा लगेच या पुस्तकांमध्येच मिळतात किंवा काही प्रश्नांची उत्तरं हे आयुष्य जगत असताना काही काळानंतर मिळतात अशा प्रकारचं जबरदस्त पुस्तक लेखक सानिया यांनी आपल्यासारख्या वाचन प्रेमी पर्यंत लिखाण करून पोहोचवल आहे.
उद्या पासून कामानिमित्त बाहेर गावी जावे लागणार आहे त्यामुळे नाईलाजास्तव ५-६ दिवस चॅनलला सुट्टी द्यावी लागणार आहे.😊 पुढील आठवड्यात लवकरच नवीन पुस्तका सहीत भेटुयात.🙏