एवढ्यात तुम्ही कोणती पुस्तके विकत घेतली आहेत? भाग - २

सागर

मजकूर

भाग-१ दुसर्‍या पानावर गेल्यामुळे येथे दुसरा धागा सुरु करत आहे

एवढ्यात मी विकत घेतलेली नवीन पुस्तके:
ऑर्डर दिली आहे. २-३ दिवसांत मिळतील

- नातिचरामि - मेघना पेठे ( स्थगित. पुढच्या महिन्यात पुण्याच्या भेटीत मिळणार आहे)
- रारंग ढांग - प्रभाकर पेंढारकर
- एका तेलियाने - गिरिश कुबेर
- आदिबंध - बापू करंदीकर
- एकोणिसावी जात - महादेव मोरे

अभिप्राय

यशोधरा

यशोधरा · Sun, 14 Nov 2010 - 13:50

आज मला खरं तर मायमराठी ह्या पुप्रला भेट द्यायची होती, पण ते जमलं नाही. हरकत नाही. त्याऐवजी जय हो एनबीटी! असं म्हणून अंमळ खालील खरेदी केली -

मराठी लघुकथा -संपादित - भालचंद्र फडके
आतला आनंद - शांता शेळके
विठ्ठल रामजी शिंदे - गो मा पवर
सयाजीराव गायकवाड- स गं मालशे -अनुवादित
कबीर - अशोक कामत - अनुवादित
नागार्जून- के सच्चिदानंद मूर्ती
लो. टिळकांचे निबंध- संपादित - राम शेवाळकर
चित्रग्रीव - अनुवादित - मारुती चितमपल्ली
तपस- भीष्म सहानी
डॉ बाबासाहेब आंबेडकर - वसंत मून
मुक्ती - शातीलाल देसाई -अनुवादित - महेश जोशी
कथा भारती - तेलुगू लघुकथा- अनुवादित - नरेंद्र बल्लव
शिकार - यशवंत चिल्लाळ - अनुवादित केशव महागावकर
पंजाबी लघुकथा - संपादित हरभजन सिंग - अनुवदित प्रभाकर माचवे

कविता महाजन

कविता महाजन · Wed, 24 Nov 2010 - 17:26

मारुती चितमपल्ली यांच्या पक्षीकोशाबाबत बोलत असाल, तर त्यात संदर्भांच्या प्रचंड चुका आहेत. ( मी तो विकत घेऊन 'चुकले.' :-(.

कविता महाजन

कविता महाजन · Wed, 24 Nov 2010 - 17:32

मी अशात विकत घेतलीत ती अतुल धामनकर यांची जंगलविषयक पुस्तकं.
१. वाघ
२. अरण्यवाचन
३. महाराष्ट्रातील वन्यजीवन
४. अरण्याचे अंतरंग.
खेरीज 'पाश' यांचा 'अक्षर अक्षर' हा जाडजूड कवितासंग्रह.
उदयन वाजपेयी यांचा 'पागल गणीतज्ञ की कविताएं'
उदयप्रकाश यांचा 'दत्तत्रेय के दुख' हा कथासंग्रह.

ढब्बू पैसा

ढब्बू पैसा · गुरुवार, 25 Nov 2010 - 05:35

१. नेगल - १ : श्री. विलास मनोहर
२. नेगल - २ : श्री. विलास मनोहर
३. एक शून्य मी : पु. ल. देशपांडे -- सध्या ह्या पुस्तकाची जबरदस्त फ्यान झालेय मी :)
४. पुरचुंडी : पु. ल. देशपांडे

चर्चा प्रकार