- Log in to post comments
भाग ६ दुसर्या पानावर जायला आला आहे त्यामुळे नवीन धागा सुरु करत आहे.
आपण अलिकडे कोणकोणती पुस्तके खरेदी केली आहेत त्यांची नावे , लेखक, व शक्य झाले तर किंमत व प्रकाशक वगैरे देणे इथे अपेक्षित आहे. त्याच बरोबर पुस्तकाची संक्षिप्त ओळख करून दिलीत तर अधिक चांगले.
या भागाची पुन्हा माझ्याकडून सुरूवात करतो.
कालच बुकगंगावरून ही पुस्तके मागवली:
१. गंधर्व -- बाळकृष्ण प्रभुदेसाई -- नंदनने मागे याबद्द्ल लिहिलं होतं (नेमका दुवा सपडत नाहीये.. मिळाला की धागा अद्ययावत करेन). तेव्हा फार विचार न करता नंदन वाक्यं प्रमाणं म्हणून घेऊन टाकलं ;)
२. त्या वर्षी -- शांता गोखले दशकातील दहा या धाग्यात इथे मणिकर्णीकाने केलेले वर्णन आणि त्याला मेघनाचा दुजोरा वाचून मागवले आहे.
३. किमया -- माधव आचवल: चित्रा यांनी यावर इथे जे काही सुंदर लिहिले आहे की कोणालाही पुस्तक घ्यावसं वाटेल
अभिप्राय
सागर
सागर · Mon, 4 Jul 2011 - 19:29 · उत्तर
हे १६ खंड म्हणजे २० किलो वजनाची ३० पुस्तके आहेत अशी माहिती कळली. :)
चित्रा,
मी प्रत्यक्षात अजून खंड पाहिले नाहियेत पण त्याचा आकार आणि वजन पाहूनच माझ्या आई ने मला लगेच फोन करुन किती पैसे खर्च केले हे विचारले होते ;)
खंड चांगले वजनदार (दोन्ही अर्थाने - १.वजन, २. दर्जा) आहेत यात वादच नाही.
शेवटी ज्याला चांगले घ्यायची सवय असते तो वाचक त्यातल्या कथानकाकडेच लक्ष देतो.
मी पण माझ्या शालेय जीवनात अरेबियन नाईट्स वाचले होते तेव्हाही त्यातील तसली वर्णने माझ्यावर प्रभाव पाडू शकली नव्हती. अरेबियन नाईट्स आहेच एवढे अत्भुत की असल्या किरकोळ गोष्टींकडे लक्षच जाणार नाही.
चित्रा,
मलादेखील ही पुस्तके घेण्याचा मोह पडला आहे.
तुझी या बाबतीत निराशा होणार आहे , कारण जुने हार्डकव्हरचे खंड आता उपलब्ध नाहियेत. मला अगदी नशीबाने मिळाले हे सर्व खंड... :P
चित्रा राजेन्द्र जोशी
चित्रा राजेन्द… · Mon, 4 Jul 2011 - 13:33 · उत्तर
सागर,
पुस्तक खरेदी साठी www.shop.mimarathi.net ही साईट नव्यानेच समजली. व्वा! तू खरोखरीच पुस्तकवेडा आहेत ह्याची खात्री पटली. मीदेखील आता तिथे फेरफटका मारून येते. म्हणजे घरबसल्या खरेदीला सुरुवात करता येईल.
जे कृष्णमूर्तींचे पुस्तक -- The First & Last Freedom चे मराठी भाषांतर ‘प्रथम अर्थात अंतिम मुक्ती.’ (भाषांतर मंड्ळ - प्र. ज. देशपांडे, ग. य. दीक्षित, दिवाकर घैसास.) कालच विकत आणले. केशव भिकाजी ढवळे प्रकाशन कदून थेट आणल्याने २५% सवलतीत मिळाले.
आज फक्त प्रस्तावना वाचली, अॅल्डस हक्सली यांनी लिहिलेली.
कृष्णमूर्ती काय काय देऊ करत नाहीत हे वाचताना सत्यनारायण गोयंका ह्यांच्या विपश्यना-प्रवचनांची आठवण आली.
सागर
सागर · Mon, 4 Jul 2011 - 13:39 · उत्तर
या संकेतस्थळाच्या मुख्य पानावर दिलेल्या ई-मेल आयडी वर संपर्क केलास तर साईट वर नसलेली पण तुला हवी असलेली पुस्तके पण ते शोधून देतात.
त्यामुळे मला कित्येक न मिळणारी पुस्तके मिळाली आहेत :)
जे कृष्णमूर्तींची पुस्तके थोडी जडच पडतात त्यामुळे मी फारसा त्यांच्या वाटेला गेलो नाहीये.
हे पुस्तक वाचून एक छानसा परिचय तू लिहिशीलच त्यावेळी मला नक्की उपयोग होईल :)
परिचय लिही ही तुला कळकळीची विनंती :)
चित्रा राजेन्द्र जोशी
चित्रा राजेन्द… · Sat, 9 Jul 2011 - 06:39 · उत्तर
सागर, निव्वळ तुझ्यामुळे मी मराठी - राज जैन यांच्याशी परिचय झाला. आणि आज ‘अरेबियन नाईट्स’ चा संच घरपोच मिळाला. मैत्रीत आभार मानायचे नसतात, तरीपणऽऽऽऽऽऽऽ
सागर
सागर · Sat, 9 Jul 2011 - 13:43 · उत्तर
मैत्रीत आभार मानायचे नसतात :)
अरेबियन नाईट्स आहेच तसे. एकदा वाचायला सुरुवात केली की स्वप्नात असल्यासारखेच वाटते.
वाचून झाले की अरेबियन नाईट्स वर पण तुझ्या खुमासदार शैलीत नक्की लिही... :)
चित्रा राजेन्द्र जोशी
चित्रा राजेन्द… · Sat, 2 Jul 2011 - 08:23
मिहिर,
Dady long legs चा मराठी अनुवाद राजहंस प्रकाशनने प्रकाशित केला आहे. सरोज देशपांडे ह्यांनी तो केला आहे. मला तो आवडला. तुझ्याप्रमाणे मीदेखील हे मराठी पुस्तक भेट दिले, माझ्या भाच्यांना.
लेकीसाठी इंग्रजी पुस्तक शोधताना मात्र फार यातायात करावी लागली. शेवटी मुंबईच्या स्ट्रण्ड बुक्स मध्ये ते सापडले....
मिहिर
मिहिर · Fri, 8 Jul 2011 - 19:11 · उत्तर
मी अनुवादच वाचला आहे फक्त वाचनालयातून आणून. वाचून चांगले वाटले म्हणूनच भेट दिले. मूळ भाषेतून पुस्तक वाचणे चांगले म्हणून इंग्रजी मिळाल्यावर ते विकत घेतले. मी इंग्रजीत वाचले नाही अजून.
सागर
सागर · Mon, 4 Jul 2011 - 13:40
नवीन पुस्तके कोणी देणार असेन तर त्यांनी कृपया नवा धागा सुरु करावा ही विनंती
हाही धागा दुसर्या पानावर गेलाय