- Log in to post comments
एवढ्यात तुम्ही कोणती पुस्तके विकत घेतली आहेत?
या धाग्याचा हेतू सध्या बाजारात कोणत्या पुस्तकांना जास्त मागणी आहे हे ओळखून जास्त मागणी असलेल्या पुस्तकांची ओळख वाचकांना व्हावी हा आहे.
मी अलिकडेच घेतलेली पुस्तके
जी.ए.कुलकर्णी
- काजळमाया
- रमलखुणा
- पिंगळावेळ
- सांजशकुन
गो.ना.दातार
- अधःपात
- इंद्रभुवनगुहा
गो.नी.दांडेकर
- कोण्या एकाची भ्रमणगाथा
- स्मरणगाथा
- महाराष्ट्रदर्शन
- रानभुली
- जैत रे जैत
- शितू
सुहास शिरवळकर
- गुणगुण
- अनुभव
- ऑर्डर ऑर्डर
- सायलेन्स प्लीज
- सूत्रबद्ध
- ट्रेलर गर्ल
- फलश्रुती
- थरारक
- ब्लॅक कोब्रा
भालचंद्र नेमाडे
- कोसला
विजय देवधर
- डेझर्टर
अच्युत गोडबोले
- किमयागार
जगन्नाथ कुंटे
- साधनामस्त
- कालिंदी
- नित्य निरंजन
वि.स.खांडेकर
- ययाति
मूळ लेखकः पुपुल जयकर - अनुवाद: अशोक जैन
- इंदिरा गांधी
प्रदीप दळवी
- रक्तरेखा
मालती दांडेकर
- चक्रवर्ति (अशोक)
अविनाश बिनिवाले
- पूर्वांचल
मूळ लेखकः डॅन ब्राऊन - अनुवाद: अशोक पाध्ये
- डिसेप्शन पॉईंट
बाळशास्त्री हरदास
- आर्य चाणक्य (भाग १)
रविंद्र गुर्जर
- पॅपिलॉन
किरण नगरकर
- सात सक्कं त्रेचाळीस
- प्रतिस्पर्धी ('ककल्ड' या मूळ इंग्रजी कादंबरीचा मराठी अनुवाद)
ना.सं.इनामदार
- राऊ
द.ग.गोडसे
- मस्तानी
व.पु.काळे
- पार्टनर
भालबा केळकर
- शेरलॉक होम्सच्या चातुर्यकथा (भाग १ ते ६) बाल-वांड्ग्मय
मूळ लेखिका: डेबोरा एलिस अनुवादः अपर्णा वेलणकर
- ब्रेडविनर
- परवाना
मूळ लेखक: एस. एल्. भैरप्पा अनुवादः उमा कुलकर्णी
- पर्व
तुमची यादी देताय ना? :)
अभिप्राय
यशोधरा
यशोधरा · Mon, 4 Oct 2010 - 14:29 · उत्तर
सागर, मला सांगायचं आहे ते सांगितलच आहे की मी :)
आता तू, ऋ हे पुस्तक वाचून तुमची मतं लिहा. मला एक वाईट सवय आहे की पुस्तकाचे शेवटचे पान आधी वाचायचे,तसेच ह्या वेळीही वाचले!:( तिथे दामलेंचं एक वाक्य आहे, ते काय आहे हे आत्ताच सांगत नाही, पण ते वाक्य वाचून समजायचे ते समजले आहे. :)
सामान्य जनमानस आपल्या बाजूने असावे हाच शेवटी ह्यातील प्रत्येक घटकाचा अट्टाहास. त्याप्रमाणे वळणार्या, वळण दिलेल्या बातम्या आणि सांगितली जाणारी सत्यं. शेवटी काय? कोणीही कोणाचेही नाही. मामला खतम.
सागर
सागर · Mon, 4 Oct 2010 - 16:22 · उत्तर
बर वाचून सांगतो यशोधरा माझे मत.
मला शेवटचे पान आधी वाचायची सवय नाहीये. त्यामुळे रसभंग होतो असे माझे मत आहे
माझ्या आईला पण हीच सवय आहे :)
ऋषिकेश
ऋषिकेश · Mon, 4 Oct 2010 - 19:46 · उत्तर
ओके आता मत व्यक्त करण्यासाठी का होईना वाचेनच! :)
बाकी मला एकांगी पुस्तकाबद्दल आक्षेप नाही. मी लवासाला गेलो आहे. व तिथे (जाहिरातीत म्हणतात तसे) छानसे टुमदार गाव नक्कीच नाही. कॅचमेंट एरीया / फुगवट्या भोवती वसवलं जाणारं ते शहर निसर्गरम्य का म्हणावं हे मला समजलं नाही. शहराभोवतीच्या निसर्गाकडे बघुन जर निसर्गरम्य म्हणायचं असेल तर मुंबईलाही निसर्गरम्य ठिकाण म्हणावं लागेल. लवास शहराच्या आत निसर्ग हा फक्त चकचकीत इमारतीचा आहे. समोर पाण्याचा साठा व त्यापलिकडे जंगला हा "व्ह्यू" निसर्गरम्य असला तरी खुद्द लवासामधील परिसर तसा नाही. त्यामुळे ते शहर पाहिल्यापासूनच त्या प्रकल्पाबद्दल एक अढी बसली आहे. त्यात हे पुस्तक वाचून स्वतःच्याच जखमेवर का मीठ चोळा असा दृष्टीकोन होता. पण आता वाचेनच!
यशोधरा
यशोधरा · Tue, 5 Oct 2010 - 08:32 · उत्तर
ऋ, ह्याच्या नेमके उलट मत माझ्या इतल्या एक कलिगने व्यक्त केलेय. हल्लीच १ महिन्यापूर्वी त्यांचा ग्रूप लवासाला गेला होता आणि त्यांना खूपच आवडले! आहे की नाही विरोधाभास! अतिशय सुरेख निसर्ग आहे, लवासामध्ये व अवतीभवती, हे त्याने आवर्जून सांगितले.
ऋषिकेश
ऋषिकेश · Tue, 5 Oct 2010 - 10:20 · उत्तर
लवासाच्या आत आणि भोवती यात बर्याच जणांचे कन्फ्युजन होताना मी पाहिले आहे. नैसर्गिक सौंदर्य आणि कृत्रिम सौंदर्य यातील फरक मआंडणेही गरजेचे आहे. लवासाच्या आत खूप सोयी आहेत. अतिशय कलात्मक व डोळ्यांना सुखावणार्या इमारती आहेत, बाग बगिचे आहेत, हिरव्यागार लॉन आहेत, स्वच्छ रस्ते बनत आहेत. मात्र हे सारं एका जंगलाला नष्ट करून बनले आहे. एकही विशाल 'नांदता' वृक्ष तिथे दिसला नाही. सुबक हिरवळ, "लावलेली झाडे" आणि कोकणातील 'स्थानिक' नैसर्गिक वृक्षराजी यातील फरक आणि त्यामुळे होणारे फायदे-तोटे जेव्हा लोकांच्या लक्षात येतील तेव्हा वेळ गेली नसली म्हणजे मिळवलं.
असो, खूपच विषयांतर झालं.. या धाग्यावर मी इथेच थांबतोय.. मात्र खरडीतून बोलेनच :)
यशोधरा
यशोधरा · Tue, 5 Oct 2010 - 10:32 · उत्तर
>> मात्र हे सारं एका जंगलाला नष्ट करून बनले आहे. एकही विशाल 'नांदता' वृक्ष तिथे दिसला नाही >> ह्याउलट पुस्तकात वृक्षांच स्थलांतर केलेलं आहे असं लिहिलेलं आहे, म्हणजे नांदते वृक्ष तोडण्यापेक्षा एका ठिकाणाहून उचलून दुसरीकडे लावून (लवासातच) जगवलेत असं. मीही आता इथे थांबतेच :)
कालच घरी जाताना रात्री पावसामुळे गाडीतच ३ तास अडकले, तेह्वा पुस्तक वाचून संपवलं. वाचून एकूणच विषण्णता आली. पाटकर म्हण़जे आदिवासीच्या मुक्तिदात्या नक्कीच नव्हेत, पण दामलेंची किंम्मत शेवटी किती ठरली होती, असा विचार मनात आल्याशिवाय राहिला नाही!
स्वाती
स्वाती · Tue, 5 Oct 2010 - 07:45
लवासा बद्दल आयबीएन लोकमत वर चर्चा चालु होती. त्यामध्ये सुनीती ( ज्या या प्रकरणामध्ये आदिवासींच्या बाजुने लक्ष देत आहेत) व निळू दामले हे मते मांडत होते. ती चर्चा ऐकुन नीळु दामले हे पत्रकार म्हणून मते मांडत नसून लवासाचे "पीआर" म्हणूनच मांडतायत हे स्पष्ट समजत होते. याविषयी खरच चर्चा झाली तर बरे होइल.
यशोधरा
यशोधरा · Tue, 5 Oct 2010 - 08:27 · उत्तर
ओह, म्हणजे पुस्तक वाचून माझे जे मत झाले ते अगदीच चुकीचे नाही तर!
सागर
सागर · Tue, 5 Oct 2010 - 08:55 · उत्तर
यशोधरा एक वेगळा धागा काढण्याची गरज आहे गं :)
येथे लवासा चर्चा खूप छान रंगत चालली आहे.
पुस्तक वाचून झाले असेल तर एक वेगळा धागा काढ लगेच
यशोधरा
यशोधरा · Tue, 5 Oct 2010 - 09:07 · उत्तर
लवासा चर्चा करण्यात मला स्वतःला खरं तर पॉइंट वाटत नाही, म्हणजे मी त्या चर्चेत सहभागी होण्यात. कारण, मला तरी स्वत;ला असं मुळातून काहीच माहित नाही. हे असं वाचून मी मत बनवणार, लवासावाल्यांची काही मतं मला बरोबर वाटतात, मेधा पाटकर आणि तत्समही (सुनीता वगैरे) त्यांच्या सोयीची सत्यं सांगणार आणि पुन्हा आपण हळहळणार. असल्या चर्चेला काय अर्थ नसतो रे... नुसतेच शब्दांचे बुडबुडे आणि असल्या गोष्टी बोलणार्या आपल्यासारख्यांना आपण सामाजिक दृष्ट्या किती जागरुक आहोत असं "इंटुक" वर्गात असल्याचं खोटं, भाबडं समाधान. घडणार्या गोष्टी घडतच राहतात.
तुला काढायचंच असलं तर जरुर काढ :) मी चर्चा वाचेन आणि वाटलं तर काहे खरडेनही.
सागर
सागर · Tue, 5 Oct 2010 - 09:27 · उत्तर
हम्म...
मी पुस्तक वाचेन तेव्हाच मत तयार करेन. आणि वाटले तर लिहिन यशोधरा.
माझ्या अर्धवट माहिती नुसार लोकांना निसर्गरम्य वातावरणाची भुरळ घालून कैच्या कै किंमत वसूल करण्यासाठी (थोडक्यात पैका लुबाडण्यासाठीचा) हा भला मोठा प्रकल्प आहे.
नदीच्या काठावर प्रकल्प अशा ठिकाणी आहे की थोडी फार निसर्गाची अवकृपा झाली की या प्रकल्पात अगोदर पाणी आणि त्याबरोबर रोगराई लगेच पसरेल.
आपल्यासारख्या सर्वसामान्यांचे कामच नव्हे हा प्रकल्प म्हणजे.
सागर
सागर · Wed, 6 Oct 2010 - 16:17
१. एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर
२. दूरदर्शी - माणिक कोतवाल - राजहंस प्रकाशन
३. प्रकाशवाटा - प्रकाश आमटे
४. गांधीहत्या आणि मी - गोपाळ गोडसे
५. व्यासपर्व - दुर्गा भागवत
६. युगांत - इरावती कर्वे
७. ब्र - कविता महाजन
८. मी सायूरी - आर्थर गोल्डन - अनु: सुनंदा अमरापूरकर - मेहता पब्लिशिंग
९. एकलव्य - शरद दळवी
ऋषिकेश
ऋषिकेश · Wed, 6 Oct 2010 - 19:50 · उत्तर
ही दोन वाचलेली / ऐकलेली नाहित. नक्की लिहि याबद्दल
सागर
सागर · Wed, 6 Oct 2010 - 20:53 · उत्तर
ऋ,
अरे मी मी सायूरी अजून वाचले नाहिये. पुवि वर मी हे पुस्तक जोडले आहे
त्यावरुन नक्कीच उत्सुकता वाटेल वाचायची. खूप गाजलेले पुस्तक आहे हे.
ह्या दुव्यावरुन पुस्तकाची काही पाने पीडीएफ मधे वाचता येतील
एकलव्य हे शरद दळवींचे खूप जुने पुस्तक आहे. कादंबरीच आहे एकलव्याच्या जीवनावर. एकदम सुंदर कादंबरी आहे. एकलव्यावरचे आतापर्यंत मला हे पुस्तक सर्वात जास्त आवडले. एकलव्य खूप वर्षांपूर्वी वाचलेले होते. पण संग्राह्य नक्कीच आहे. :)
निखिल देशपांडे
निखिल देशपांडे · गुरुवार, 7 Oct 2010 - 05:56 · उत्तर
पुस्तकाबद्दल एकले आहे..
सागर वाचुन झाल्यावर सविस्तर लिहिच
सागर
सागर · गुरुवार, 7 Oct 2010 - 07:38 · उत्तर
एकलव्य वाचायला वेळ लागेल रे निखिल.
आता फक्त पुस्तक घेऊन ठेवतो आहे. कारण मी शक्यतो पुस्तकाचा आनंद घेता घेता त्यातील अभ्यास करण्याजोगे बारकावेही शोधत असतो, त्यामुळे एका वेळी शक्यतो एका विषयावरची पुस्तके वाचायला आवडतात. अजून 'पर्व'(पुनर्वाचन), युगान्त, व्यासपर्व ही पुस्तके रांगेत आहेत ;)
'एकलव्य'वर लिहायचे मनात आहे. वाचले की नक्की लिहिन.
रोचीन
रोचीन · गुरुवार, 7 Oct 2010 - 05:53 · उत्तर
'मेमॉयर्स ओफ गेषा' चा अनुवाद आहे. तु इंग्रजी पुस्तक वाचले कींवा त्यावरचा पिक्चर पाहीला नाहीयेस का??
सागर
सागर · गुरुवार, 7 Oct 2010 - 07:32 · उत्तर
होय रोचीन बरोबर आहे. मूळ पुस्तक हेच आहे.
गैशा हा चित्रपट अजून पाहिला नाही :( पण बराच चर्चेत होता हा चित्रपट
पुस्तकाच्या किर्तीमुळे घेतले आहे. अजून हातात यायचे आहे. उद्या मिळेल :)
यशोधरा
यशोधरा · गुरुवार, 7 Oct 2010 - 08:44 · उत्तर
एकलव्यचा विषय काय? म्हणजे महाभारतातील एकलव्य की अजून काही वेगळा?
सागर
सागर · गुरुवार, 7 Oct 2010 - 09:16 · उत्तर
होय यशोधरा,
महाभारतातलाच एकलव्य.
राजकुलीन नसूनही आणि गुरु प्रत्यक्ष नसूनही कठोर अभ्यासाने अर्जुनाला चक्रावून टाकणारी एकलव्याची धनुर्विद्या.
द्रोणाचार्यांचा पुतळा एकलव्याने का उभारला होता? त्याचा फायदा राजकारणात निर्ढावलेल्या लोकांनी कसा घेतला गेला? दुर्योधनाची बाजू कशी होती? कर्णाची धनुर्विद्या कशी होती? द्रोणाचार्यांना अंगठा कापून देताना एकलव्याची समर्पणाची भावना कशी होती.
तीच भावना युद्धाच्या वेळी कशी होती? एकलव्य दुर्योधनाच्या बाजूने का लढला?
एकलव्याचे मानसिक द्वंद्व महाभारताच्या घटनाक्रमाबरोबर 'एकलव्य' या कादंबरीत शरद दळवी यांनी सुरेख चितारले आहे. ही कादंबरी मी एका बैठकीत वाचून पूर्ण केली होती. आणि कादंबरी लिहिताना लेखकाने सर्व बाबतीत योग्य भान राखल्याचे जाणवते.
सध्या एवढेच पुरे. कारण कादंबरी मी खूप वर्षांपूर्वी वाचली आहे, तेव्हा अजून जास्त नाही सांगता येणार. पुनर्वाचन केले की नक्की परिक्षण लिहिन या पुस्तकावर. :)
यशोधरा
यशोधरा · गुरुवार, 7 Oct 2010 - 09:21 · उत्तर
धन्यवाद सागर. परीक्षणाची वाट बघते, म्हणजे ते वाचून घ्यायचे की कसे हे ठरवता येईल.
यशोधरा
यशोधरा · Mon, 11 Oct 2010 - 08:01
मृदगंध - इंदिरा संत
एकनाथांची भारुडे (संकलित)
ग्रामीण बोली भाषेतील शब्द.
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Tue, 12 Oct 2010 - 18:28
प्रथमच इथे भाग घेतोय.....आणि त्यातच या सुंदर (तसेच अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयाशी संबंधित) धाग्याकडे लक्ष गेले. माझ्या नित्याच्या खरेदीत पुस्तके ही बाब असतेच असते, त्यामुळे खरेदी करायला जाताना अमुक एक पुस्तक डोक्यात असतेच असे नाही. मित्रांच्या समवेत एकत्र जमण्याचे ठिकाण हे शहरातील एक पुस्तकालयच असल्याने तिथे जमत असताना नवीन पुस्तकांकडे लक्ष जाते आणि पाकिट योग्य ती उब देत असेल तर खरेदीही आपसूक होते. या एक दोन महिन्यात झालेली खरेदी :
१. मितवा - ग्रेस
२. कोसला - भालचंद्र नेमाडे [ह्या कादंबरीची ही जवळजवळ ८ वी तर खरेदी असेलच. संग्रही होतीच पण नेहमीच्या गलथानपणाचा फटका बसल्याने वारंवार असलेली प्रत सार्या महाराष्ट्रात फिरत जात असते, त्यामुळे नवी आवृती खरेदी करणे क्रमप्राप्त........ _ जी.ए., मर्ढेकर, नेमाडे हे हळवे विषय आहेत माझ्यासाठी)
३. महाभारताचा मूल्यवेध - डॉ. रवींद्र शोभणे
४. गीतयात्री - माधव मोहोळकर....(अक्षरशः अकल्पितपणे हे पुस्तक मिळाले, दुर्मिळ आहे असे म्हणतात...पण मला सवलतीच्या दरात मिळाले.)
५. प्रतिस्पर्धी - किरण नगरकर
अजून खूप मोठी यादी होऊ शकेल...पण इनफ फॉर द फर्स्ट डे !
इन्द्रा
सागर
सागर · Wed, 13 Oct 2010 - 08:06 · उत्तर
इंद्रराज,
तुमचे स्वागत आहे पुस्तकविश्व वर.
प्रतिस्पर्धी मी पण घेतली आहे ती त्याच्या गाजलेल्या किर्तीमुळे.
माझ्या कडे न वाचलेली पुस्तके खूप आहेत त्यामुळे अजून प्रतिस्पर्धीला हात नाही लावलेला.
किरण नगरकर वाचायला निवांतपणा लागतो एवढं मात्र खरे आहे. त्यांच्या लेखनाचा वेग येता जाता वाचले तर झेपत नाही. हा अनुभव मी सात सक्कं च्या वेळी घेतला होता :)
तुमचे प्रतिस्पर्धी वाचून झाले की मत जाणून घ्यायला आवडेल
नक्की लिहा याबद्दल.
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Wed, 13 Oct 2010 - 18:10 · उत्तर
धन्यवाद सागर जी....स्वागताबद्दल. खरं तर सर्वश्री ऋषिकेश, आनंदयात्री आणि निदे यांनी माझी या अगोदरच 'पुस्तकविश्व'ची ओळख करून दिलीच होती, पण काही घरगुती आणि व्यवसायाच्या अडीअडचणीमुळे एकाच वेळी दोनदोन संस्थळावर लक्ष केन्द्रीत करू शकत नव्हतो. पण 'पुस्तक' हा माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असल्याने या स्थळाची ओढ अंतर्यामी होतीच इतकेच मी आता म्हणू शकेन. असो. ~~ इथून पुढे नियमित सदस्यासम मी इथे उपस्थित असेन. असो
आपला विषय ~~~~
केशवसुत, माधव ज्युलियन, मर्ढेकर, जी.ए., नेमाडे, खानविलकर, एलकुंचवार....इतकेच काय तर काही प्रमाणात विश्राम बेडेकर आणि कमल देसाई हे लेखक काळाच्या पुढे जाणारे होते आणि त्यामुळेच पारंपारिकरित्या जीवन जगणार्या/पाहणार्यांना (ज्यांचे प्रमाण ९:१ असे असते) ते त्यांच्या काळात कधीच पचले नाहीत (काही प्रमाणात जी.ए. वगळता...अर्थात त्यालाही कारण म्हणजे त्यांच्या उमेदीच्या काळात त्यांना मिळालेला श्री.पु.भागवत आणि भटकळांचा भक्कम पाठिंबा...). या यादीत र.धो.कर्वे आणि पंडिता रमाबाई यांनाही सामील करून घेता येईल, पण ही दोन नावे साहित्यापेक्षा त्यांच्या समाजकार्यामुळे आपल्याला जास्त परिचित असल्याने ती इथे घेत नाही, अन्यथा यांची जातकुळीदेखील वरील गटातील लेखकांच्या पंक्तीतीलच आहे.
याच पंक्तीत आपले ताट मांडले, हक्काने, ते किरण नगरकर आणि सतिश आळेकर यांनी.
किरणसंबंधी लिहायचे झाल्यास मराठी वैचारिक प्रज्ञेची मूसच बदलणे नितांत आवश्यक आहे. खुद्द किरण स्वतः फार साशंक होते की कितपत आपले विचार या मातीत स्वीकृत होतील. त्या त्या वयात आणि टप्प्यावर त्यांनी थेट शिवसेनेचा/हिंदू संघटनांचा विरोध सहन केलाच होता. मराठी माणसाच्या साहित्य आणि साहित्यिक यांच्या संदर्भात काही दाट रूजलेल्या ज्या काही पारंपारिक कल्पना आहेत त्याला खर्या अर्थाने धक्का दिला तो प्रथम नेमाडे यांनी आणि नंतर किरण नगरकर. पाध्ये, ढाले, ढसाळ ही मंडळीदेखील दादागिरी करत होतीच पण 'लेखणी' हे काय त्यांचे अंतिम शस्त्र तेव्हाही नव्हते, आजही नाही. त्यामुळे लेखणीने शस्त्रक्रिया करण्याचे धाडस नेमाडे आणि नगरकर यांनीच दाखविले आणि प्रस्थापितांना धक्का दिला म्हणून त्या त्या वेळी प्रखर टीकाही सहन केली आहे.
'सात....' मधला कुशंक हा खुद्द किरणच आहे, जो एका 'दिशाहिन भटक्या' पिढीचे प्रतिनिधित्व करतोय. 'प्रतिस्पर्धी' चा नायक हा मीरेचा नवरा कुंवर आहे, जो मीरा भक्तांच्या खिजगिणतीतही कधी नसतो. पण त्याचीही 'मीरा' विषयाबाबत काहीतरी भूमिका असेलच ना?
किरणमधला दबलेला लेखक आणि 'कुंवर' या दोन भिन्न व्यक्तिरेखा नक्कीच नाहीत.
'प्रतिस्पर्धी' बद्दल मी जरूर इथे लिहीन.
इन्द्रा
सागर
सागर · गुरुवार, 14 Oct 2010 - 07:40 · उत्तर
इंद्रराज सुरेख वर्णपट मांडला आहे मराठी साहित्याचा. अर्थात तो मर्यादित आहे याची जाणीव आहेच. पण व्यक्तीसापेक्ष अनुभव वेगवेगळे असतात आणि तुमच्या मतांवरुन ते प्रकर्षाने जाणवले. एवढा स्पष्टपणा विचारांत असणे हीच खूप मोठी गोष्ट आहे.
मर्ढेकर, नेमाडे, जी.ए. आणि काही प्रमाणात खानविलकर वाचले आहे. नेमाड्यांची कोसला अलिकडेच घेतली आहे, पुन्हा वाचायची आहे. कोसला हे एक चिंतन आहेच पण समाजाला जागे करणारे अंजनही त्यात आहे. खूप वर्षांपूर्वी वाचली होती कोसला. म्हणून पुन्हा एकदा 'कोसला'मय होऊन अवलोकन करायचे आहे.
व.पुं.ची पार्टनर देखील मी एक वेगळी कादंबरी गृहीत धरतो. अलिकडेच वाचली. त्यावर एक वेगळा लेख इथे लिहिला आहेच. पण त्यातही स्पष्टवक्तेपणा आहे.
किरण नगरकरांबद्दल तुम्ही म्हणता तसे मलाही सात सक्कंच्या वेळी असे वाटले होते की त्यांची स्वतःचीच कहाणी वाचतो आहे की काय. सात सक्कंचा वेग अफाट आहे, त्याहीपुढील त्यांतील विचार आहेत. समाजमन हालवून सोडणार्या कादंबर्या नक्कीच आहेत या. किरण नगरकरांना तत्कालीन मराठी लोकांच्याच रोषाला, आंदोलनांना सामोरे जावे लागले. त्यामुळे नगरकरांनी इंग्रजीतच लेखन करणे पसंत केले. त्यांच्या पुस्तकांना इंग्रजीत मिळालेले यश पाहता तत्कालीन मराठी वाचकांनी काय गमावले आहे हे आताच्या पिढीला नक्कीच कळत असेल. ककल्ड चा मराठी अनुवाद 'प्रतिस्पर्धी' नावाने दुसर्या कोणीतरी मराठीत करणे यातच सगळे आले. लेखकाच्या वर्मी बसलेल्या घावाच्या वेदनांचे हेही एक रुप म्हणता येईल. नाहीतर नगरकरांना स्वतः ककल्ड मराठीतही लिहिणे काय कठीण होते? असो. गतानुगतिको लोकः या उक्ती प्रमाणे नगरकरांना विरोध करुन मराठी जनांनी त्यांचेच नुकसान करुन घेतले आहे एवढे मात्र खरे.
माझ्यामते साहित्यिक कोणीही असो त्याला पूर्णपणे लेखन स्वातंत्र्य असायला हवे. जसे काय वाचायचे हे स्वातंत्र्य आपणा वाचकांना आहे अगदी अगदी तसेच. तुम्हाला जे आवडत नाही ते वाचू नका. जे हवे ते वाचा. लेखनस्वातंत्र्यावर गदा आणणे म्हणजे नुसती लेखनस्वातंत्र्याची पायमल्ली करणे नव्हे तर विचार क्षमतेवर मर्यादा आणणे आहे. मोठमोठ्या लोकांना आज आपण पुजतो पण त्यांना त्यांच्या काळात संघर्ष हा करावाच लागला होता.
मराठी साहित्याच्या दृष्टीने समाधानाची गोष्ट हीच की दिवसेंदिवस मराठी वाचकांची वैचारिक प्रगल्भता वाढतेच आहे. तसे नसते तर काळाच्या पुढे पाहणार्या या सर्व लेखकांना पुढच्या पिढीने डोक्यावर घेतले नसते.
जसे नेमाड्यांची कोसला, तत्कालीन टीकेचा विषय ठरली तरी पुढच्याच पिढीने त्यांतील आवाक्याचे कौतुक केलेच ना. किरण नगरकरांनाही त्या काळात दुर्लक्षिले तरी आजची पिढी त्यांची पुस्तके विकत घेऊन वाचते आहे ना.
मला वाटते या सर्व गोष्टी मराठी साहित्याच्या दृष्टीकोनातून खूपच सुखावह आहेत. :)
प्रतिस्पर्धी वर तुमच्या मताची नक्की वाट पहात आहे.
सागर
सागर · Wed, 13 Oct 2010 - 16:03
ऑर्डर दिली आहे. २-३ दिवसांत मिळतील.
१. शक्तीपीठ - राजीव पटेल
२. उर्जेच्या शोधात - प्रियदर्शनी कर्वे (संदीग्ध)
३. मला उत्तर हवे आहे : खगोलशास्त्र - मोहन आपटे
४. नांगरल्याविण भुई - नंदा खरे
५. अदर साईड ऑफ मिडनाईट - सिडने शेल्डन - मोहनतारा पाटील
६. मेमरिज ऑफ मिडनाईट - सिडने शेल्डन - विजय देवधर
७. द नेकेड फेस - सिडने शेल्डन - विजय देवधर
८. तेथे गरुड उतरला - जॅक हिगिन्स - मोहनतारा पाटील
यशोधरा
यशोधरा · गुरुवार, 14 Oct 2010 - 07:48 · उत्तर
शक्तीपीठ ही नवी कादंबरी आहे ना? पाहिली मी. तू वाचायला घेतलीस का? कशी वाटली सांगशील का?
नांगरल्याविण भुईचे परिक्षण जरुर लिही.
सागर
सागर · गुरुवार, 14 Oct 2010 - 08:05 · उत्तर
अगं यशोधरा,
नांगरल्याविण भुई चा प्रभाकर नानावटींनीच एक सुंदर परिचय लिहिला आहे. तो वाचूनच हे पुस्तक विकत घेतले आहे. :) तू वाचले नसशील तर इथे वाच
प्रभाकररावांनी लिहिल्यावर मी अजून काय लिहिणार? :)
होय शक्तीपीठ ही नवी कादंबरी आहे. राजीव पटेल हे वैदीक कालीन कादंबर्या लिहिण्यात प्रसिद्ध आहेत. त्यांचे मी अजून एकही पुस्तक वाचलेले नाहिये. शक्तीपीठ हा माझा आवडीचा व संशोधनाचा विषय आहेच. पण राजीव पटेल यांच्या इतर कादंबर्यांच्या तुलनेत साडेतीन शक्तीपीठांवर असलेली ही कादंबरी जास्त प्रगल्भ विचारांची असेल या अपेक्षेने घेतली आहे. अजून हातात नाही आलेली. पण ऑफिसच्या पत्त्त्यावर मागवल्यामुळे बहुतेक सोमवारीच मिळेल. मिळाली की तीच घेणार आहे वाचायला. वाचल्यावर माझे मत सांगेनच :)
यशोधरा
यशोधरा · गुरुवार, 14 Oct 2010 - 08:10 · उत्तर
धन्यवाद, मी पाहिले नव्हते.
सागर
सागर · गुरुवार, 14 Oct 2010 - 08:17 · उत्तर
यशोधरा,
शक्तीपीठवर मात्र नक्की लिहिन
सध्या तरी पुस्तके हातात यायची वाट पहातोय :)
सागर
सागर · Mon, 18 Oct 2010 - 16:59
आजच ऑर्डर दिली फ्लिपकार्टवर (२ दिसात मिळतील)
१. कालगणना
२. आर्यभटीय
ही दोन्ही पुस्तके खूप सुंदर आहेत. खगोलशास्त्रात रस असणार्यांना ही पुस्तके म्हणजे पर्वणीच आहेत.
संग्राह्य तर आहेच पण खगोलशास्त्राची सुरुवात करणार्यांना मोलाची मार्गदर्शन करणारी आहेत.
मोहन आपटे सर यांचा व्याख्यानात हातखंडा आहे हे ऐकून आहे. कधी योग नाही आला ऐकण्याचा. पण लेखनात मात्र आपटे सर अद्भुत आणि अद्वितीय आहेत हे मात्र नक्की
जिज्ञासूंनी नक्की वाचा ही पुस्तके
ऋषिकेश
ऋषिकेश · Tue, 19 Oct 2010 - 07:35 · उत्तर
+१
मात्र हे ऐकून नसून प्रत्यक्ष अनुभवले आहे. दहावी ते बारावीच्या दरम्यान त्यांचे लागणारे जवळजवळ प्रत्येक व्याख्यानाला मी आणि माझा एक मित्र हजेरी लावायचो. वैदिक गणितापासून ते अत्याधुनिक भुमितीपर्यंत आणि ड्रेकच्या समिकरणापासून ते आर्यभट्टापर्यंत त्यांच्या व्याख्यानांचे विषय आणि व्याप्ती असे. त्या वयात हा अलभ्य लाभ होता. अजूनही व्याख्याने होत असल्यास नक्की जा!
(पुढे मी इंजिनियरिंगला गेलो :) )
सागर
सागर · Tue, 19 Oct 2010 - 08:52 · उत्तर
असे भाग्य नशीबानेच मिळते. मी पुण्यात असूनही मला कधी जमले नाही. कारण त्यावेळी माझा आवाका मर्यादीत होता. नंतर नोकरीनिमित्ताने भटकंती सुरु झाली आणि मग राहिलेच. असो. पुण्यात जेव्हा मी कधी असेन आणि आपटे सरांचे व्याख्यान ऐकण्याचा योग आला तर नक्की जाणार आहे. :)
सागर
सागर · गुरुवार, 21 Oct 2010 - 08:22 · उत्तर
हुर्रे
अक्षरशः २ दिवसांत आपटे सरांची 'आर्यभटीय' आणि 'कालगणना' ही पुस्तके मिळाली. :)
सुंदर पॅकिंग सुंदर पुस्तके... फ्लिपकार्टची सेवा म्हणूनच आवडते. छान आहे एकदम
यशोधरा
यशोधरा · गुरुवार, 21 Oct 2010 - 08:10
अगस्तीचे अंगण - प्रभाकर पाध्यांचे संकलीत आणि संपादित लेखन
कार्यरत - अनिल अवचट
कृष्णकिनारा - अरुणा ढेरे
जेह्वा माणूस जागा होतो - गोदावरी परुळेकर
पोपटी वाट - विद्याधर पुंडलीक
विस्मृतीचित्रे - अरुणा ढेरे
सागर
सागर · गुरुवार, 21 Oct 2010 - 08:20 · उत्तर
अरुणा ढेरेंचे उर्वशी वाचले आहे खूप वर्षांपूर्वी. भारावून गेलो होतो तेव्हा
यशोधरा तुझे कृष्णकिनारा आणि विस्मृतीचित्रे वाचून झाली की नक्की सांग कशी वाटली पुस्तके ते.
कृष्णकिनारा पण सुंदर आहे असे ऐकले आहे. मी तेही वाचले होते पण आता काही आठवत नाही. उर्वशी बद्दल थोडे फार आठवते आहे.
यशोधरा
यशोधरा · गुरुवार, 21 Oct 2010 - 08:24
कृष्णकिनारा चांगले आहे. मला एक दोनदा वाचण्यासाठी आवडले. सतत, किंवा कधीही हातात घ्यावे आणि रमावे ह्या तोडीचे वाटले नाही.
सागर
सागर · गुरुवार, 21 Oct 2010 - 08:33 · उत्तर
अच्छा. मला त्यातले आठवत नाही.
पण उर्वशी भन्नाट आहे यशोधरा. ते वाचले असशीलच, नसशील तर नक्की वाच.
मी पहिल्यांदा वाचले त्याच वेळी ३-४ वेळा वाचले होते. अरुणा बाईंच्या पुस्तकाचे विशेष असे की त्यांचे पुस्तक वाचताना चिंतन मनन होतेच पण भावनिक नातेही निर्माण करण्यात त्या यशस्वी होतात. किमान उर्वशी बद्दलचा तरी माझा हाच अनुभव आहे.
अगदी सेम सेम अनुभव मला शुभांगी भडभडे यांच्या 'शिवप्रिया' या कादंबरीतून मिळाला होता. अशी पुस्तके मोजकीच असतात जी तुमच्या हृदयाच्या तारा छेडून जातात. :)
ऋषिकेश
ऋषिकेश · गुरुवार, 28 Oct 2010 - 18:16
अंबर हॉलच्या प्रदर्शनातून पुढील पुस्तके घेतली
१. अपूर्वाई (पुस्तक एका मैत्रिणीने नेले.. ती परदेशात घेऊन गेली आणि मी याशिवाय जास्त राहु शकत नाहि म्हणून ३र्यांदा खरेदी)
२. चिपर बाय द डझन (मिळालं बाबा एकदाचं! :) )
३. अकरा कोटी गॅलन पाणी (शाळेत या पुस्तकातला धडा होता. तेव्हापासून हे पुस्तक वाचायच्या यादीत होतं. खाण कामगार खाणीत अडकतात त्यांची कथा)
४. भारतीय विवाह संस्थेचा इतिहास (ऑनलाईन फ्री आहे. दोनदा वाचलंही आहे. पण तरीही(की म्हणूनच?) हे पुस्तक संग्रही हवंच होतं)
५. तोत्तोचान (अधिक लिहायची काय गरज)
६. संपूर्ण चातुर्मास (अनेक आरत्या, स्तोत्रे, मंत्र, सुक्ते यांचा खात्रीशीर आणि एकगट्ठा संग्रह.. इथे पुण्यातही एक कॉपी हवी होप्ती.. म्हणून घेतली)
याच बरोबर दोन पुस्तके मोफत (नाव विसरलो टंकतो मग बघून) आणि शिवाय १०% सूट मिळाली.. एकूण सौदा खूपच फायद्याचा झाला
रोचीन
रोचीन · Fri, 29 Oct 2010 - 07:16 · उत्तर
चिपर बाय द डझन, तोत्तोचान, संपूर्ण चातुर्मास (!) आहेत. बरेच दिवस झाले हि वाचून आता ज्रा धुळ झटकायला हवी!!
अकरा कोटी गॅलन पाणी अनिल बर्वेंच आहे ना!! ऐकलय पण वाचलं नाहिये!! परिक्षण येउ दे याचं!त्यांच 'थँक्यु मि. ग्लॅड' वाचलंय का??
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Fri, 29 Oct 2010 - 11:08
आज सकाळी Blue Dart मार्फत Flipkart.com कडून ऑर्डर दिलेली खालील दोन महत्वाची पुस्तके आली :
१. INDIA After Gandhi [The History of the World's Largest Democracy]
आणि
२. MAKERS OF MODERN INDIA
~ या दोन्ही पुस्तकांचे लेखक आहेत "पद्मभूषण" ने सन्मानित, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, निसर्गप्रेमी, कलकत्त्याच्या आय.आय.एम. इथून समाजशास्त्रात डॉक्टरेट मिळविलेले "श्री.रामचन्द्र गुहा". India After Gandhi बद्दल तर पुस्तक वाचण्यापूर्वीच मी इतके वाचले आहे की कधी एकदा ते हाती येईल असे झाले होते. ८९६ पानांचा हा प्रदीर्घ ग्रंथ डॉ.गुहांच्या विद्वतेची अशी काही साक्ष देतो की जिच्याबद्दल लिहिताना वॉशिंग्टन पोस्टने लिहिले, "Guha has given democratic India the rich, well-paced history it deserves.' तर टाईम्स लिटररी सप्लिमेंट्ने उल्लेख केला, An insightful, spirited and elegantly crafted account of Indian since 1947".... यातील 'एलेगंट्ली क्राफ्टेड' हे विशेषण मला फार भावले आहे. Wall Street Journal, San Francisco Chronicle आणि Outlook या जागतिक दर्जाच्या नियतकालीकांनी या पुस्तकाची A Book of The Year यासाठी निवड केली आहे.
"Makers...." हा दुसरा ग्रंथही याच दर्जाचा आहे. राजा राममोहन रॉय, सईद अहमद खान, जोतिराव फुले, गोपाळकृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, ताराबाई शिंदे, महात्मा गांधी, रविन्द्रनाथ टागोर, महमंदअली जिना, ई.व्ही.रामास्वामी, कमलादेवी चट्टोपाध्याय, जवाहरलाल नेहरू, गोळवलकर गुरूजी, राममनोहर लोहिला, जयप्रकाश नारायण, सी.राजगोपालाचारी, वेर्रिअर एल्विन, हमिद दलवाई......अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींचा भारताच्या जडणघडणीवरील प्रभाव यावरील लेख या पुस्तकात आहेत.
इंग्लिश भाषेवर जबरदस्त हुकूमत असलेले डॉ.गुहां यांनी केवळ भारतातच नव्हे तर ओस्लो, बर्लिन येथील विद्यापीठे आणि कॅलिफोर्निया, बर्कले, येल, स्टॅनफोर्ड येथील विद्यापीठात अध्ययन केले आहे. १९५८ साली जन्मलेले आणि मूळचे डेहराडुनचे तसेच दिल्लीत कॉलेज शिक्षण पूर्ण केलेले डॉ.गुहा सध्या बंगलोर येथे कायमस्वरूपी वास्तव्यास असतात आणि त्यानी पूर्णवेळ लिखाणास वाहून घेतले आहे. त्यांच्या पत्नी 'सुजाता' या आय.टी.शी निगडीत असून दांपत्यास दोन मुले आहेत.
माझे फार आवडते लेखक आहेत. इंग्लिशचा लिखाणातील वापरही फार ओघवता असतो. इथल्या सर्व सदस्यांनी ही दोन्ही पुस्तके आपल्या संग्रही ठेवावीत अशी शिफारस करत आहे. [किंमत अनुक्रमे : रुपये ४०५ व ५५९ ~ COD सोय आहे.]
इन्द्रा
निखिल देशपांडे
निखिल देशपांडे · Fri, 29 Oct 2010 - 13:03 · उत्तर
बहुदा टण्या यांनी इंडीया आफ्टर गांधी बद्दल जालावर लिहिले आहे.
त्यांनी ते लेखन ईथेही द्यावे अशी मी त्यांना विनंती करतो.
यशोधरा
यशोधरा · Fri, 29 Oct 2010 - 12:45
परवाच्या कामायनी येथील पुप्रमध्ये घेतलेली पुस्तके.
लोकायत -
विवेकवाद, विज्ञान आणि श्रद्धा
पॉप्युलर -
कालिदास रघुवंश
एका मुंगीचे महाभारत
बहुरुपी
भवभूती
शिवकालीन स्त्रिया
अजुण एक आहे, त्याचे नाव आठवत नाही :(
साहित्य अकादमी-
अशी धरतीची माया
भर्तृहरी
बोरकरांची निवडक कविता
बा. भ. बोरकर
गालीब, काळ आणि कर्तॄत्व
कोकणी कथा मराठीत.
रसिककडून - पावसाआधीचा पाऊस.
सागर
सागर · Fri, 29 Oct 2010 - 13:00 · उत्तर
यशोधरा,
तुम्हाला भवभूती मिळाले? कोणाचे आहे?
वा.वि. मिराशींचे ऑफ प्रिंट होते
तेच आहे का?
असेल तर छानच मी पण मिळवतो :)
यशोधरा
यशोधरा · Mon, 1 Nov 2010 - 12:15 · उत्तर
मिराशींचेच आहे.
अवांतर : आता ह्याचा भाग २ असा धागा सुरु कर. :)