- Log in to post comments
कुठल्याच एका अशा पुस्तकाचं परीक्षण / परिचय करून देण्यासाठी हा धागा नाही.
वाचनाचा किडा असलेले लोक सतत वाचतच असतात. त्यांतली सगळीच पुस्तकं त्यांना अतोनात आवडतात वा नावडतात असं नाही. काही पुस्तकांतून माहिती मिळते, काहींनी हलकंफुलकं मनोरंजन होतं, काही संग्रहात ठेवलीच पाहिजेत अशी खुणगाठ मनाशी बांधली जाते, काही चक्क ढापावीशी वाटतात.
तुम्ही 'अलीकडे' वाचलेल्या पुस्तकाबद्दल सर्वसाधारण माहिती (लेखक, प्रकाशक, किंमत, उपलब्धता इत्यादी) आणि त्याबद्दलचं तुमचं मत इथे लिहावं, अशी कल्पना आहे. (पुस्तक 'अलीकडचंच' म्हणजे नवीनच असलं पाहिजे असं काही नाही.) अर्थातच हा काही नियम वगैरे नव्हे. या धाग्यावर अलीकडची पुस्तकं एकत्रित सापडतील, आपल्या नजरेतून सुटली असतील तर मिळवून वाचता येतील इतकंच.
मी सुरुवात करते:
कर के देखो
संपा.: सदा डुम्बरे
समकालीन प्रकाशन
किंमत आठवत नाही.
जागतिकीकरणाच्या रेट्यात जगात मोठे बदल आणि तेही वेगानं होताहेत. या बदलांचे काही अनिष्ट परिणामही आहेत. आपल्यातले काही लोक या बदलांच्या नावानं बोटं मोडत न बसता पुढे सरसावून काही सकारात्मक कृती करताना दिसतात. उदाहरणार्थ गडचिरोलीत सामाजिक आरोग्यासंबंधी काम करणारे अभय बंग किंवा शेतकर्यांच्या प्रश्नांबद्दल सातत्यानं आणि अभ्यासपूर्ण लिहिणारे कळकळीचे पत्रकार पी. साईनाथ. अशा काही कृतिशील व्यक्तिमत्त्वांनी 'साप्ताहिक सकाळ'च्या वर्धापनदिनी केलेल्या भाषणांचा हा संग्रह आहे.
यांतली बरीचशी भाषणं अनुवादित आहेत. पण तरी त्यांत कुठे अनुवादाचा कृत्रिमपणा जाणवत नाही.
आजूबाजूच्या परिस्थितीच्या भीषणतेबद्दल आपल्याला अचूक माहिती पुरवणं आणि त्याच वेळी 'आपणही यात काही बदल घडवून आणू शकतो' असा आशावाद पुरवणं - ही या भाषणांची खासियत.
नीलची शाळा- समरहिल
लेखकः ए. एस. नील.
अनुवादकः आठवत नाही. दोघींपैकी एक बहुधा सुजाता देशमुख आहेत. पण चूकभूल देणे घेणे
(बहुतेक) राजहंस प्रकाशन
मुलांवर कुठल्याही प्रकारचा दबाव न आणता, त्यांना कठोर वेळापत्रकात न बांधता शिक्षणाचा काहीसा व्यवहाराच्या चौकटीबाहेरचा प्रयोग करणारी शाळा 'नीलची शाळा'मधे आहे.
इंग्लंडमधल्या नील नावाच्या बालमानसोपचारतज्ज्ञानं काढलेली ही शाळा. या शाळेतली मुलं तासाला बसायचं की नाही, कुठल्या, किती वेळा हे सगळं स्वतःच ठरवतात. त्यांना शिव्या द्यायला बंदी नाही. तशीच शाळेच्या काचा फोडायलाही. पण या शाळेचे नियम कोणतेही बाह्य पदाधिकारी ठरवत नाहीत. शाळेतल्या लहानात लहान विद्यार्थ्यापासून ते शाळेचा चालक-मालक असलेल्या नीलपर्यंत सगळ्यांना मतदानाचा (सारख्याच वेटेजचा!) अधिकार देणारी सभा शाळेत नियमितपणे भरवली जाते, लोकशाही पद्धतीप्रमाणे मतदान करून नियम ठरवले जातात आणि हीच सभा नियमभंगाबद्दल काय कारवाई करावी तेही ठरवते.
परीकथेतलं वाटावं इतकं हे अद्भुत आहे. मात्र त्याच्या मुळाशी असलेली नीलची अफाट सहनशीलता, प्रत्येक मूल चांगलंच असतं हा त्याचा ठाम विश्वास, आपल्या चुका कबूल करण्याची त्याची तयारी हे सारंही आहे.
पुस्तकाचा अनुवाद अगदी 'पाडस'इतका उच्च नाही, तरी खटकणाराही नाही.
अभिप्राय
निखिल देशपांडे
निखिल देशपांडे · Wed, 18 Aug 2010 - 09:42 · उत्तर
काय वेळ आलिए..
पुवि वर पण +१ प्रतिसाद देतोय.
अजुनही हिंदु मधे काही मजा येत नाहीए.
सागर
सागर · Wed, 18 Aug 2010 - 10:28
डिसेप्शन पॉईंट वाचतो आहे.
डॅन ब्राऊन या प्राण्याची भुरळ मला दा विंची कोड आणि एन्जेल्स अॅन्ड डेमोन्स मुळे पडली आहे. म्हणून मोठ्या अपेक्षेने पुस्तक वाचतो आहे.
६०० पानांचा हा ठोकळा पहिल्या १०० पानांत मुख्य रहस्याची उत्सुकता खूप ताणतो असे काही जणांना वाटू शकेन. पण एकदा रहस्यावरचा पडदा थोडा बाजूला झाला की कथा वेग घेते आहे.
अमेरिकेच्या भावी राष्ट्राध्यक्षांच्या स्पर्धेतील प्रबळ दावेदार सिनेटर सेक्स्टन यांची कन्या या रहस्यात कशी गुरफटली जाते. आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष तिचा तिच्याच वडिलांविरुद्ध कसा राजकीय वापर तिला सांगून कसा करतात याची एक झलक आत्तापर्यंतच्या वाचनात जाणवते आहे.
१२५ पाने झाली आहेत. सगळे वाचून झाले की सांगेन.:)
ऋषिकेश
ऋषिकेश · Wed, 18 Aug 2010 - 20:02 · उत्तर
मला डॅन ब्राऊनची पुस्तके आवडतात
डिसेप्शन पॉइंट छान आहे.. पण मला डिजिटल फोर्ट्रेस त्यातल्या "डिजिटल फोर्ट्रेस" च्या कल्पनेमुळेच जास्त आवडलं.. बाकी एंजल्स... आणि डाविंची... हे एकापाठोपाठ (योग्य क्रमाने) वाचावेत म्हणजे जास्त मजा येते..
सागर
सागर · Wed, 18 Aug 2010 - 20:25 · उत्तर
अरे ऋषि,
डिजिटल फोर्ट्रेस बद्दल लिही ना थोडेसे. हे पुस्तक माझ्या लिस्ट वर आहे पण जास्त कल्पना नाहिये की काय थीम आहे ते. कल्पना दिलीस तर आवडेल. कारण तू मूळ पुस्तक वाचायची उत्सुकता न तुटू देता परिक्षण लिहितोस म्हणून अपेक्षा करतो आहे :)
वाचक
वाचक · गुरुवार, 19 Aug 2010 - 14:10 · उत्तर
संगणकीय करामतीचा आणि त्यामुळे निर्माण झालेल्या 'सिच्युएशन' चा वेगवान प्रवाह म्हणजे 'डि. फो.'
'म्म्युटेबल स्ट्रिंग्स' ह्या संकल्पनेवर आधारित आणि त्यात मानवी भावभावनांची भर पडली की जे काही होउ शकते त्यातली एक शक्यता म्हणजे 'डि फो',
सध्या एवढेच लिहितो. बाकी तुम्ही वाचाच.
सागर
सागर · गुरुवार, 19 Aug 2010 - 15:27 · उत्तर
अच्छा... वाचनाचा निर्णय घेण्यासाठी एवढं पुरेसं आहे
धन्यवाद वाचक महोदय :)
ऋषिकेश
ऋषिकेश · Wed, 18 Aug 2010 - 20:07
सुवर्णयोगी संपलं.. रविंद्र गुर्जरांचे भाषांतर नसलेले व स्वतःच्या क्षेत्राशी संबंधीत व्यक्तीवरचे पुस्तक म्हणून अधिक उत्सुकता होती..
पुस्तक छान आहे. ट्रॉय शहराचा शोध घेणारा व आधुनिक उत्खनन खास्त्राचा प्रणेता ज्याला म्हटलं जातं त्या श्लीमानचे हे चरित्र आहे. जाईल तिथे सोने काढणार्या ह्या श्लीमानचे आयुष्यच इतके नाट्यमय आहे की लेखकाला नाट्यमयता आणावी लागलेलीच नाहि. गुर्जरांचे कष्ट दिसतात ते त्यांनी काढलेल्या माहितीमधे.. अनेक दस्ताइवज, पुस्तके, संदर्भ धुंदाळून त्यांनी हे चरित्र लिहिले आहे.. शेवटचा काहिसा तोचतोपणा सोडल्यास पुस्तक खिळवून ठेवणारे व चित्रदर्शी वर्णन करणारे (शिवाय नकाशे आणि छायाचित्रांनी युक्त असे) आहे
मिळाल्यास नक्की वाचावे
आता उद्या चाकाची खुर्ची - नसीमा हुरजूक चालु करेन.
सागर
सागर · गुरुवार, 19 Aug 2010 - 11:50 · उत्तर
सुवर्णयोगी अनेक वर्षांपूर्वी वाचलेलं होतं.
ऋषिकेश तू जे लिहिले आहे तसेच आहे पुस्तक. गुर्जरांना अनुवादक म्हणून ओळखणार्यांनी हे पुस्तक नक्की वाचावे असे आहे.
ऋषिकेश
ऋषिकेश · Fri, 20 Aug 2010 - 06:43
चाकाची खुर्ची संपवलं.. वयाच्या १६व्या वर्षी उद्भवलेल्या पंगुत्त्वावर मात करून पुढे अपंगांसाठीच घर बांधणार्या ह्या लेखिकेचे हे आत्मचरित्र प्रेरणादी आहे शिवाय चकीत करणारे आहे. स्वतःला आलेल्या पंगुत्त्वाआधीचं आयुष्य आणि नंतर पंगुत्त्वामुळे आलेलं नैराश्य, त्यातून उभारी आणि मग असाधारण कर्तृत्त्व हा प्रवास चांङला रेखाटला आहे. श्रीमती हुजरुक, सराईत लेखिका नसल्याने क्वचित येणरा तोचतोपणा किंवा घटनांचा पुढे-मागे चालणारा क्रम सहज नजरेआड करता येतो. अगदी शोधु नका पण समोरच दिसलं तर सोडु नये असे हे पुस्तक
वेदश्री
वेदश्री · Wed, 25 Aug 2010 - 15:09
बाबांनी परवा रमलखुणा वाचून टाकले एका रात्रीत तर काल ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी वाचून संपवले. आज आणिक कोणते घेतले असेल कोण जाणे! आईने काल शितू वाचले गोनिदांचे. माझे मात्र कूर्मगतीने राग दरबारी वाचून झाले काल आणि आता आज गोनिदांचे पवनाकांठचा धोंडी घेतलेय वाचायला. आज संपवणारच ते वाचून.
सागर
सागर · गुरुवार, 26 Aug 2010 - 07:42
पहिल्यांदा डिसेप्शन पॉईंट वाचणार्यांना पहिल्या १००-१२० पानांत कथानक उगाचच लांबवल्यासारखे वाटेल.
पण पुढे कादंबरी वाचताना ते आवश्यक होते हेही पटेल.
सुरुवातीपासून डॅन ब्राऊन ने सिनेटर सेक्स्टन व त्याच्या मुलीत -रॅकेल- यांमध्ये असलेले तणावपूर्ण संबंध, अमेरिकन राजकारणातील प्रमुख व्यक्ती, अध्यक्षांचा स्वभाव, सिनेटर सेक्स्टनच्या नासा या संस्थेवरील टीकेला लेखकाने दिलेले आकड्यांचे वजन, नासाच्या एनआरओ या संस्थेच्या उपग्रहाचे फसलेले प्रक्षेपण व पिकरिंग या संस्थेच्या डायरेक्टरच्या मुलीचा मृत्यु. मुलीच्या या मृत्युला नासाचे फसलेले उपग्रह प्रक्षेपण अप्रत्यक्षरित्या जबाबदार असल्याने नासा बद्दल मनात आकस असलेला पिकरिंग. यांतून नासाला सापडलेली उल्का व त्याचे रहस्य. अशा वळणा वळणांनी कथानक उल्केपाशी येऊन पोहोचते.
एकदा का उल्केचे रहस्य उलगडले की कथानकाचा वेग अफाट आहे. अगदी नाट्यमय घटनांची रेलचेल या कादंबरीत आहे. भन्नाट वेगाने कथानक पुढे धावते व पुढे काय ...आता पुढे काय या उत्सुकतेपोटी कादंबरी वाचून कधी संपते हे कळतही नाही.
डॅन ब्राऊनच्या दा विंची कोड व एन्जेल्स अॅन्ड डेमन्स या कादंबर्यांची तुलना या कादंबर्यांबरोबर करणे योग्य नाही. कारण डिसेप्शन पॉईंट ही कादंबरी विज्ञाननिष्ठ उल्का, त्यांतील तांत्रिक बाबी व त्याभोवती निर्माण झालेल्या व अनेकांच्या जीवावर बेतलेल्या राजकारणातील खेळ्या - प्रतिखेळ्या यांनी ओथंबलेली आहे. तर त्या दोन कादंबर्या धर्म व त्यांतील स्फोटक संशोधनाने गाजलेल्या होत्या. तुलना न करता कादंबरीचा आनंद नक्की मिळेल.
अशोक पाध्ये यांनी अनुवाद छान केला आहे. पण मला खटकलेल्या काही किरकोळ गोष्टी आहेत. पण प्रामुख्यत्वाने जाणवलेली गोष्ट म्हणजे NASA या अमेरिकन संस्थेचे भारतीयकरण 'नासा' हे असेच प्रचलित झालेले असताना अमेरिकन उच्चारपद्धतीप्रमाणे नॅसा असा उल्लेख सवय नसल्यावर वाचायला जड जातो.
एकंदरीत काय डिसेप्शन पॉईंट वाचताना थरार अनुभवता येतो. मस्त आहे :)
बटुकेश्वर
बटुकेश्वर · Fri, 27 Aug 2010 - 00:02
मूळ लेखकः एस. एल. भैरप्पा
अनुवादः उमा कुलकर्णी
सवाशे पाने वाचून झाली. आतापर्यंत वाचलेले आवडले. सविस्तर प्रतिक्रिया, चर्चा यथावकाश जशी होईल तशी.
ऋषिकेश
ऋषिकेश · Sat, 28 Aug 2010 - 09:58
एका तेलियाने - गिरीष कुबेर वाचतोय.. सुरवात तरी रोचक आहे. एकूणच आंतरराष्ट्रीय राजकारण व मध्यपूर्वेतील तेलामागचा इतिहास आवडणार्यांसाठी खजिनाच आहे
निखिल देशपांडे
निखिल देशपांडे · Sun, 29 Aug 2010 - 19:12 · उत्तर
ॠ पुस्तक छान आहे,
पुर्ण करुन लिही याचा बद्दल मी प्रतिसाद देतोच :-)
टण्या
टण्या · Tue, 14 Sep 2010 - 03:56
एकाच वेळी हिंदू, waiting for the barbarians, जी एंची कथा एक समिक्षा, सात सक्कं त्रेचाळीस असं चालू आहे.
मेघना भुस्कुटे
मेघना भुस्कुटे · Fri, 17 Sep 2010 - 15:28 · उत्तर
काय कॉम्बिनेशन आहे रे देवा! शेवटी तुझं काय होतं ते कळव बरं का...
सागर
सागर · Fri, 17 Sep 2010 - 15:33 · उत्तर
खिचडी शिवाय दुसरा चांगला शब्द आठवत नाहिये :D
सागर
सागर · Tue, 14 Sep 2010 - 07:25
जगन्नाथ कुंटे यांचे नित्यनिरंजन वाचतो आहे.
त्यानंतर त्यांचेच 'धुनी' हे मागच्या आठवड्यात प्रकाशित झालेले पुस्तक घेणार आहे वाचायला. त्यानंतर पुढील पुस्तके रांगेत आहेत.
सात सक्कं त्रेचाळीस - किरण नगरकर
प्रतिस्पर्धी (ककल्ड) - किरण नगरकर
राऊ - ना.स.इनामदार
ऋषिकेश
ऋषिकेश · Tue, 14 Sep 2010 - 13:17
"अज्ञात विवेकानंद" वाचतो आहे.
मुळ बंगाली पुस्तक आहे त्याचे लेखक "शंकर" आहेत. मराठी अनुवाद डॉ. मृणालिनी गडकरी यांचा आहे.
निखिल देशपांडे
निखिल देशपांडे · Tue, 14 Sep 2010 - 15:52
रविन थत्ते चे मी हिंदु झालो वाचतो आहे.
सुरवातचच केली आहे. पुस्तकात ज्ञानेश्वरी वर आधारित काही निबंध आहेत
मेघना भुस्कुटे
मेघना भुस्कुटे · Fri, 17 Sep 2010 - 15:36
मन 'नको नको' म्हणत असताना, हाताला लागलेली अवचटांची दोन पुस्तकं वाचली. अनपेक्षितरित्या सुरेख निघाली -
मुक्तांगणची गोष्ट:मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र सुरू करण्याच्या आधीपासून. सुनंदा अवचट गेल्यानंतरही, अशा प्रकारच्या संस्थांना अवेळी मरण येण्याचा इतिहास असतानाही - मुक्तांगणच्या आजच्या यशस्वी वाटचालीपर्यंत. एकदा तरी वाचावंसं आहेच.
पुण्याची अपूर्वाई:खास अवचट शैलीतले 'रिपोर्ताज' प्रकारचे लेख. पुण्याच्या निराळ्याच बाजूंबद्दल. रेसकोर्स, जुना बाजार, रेल्वेस्टेशन, युनिव्हर्सिटी इत्यादि. कुठे कुठे अवचट डॉक्यात जातातच (मंडई, तू नसतीस तर माझं काय झालं असतं... वगैरे), पण ठीक आहे. ते पोटात घालून वाचावं, इतकं देखणं पुस्तक आहे (सरवटेंच्या चित्रांची देखणेपणात भर).
वेदश्री
वेदश्री · Wed, 13 Oct 2010 - 07:38 · उत्तर
मेघना,
मुक्तांगणची गोष्ट पुस्तकाबद्दल जास्त माहिती देऊ शकशील का? लेखक, प्रकाशक वगैरे? मला आवडेल या पुस्तकातून काही माहिती समजून घ्यायला.
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Wed, 13 Oct 2010 - 08:27 · उत्तर
वेदश्री....
मेघनाताईंच्या अगोदर मीच उत्तर देतो. निव्वळ 'मुक्तांगण'च्या पुस्तकाबद्दलच नव्हे तर एकूणच अवचट दांपत्याच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती करून घेण्यास तुम्हास नक्कीच आवडेल. मुक्तांगणचा पोस्टल पत्ता :
मुक्तांगण व्यसनमुक्ती केन्द्र,
मोहनवाडी, पुणे आळंदी रस्ता,
येरवडा, पुणे-४११ ००६
ई-मेलवरूनही तुम्हास सविस्तर माहिती मिळेल : muktangancorporate@gmail.com
दुरध्वनी : ६४०१४५९८ / २६६८३२७१
अवश्य संपर्क साधा.....फार मोठे कार्य आहे, हे व्यसनमुक्तीचे, जे तुम्हाला त्यांच्या पुस्तकांतूनही समजेलच.
इन्द्रा
वेदश्री
वेदश्री · Wed, 13 Oct 2010 - 08:57 · उत्तर
क्या बात है, इंद्रा! मुक्तांगणच्या पत्त्यावरून तर तिथे कधीही प्रत्यक्षच भेट द्यावी ठरवल्यास सहजी जमवता येईलसे वाटतेय आता. मुंबईत असताना व्यसनमुक्ती कार्यात थोडाफार हातभार लावायचा मी तुटपुंजा प्रयत्न केला होता.. तोच इथे पुण्यातही पुढे चालू ठेवता आला तर बेष्टेष्टच होईल की. "ही माझ्या आयुष्यातली शेवटची सिगारेट आहे.. ती कशी पिऊ?" असा प्रश्न पडल्याने त्या शेवटच्या सिगारेटच्या प्रेमात पडून ती कधीच न ओढण्याचे आपण ठरवल्याचे मला तब्बल दोन तास भरभरून सांगणार्या एका झुंजार (व्यसनमुक्ती ही काय खायची गोष्ट आहे?!) व्यक्तीची आठवण आली मला.. मुक्तांगणच्या पत्त्याबद्दल शतशः धन्यवाद.
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Wed, 13 Oct 2010 - 09:29 · उत्तर
"...मुक्तांगणच्या पत्त्यावरून तर तिथे कधीही प्रत्यक्षच भेट द्यावी ठरवल्यास सहजी जमवता येईलसे वाटतेय आता...."
~~ का कोण जाणे, पण मला राहून राहून वाटत होते की, जर तुम्ही प्रतिसाद दिलाच तर त्यात वरील धर्तीचे एक वाक्य असणारच... आणि नेमके ते घडून आले. धन्यवाद. (जरूर जमवा....भेट....खूप समाधान मिळेल तुम्हाला एकदा त्या वातावरणात प्रवेश केल्यानंतर...)
कॉलेजच्या दिवसातच आम्ही मित्र-मित्र तिथे कित्येकवेळा गेलो होतो....श्री.अनिल अवचट कोल्हापुरात आले की या विषयावर गप्पांची मैफल जमतेच. (त्यांच्या सान्निध्यात वेळ कापरासारखा उडून जातो). पण आता नोकरी/व्यवसायामुळे वारंवार तसे घडत नाही, पण अन्य माध्यमाद्वारे संपर्क हा असतोच. शिवाय श्री.अवचट पुस्तकातून तर हमेशा भेटत असतातच, तेही जीवापलिकडील अनुभवांच्या माध्यमातून. त्यांचा एकही लेख असा नसेल की ज्याला स्वानुभवाची झालर नाही.
शब्दांवर जबरदस्त पकड असलेला सिद्धहस्त लेखक आहे अनिल अवचट म्हणजे. कोणतेही पुस्तक उघडावे आणि वाचायला सुरुवात केली तर असे जाणवत राहते, 'अरे....हे तर मी प्रत्यक्ष अवचटांच्यासमवेतच अनुभवतोय.' तुमचा व्यक्तिगत ग्रंथसंग्रह खूप मोठा आहे असे जाणवते, त्यात जर 'अवचट' असतील आणि तीत त्यांचे 'कार्यरत' असेल तर तुम्हाला माझ्या विधानातील सत्यता समजून येईलच. नसेल तर चटकन हे पुस्तक मिळवा जे मॅजेस्टिकचे असून पुण्यात शनिपाराजवळील त्यांच्या शाखेत उपलब्ध आहे.
सुरेखा दळवी, काका चव्हाण, डॉ.हिम्मतराव बावस्कर, एस.आर.हिरेमठ, अरुण देशपांडे, अरुण आणि राणी बंग यांचे समाजजीवनातील समाजासाठी चालू असणारे आणि आपल्याला थक्क करणारे कार्य माहित करून घ्यायचे असेल तर त्यासाठी अनिल अवचटांसारख्या लेखकाचा हात धरला पाहिजे, असे मी म्हणतो...'कार्यरत' हे त्यासाठी !
इन्द्रा
(थोडेसे अवांतर : 'इस्किलार' बद्दल आभार !)
वेदश्री
वेदश्री · Wed, 13 Oct 2010 - 10:13 · उत्तर
माझ्या प्रतिसादात ते वाक्य आपोआप आलेय. तुला ते अपेक्षित आहे हे माहितीच नसल्याने खासकरून पेरलेले वगैरे नाही.. त्यामुळे धन्यवाद वगैरे नकोच. अवचटांचे काही वाचल्याचे आठवत तरी नाहीये.. आता तू म्हणतोयस तर वाचेनच त्यांचे लेखन.
सुभानल्लाह! आता 'कार्यरत'च घेते त्यांचे. लेखनशैली वगैरे आवड/नावडणे पुढचा भाग असेल पण मुख्य मसुदा नक्कीच आवडणार असे वाटतेय.
ऋषिकेश
ऋषिकेश · Wed, 13 Oct 2010 - 10:19 · उत्तर
कार्यरत म्हणजे माझ्यामते अवचटांच्या पुस्तकातील मेरूमणी!.. अतिशय प्रांजळ, चित्रदर्शी शैली; लेखनातील आणि व्यक्तींच्या कार्यातील सच्चेपणा यांचा सुरेख मिलाप पुस्तकात आहे. महाराष्ट्रभर "कार्यरत" असणार्या हातांमागच्या माणसांचा वेध घेणारे हे पुस्तक माझ्याही अत्यंत आवडीचे आहे!
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Wed, 13 Oct 2010 - 10:40 · उत्तर
"....आता 'कार्यरत'च घेते त्यांचे."
~~ घेच ! यू वोन्ट रिग्रेट ! आणि आता घ्यायला निघालीसच आहे तर त्याच दुकानात 'बॅरिस्टरचं कार्टं' नावाचं महाडच्या डॉ.हिम्मतराव बावस्कर या जागतिक किर्तिच्या अफलातून डॉक्टरांचे आत्मचरित्रदेखील घे. अनिल अवचटांच्या 'कार्यरत' पुस्तकात 'हा विंचवाला उतारा' हा लेख याच डॉ.बावस्करांच्या संशोधन कार्यावर आहे.
काय विलक्षण लोक आहेत आपल्या भोवती....आणि अजून कित्येकांना यांचे कार्य माहितही नाही....यामुळेच अनिल अवचटांचे लेखनाचे महत्व किती अचाट आहे हे उमगते. (सॉरी फॉर अ लिटल मिस्टेक : अरुण नाही 'डॉ.अभय बंग')
(अशाच पुस्तकांची माहिती सांगून सांगून तुझे बॅन्क पास बुक हलके करतो.)
इन्द्रा
टण्या
टण्या · Sat, 18 Sep 2010 - 00:09
ती वरची खिचडी मध्येच (त्यातले waiting for the barbarians वाचून झालं) बाजूला ठेवून 'चांगदेव चतुष्टय' काल रात्री हाती घेतले. ह्या शनि-रवि मध्ये ते (म्हणजे चारही पुस्तके) संपवायला हवे कारण त्यावर पुढे थोडेसे काम करायचे आहे.
आता खिचडी-वरणभात-बिर्याणी-चायनीज राइस असं एकत्र झालय :फिदी:
सागर
सागर · Sat, 18 Sep 2010 - 14:17 · उत्तर
अरे भाऊ waiting for the barbarians हे पुस्तक कसे आहे? चांगले असेल तर थोडे लिही ना त्याच्यावर.
तुझ्या 'चांगदेव चतुष्टय' (नेमाड्यांचीच का दुसरी का नाही? ;) ) च्या धर्तीवर (शब्दार्थाने) मी ज्ञानेश्वरी घेणार आहे वाचायला. येत्या १-३ आठवड्याच्या आतच. नक्की.
मलाही तुझ्या खिचडीची थोडीशी लागण होते आहे :P
मस्त कलंदर
मस्त कलंदर · Sat, 18 Sep 2010 - 06:41
सध्या मी "टू द लास्ट बुलेट", "एका तेलियाने" आणि "डोन्ट लूज युवर माईंड, लूज युवर वेट" अशी तीन पुस्तके वाचतेय. :)
स्वाती
स्वाती · Mon, 20 Sep 2010 - 06:58
ऋषिकेश,
"अज्ञात विवेकानंद" वाचून झाल्यावर लिहा ना त्याच्यावर काहितरी. बायदवे, कुठे मिळेल हे पुस्तक? (आप्पा बळवंत चौकात?)
मी वाचल सद्ध्याच "डोन्ट लूज युअर माईंड....." चांगले आहे.
ऋषिकेश
ऋषिकेश · Tue, 21 Sep 2010 - 13:11 · उत्तर
अज्ञात विवेकानंद संप(व)ले.. खास काही लिहिण्यासारखं नाही.. पुस्तकाची सुरवात चांगली होते.. पण कारण असं की त्यात लिहिलेली माहिती अज्ञात असली तरी फारची महत्त्वाची वगैरे वाटली नाही. काहि प्रसंग गमतीशीर, रोचक वगैरे आहेत पण ते माहित नसल्याने काहिच बिघडणार नाही.
दुसरी लंगडी बाजु म्हणजे ढिसाळ लेखन किंवा अनुवाद. मुळ पुस्तक कितपत चांगलं आहे याची कल्पना नाही मात्र ह्या लेखनाला / अनुवादाला व्यावसायिक लेखनात बसवता येत नाहि. पुस्तक लिहिण्यासाठीच्या नोंदी जशाच्या तशा छापल्या आहेत किंवा अगदी लेखनाचा पहिला नमुना तसाच छापला आहे असे वाटते. कुठेही एकसंधपणा, एकसुत्रता नाही. लेखन विवेकानंदांच्या लहानपणापासून सूरू होते. वाढते वय हा क्रम असला, तरी घटना आठवतील तशा येतात. शिवाय काहि गमतीशीर नोंदी देखील ढिसाळ लेखनाने किंवा अनुवादाने तितक्याशा छान वाटत नाहीत.
थोडक्यात मोठ्या अपेक्षेने घेतलेले पुस्तक फारच बोरिंग होत जाते. मी वाचायला सुरू केले म्हणून संपवले इतकंच. मी वाचनालयातून आणले होते. कुठे मिळेल याची क्ल्पना नाही.
सध्या एजून एक पुस्तक वाचतोय पण त्यातील वेचा ओळखायला द्यायचा तुर्तास प्लॅन असल्याने इथे लिहित नाही :P
सागर
सागर · Tue, 21 Sep 2010 - 13:17 · उत्तर
>>> सध्या एजून एक पुस्तक वाचतोय पण त्यातील वेचा ओळखायला द्यायचा तुर्तास प्लॅन असल्याने इथे लिहित नाही
ऋषिकेशा वेचा दे रे लवकर...
श्रामो च्या वेच्याने डोक्याचा भुगा झालाय ... पुस्तक काही केल्या ओळखता येत नाहीये :(
मस्त कलंदर
मस्त कलंदर · Tue, 28 Sep 2010 - 17:54
माझे सततचं आनंदी-गोपाळचे तुणतुणं ऐकून मैत्रिणीनं वाचनालयात दिसताच हे पुस्तक उचललं आणि सरळ आज माझ्या हवाली केलं. येता येता बसमध्ये फक्त प्रस्तावना वाचून झालीय. अंजली किर्तने-लेखिकेलाही आनंदीबद्दल फक्त तिचा काळ कसा होता हाच नाही, तर कशी राहिली, कोणत्या विषयामध्ये तिने प्रबंध लिहिला, त्याचे स्वरूप काय? तिला इथल्या वैद्यांनी औष्ध दिले नाही यामागे आणखीही कारणे होती का.. असे एक ना दोन, अनेक प्रश पडले होते. त्यासाठी त्यांनी आनंदीबाईंच्या सहवासात असलेल्या कॅरिलीन डॉलचे त्यांच्यावरचे पुस्तक आणि काशीबाईं-आनंदीबाईंच्या समकालीन- यांच्या पुस्तकाच्या दोन्ही आवृत्त्या वाचल्या. इतकेच नाही, तर त्या अमेरिकेला जाऊन तिथल्या विमेन्स मेदिकल कॉलेजात जाऊन आनंदीबाईंची सगळी माहिती अगदी प्रबंधासकट पाहून आल्या. तिथेही आनंदीबाईंना चांगलेच स्मरणात ठेवले आहे. याहीपुढे जाऊन त्यांनी कार्पेंटर कुटुंबाची दफनभूमी शोधून आनंदीबाईंच्या थडग्याला भेट दिली. या भेटीमुळेच त्यांना नंतर कार्पेंटरबाईंच्या पणतीचा पत्ता मिळाला आणि त्या पणतीने अंजलीबाईंचा पाहुणचार चक्क चक्क आनंदीबाईंनी वापरलेल्या आपल्या पणजीच्या कपबशांनी केला!!!! मी हे वाचून तर आणखीच जास्त एक्साईट झालेय.
पुस्तकाचं स्वरूप संशोधकी आहे, पण त्याची हिंदू.... झाली नसावी असे प्रस्तावनेवरूनच वाटतंय. पाचशेपाच पानांचे हे पुस्तकही हांहां म्हणता संपवेन.
ऋषिकेश
ऋषिकेश · Wed, 29 Sep 2010 - 09:50 · उत्तर
डॉ. आनंदीबाई हा (आणखी) एक चिरंतन उत्सुकतेचा विषय आहे. पुस्तक वाचल्यावर परिचय लिहीच हा आग्रह
मस्त कलंदर
मस्त कलंदर · Wed, 29 Sep 2010 - 16:44 · उत्तर
अगदी नक्की. ते आज पुस्तकाची पहिली तीन प्रकरणे वाचताच ठरवलं.
मेघना भुस्कुटे
मेघना भुस्कुटे · गुरुवार, 30 Sep 2010 - 12:19
'दामू देवबाग्याची दुनिया' - डॉ. यशवंत रायकर.
स्वातंत्र्यप्राप्तीच्या आधीचा काळ. महाराष्ट्रातल्या कुठल्याही खेडेगावातलं म्हणता येईल असं प्रातिनिधिक डबकेवजा वातावरण. मरून गेलेला बाप, माहेरी राहणारी आई आणि आज्याचं प्रेम वयासोबत वठून गेलेलं. राशीला एक हेकट स्वैपाकीण आणि त्याहून हेकट्-कडवट अशी बापाची वृद्ध मावशी. जवळजवळ निष्प्रेम म्हणावं असं बालपण.
सगळं म्हटलं तर करड्या दु:खी रंगातलं.
पण रायकरांची लेखणी इतक्या इरसाल तिरकस वळणानं जाते, की परिस्थितीतलं सगळं
दैन्य मावळून जातं. उपरोध, हास्य आणि करुणा यांचा इतका सुरेख मिलाफ इतक्यात वाचायला मिळाला नव्हता.
डांगोरा: एका नगरीचा - त्र्यं. वि. सरदेशमुख
पुन्हा एकदा स्वातंत्र्यप्राप्तीच्या आधीचा काळ. डबकेवजा संस्थानी वातावरण. त्यातल्या समाजमनाचा कानोसा.
भाषा काहीशी जुन्या वळणाची. तालेवार. आता 'बखरः एका राजाची' कधी वाचीनसं झालंय.
ऋषिकेश
ऋषिकेश · गुरुवार, 30 Sep 2010 - 19:36
प्रवासः एका लेखकाचा - व्यंकटेश माडगुळकर वाचायला सुरू केलंय.. त्यातील "लेखक घर बांधतो" हा सुरेख लेख वाचून संपला आहे
ऋषिकेश
ऋषिकेश · Mon, 4 Oct 2010 - 07:46 · उत्तर
"प्रवासः एका लेखकाचा" आज बसमधे संपवलं. लेखक घर बांधतो, बनगरवाडी आणि वावटळ हे लेख आवडले. बाकी ठिक ठिक.
यानिमित्ताने "वावटळ" हे गांधी हत्येनंतरच्या बाह्मणांविरुद्धच्या दंगलीवर आहे असं कळलं. भारतात फार खपलं नाही मात्र रशियात दिड लाख(!!!!!!) अनुवादीत प्रती निघाल्या आहेत. कोणी वाचलंय का? कसं आहे?
हे पुस्तक वाचताना मधेच "ब्र" विकत घेतलं.. तेही वाचून संपवलं.. त्यामुळे पुन्हा हे पुस्तक हातात घेतल्यावर नंतर अगदीच बोर वाटु लागलं हे ही कारण काहि लेख न आवडाल्याचं असु शकतं
आता "थ्री कप ऑफ टी" चालु करेन बहुदा
मेघना भुस्कुटे
मेघना भुस्कुटे · Sat, 9 Oct 2010 - 05:31
'सर आणि मी' - ज्योत्स्ना कदम
जेजे कलामहाविद्यालयाचे माजी डीन - चित्रकार संभाजी कदम आणि त्यांची शिष्या-सखी-पत्नी ज्योत्स्ना कदम यांच्यात २५ वर्षांचं अंतर. दोघांची जात तर निराळीच. लग्न करतेवेळी नवर्यानं तात्विक मुद्द्यावरून स्वीकारलेली सेवानिवृत्ती. भिवया तरी कशाकशावर उंचावायच्या? अशा परिस्थितीत या दोन वेड्या माणसांनी आपला अनोखा संसार उभा केला आणि परस्परांवरचं प्रेम-कलानिष्ठा अशा आजच्या जगातून कालबाह्य झालेल्या गोष्टींच्या बळावर सुखाने भोगला, त्याची ही गोष्ट. कदम गेल्यावर ज्योत्स्नाबाईंनी लिहिलेली.
कधीकधी लेखिकेचा काहीसा शरणागत भक्तिभाव आणि साध्याच-नैसर्गिक गोष्टींना दिलेली आध्यात्मिक्/गूढ अनुभवांची डूब अंगावर येते खरी. पण शेवटी तो आपापला सूर आहे. हे दोष नजरेआड करूनही, स्त्री-पुरुंषामधलं नातं किती विविधरंगी असू शकतं ते अनुभवण्यासाठी पुस्तक एकदा वाचण्यासारखं आहेच.
श्रावण मोडक
श्रावण मोडक · Sat, 9 Oct 2010 - 20:14 · उत्तर
वाचावेसे वाटतेय हे पुस्तक. तेही शेवटच्या वाक्यासाठी अधिक. पाहू.
ऋषिकेश
ऋषिकेश · Mon, 11 Oct 2010 - 08:05 · उत्तर
श्रामो म्हणतात तसं, छोट्याशा परिचयातील शेवटाच्या वाक्याने पुस्तक वाचावेसए वाटु लागले आहे.
यादीत अॅडवायला गेलो पण पुविवर नाहि आहे का? नसल्यास नवे बनवशील का? मुखपृष्ठासहित.
सागर
सागर · Sat, 9 Oct 2010 - 19:57
व.पुं.चे 'पार्टनर' वाचून संपले आताच.
सध्या सुन्न आहे. त्यामुळे काय वाचायचे हे ठरवण्याची विचारशक्ती नाहीये.
तरी बहुतेक, डायरी ऑफ अॅन फ्रँक घेईन असा अंदाज आहे.