पुस्तकांची काळजी कशी घ्यावी?

वेदश्री

मजकूर

आपल्याला आवडलेली पुस्तके म्हणजे आपले सोबतीच. असे हे जीवश्चकंठश्च सोबती हक्काने आपल्याच घरी रहावेत यासाठी आपण काय काय नाही करत? या सोबत्यांची योग्य ती बडदास्त ठेवणे क्रमप्राप्तच ठरते की मग. त्यांची काळजी घेण्यात काही मला नीटसे न उलगडलेले प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तरं कोणाला मिळाली असल्यास त्यांनी मदत करावी अथवा कोणाला पुस्तकांची काळजी घेण्याच्या संदर्भाने याहून वेगळे प्रश्न पडलेले असल्यास त्यांना ते मांडण्यासाठी जागा करून देणे या उद्देशाने ही चर्चा काढते आहे...

मला पडलेले प्रश्न -

१. पुस्तकांना कव्हर कशाचे आणि कसे घालावे?
- पुस्तकाचे आयुष्य वाढण्यासाठी कव्हर घालणे जरुरीच असले तरी वर्तमानपत्राचे कव्हर घातले की कव्हरवरील चित्र नयनमनोहर असल्यास दिसत नाही. पुस्तकांच्या रांगेतून हवे ते पुस्तक शोधण्यासदेखील त्रास होतो. शिवाय २-३ वर्षे झाली की त्या वर्तमानपत्रावरील अक्षरे पुस्तकावर उमटलेली दिसतात (याचा मला अत्यंत राग येतो.). प्लॅस्टीकचे कव्हर (पुर्वी विकत मिळायचे, अजुनही मिळतात की नाही कोण जाणे) घातले तर त्याला स्टेपल करावे लागते जे पुस्तकाला भोक पाडते त्यामुळे मला अजिबात आवडत नाही. तुमचा काय अनुभव आहे?

२. पुस्तकं कशी रचावीत?
- पुस्तके उभी ठेवल्यास एका कप्प्यात जास्त मावतात आणि सहजी काढतादेखील येतात पण पुस्तकांची अंगभूत कव्हर्स जनरली कडक नसल्याने ती उभी रचून ठेवल्यास त्यांची पाने मुडपतात. :(

३. पुस्तकांना कीड वगैरे लागू नये म्हणून काय करावे?
- जसे आपण कपड्यांच्या कपाटात डांबराच्या गोळ्या ठेवतो कपड्यांना कीड वगैरे लागू नये आणि कप्प्यात वासही ठीकठाक रहावा म्हणून.. तसे पुस्तकांबद्दल काय करावे? माझ्याकडे अजून हा प्रश्न काही आलेला नाही पण येऊ नये म्हणून काय खबरदारी घेता येईल ते बघतेय.

अभिप्राय

टग्या

टग्या · Sat, 4 Dec 2010 - 03:42 · उत्तर

...माझ्या कल्पनेप्रमाणे सुकलेले आले. यालाच 'सुंठ' असेही म्हणतात, असे वाटते. (दोन्ही विधानांबद्दल चूभूद्याघ्या.)

मेघना भुस्कुटे

मेघना भुस्कुटे · Sun, 5 Dec 2010 - 05:56 · उत्तर

चले! कायच्या काय! दोन्ही निरनिराळ्या गोष्टी आहेत.

टग्या

टग्या · Wed, 8 Dec 2010 - 03:27 · उत्तर

...वेखंड म्हणजे नेमके काय?

स्नेहश्री

स्नेहश्री · Fri, 19 Nov 2010 - 16:33

नमस्कार,
मला एवढ्ये पुस्तक प्रेमी बघुन खरच आनंद वाटला.
@निखील "मी पुस्तके जपण्यासाठी काहिच करत नाही..
हे काम पण आउटसोर्स करावे का???"
तु मला कॉन्टक्ट करु शकतोस?
असो पुस्तकांची काळजी हा फार महत्वाचा मुद्दा आहे.
तर तिथे वळुयात.
१. पुस्तकान सुद्धा हवेची गरज असते. तर नेहमी पुस्तके कपाटात ठेवायची पण १५ दिवस महिन्यातुन एकदा तरी त्याना ऊन दाखवायच. तसेच ते शक्य नसेल तर पुस्तकाच कपाट फॅन सुरु करुन ७ दिवसातुन १दा उघड ठेवायच २तासासाठी तरी.
२. किडे मकोडे:- बर्‍याच ग्रंथालयामध्ये पेस्टकंट्रोल केले जाते पण ते प्रत्येक वेळेला शक्य होतेच अस नाही तर त्यासाठी डांबराच्या गोळ्या हा उपाय आहे पण सर्वात घरगुती उपाय म्हणजे कडुनिंबाची पाने मलमल च्या किंवा पातळसर कॉटनच्या कपड्यामध्ये बांधुन ती पुरचुंडी पुस्तकांच्या मागे व वरती ठेवावी. किंवा तंबाखुची पुरचुंडी सुद्धा चालते.
३. बुकमार्कः शक्यतो पुस्तकांमध्ये बुकमार्क ठेवा त्याने शक्यतो पाने, कोपरे दुमडणे खुप कमी होते.
४.उचले :- हा सर्वात मोठा नुकसान होणारा पार्ट आहे. लोक येतात आणि सुरु होतात अय्या हे पुस्तक मला हव होत मी लगेच परते देतो/देते..आणि ते फार क्वचित परत येत. त्यासाठी उपाय म्हणजे ब्राउन पेपरच कव्हर व त्यावर प्लॅस्टिकच कव्हर घालाव. त्याने पुस्तक खराब ही होत नाही आणि उचल्यांपासुन ही पुस्तके वाचतात.

तुर्तास एवढे अजुन काही शंका असल्यास मोकळेपणाने विचारा. धन्यवाद.

कविता महाजन

कविता महाजन · Wed, 24 Nov 2010 - 17:54

पुस्तकांची काळजी घेण्याबाबत मी केलेल्या काही गोष्टी अशा "
१. कपाटांच्या फळ्या काचेच्या आहेत. त्यामुळे काही खराब होत असेल तर लगेच दिसते.
२. कपाटांना आतून पांढरा ऑइलपेंट लावावा. ( अनेक पुस्तकांच्या दुकानातही हा पर्याय वापरलेला दिसतो.)
३. वेखंडाची पूड आणि वेखंडाच्या काड्या दोन्हीही बाजारात मिळतात. फक्त ते खात्रीच्या दुकानातून घ्यावेत. म्हणजे वर लिहिल्याप्रमाणे विपरित अनुभव येणार नाही. मी गेली अनेक वर्षे वेखंडाची पूड पुस्तकांच्या कपाटात ( पुरचुंडी बांधून ) ठेवत असते.
४. सगळी पुस्तके उभी वा सगळी आडवी ठेवू नयेत. आकारांनुसार त्यांची रचना असावी. तसेच पुस्तके गच्च कोंबू नयेत. त्यांना श्वास घ्यायला मोकळी जागा कपाटात राहू द्यावी.
५. महत्त्वाचे संदर्भग्रंथ आणि मासिके मी बाइंड करून घेतले आहेत. मुखपृष्ठ सुटे करून बाइंड केलेल्या प्रतीवर चिकटवता येते.
६. भरपूर बुकमार्क्स पुस्तकांच्या आणि वाचनाच्या जागांच्या आसपास असू द्यावेत. किंवा नवे पुस्तक आणताच त्यात तीन-चार बुकमार्क ठेवून द्यावेत.
७. हरवू - पळवू नयेत अशी पुस्तके आडजागी / उंचावर ठेवावीत. हरवावीत अशी पुस्तके प्रवासात सोबत न्यावीत. पळवावीत अशी पुस्तक घरात समोर ठेवावीत. :-).
८. पुनःपुन्हा वाचायला लागणार नाहीत अशी एकदा वाचून ( वा अर्धी वा न वाचलेली वा वाचवत नसलेली ) पुस्तके क / ब दर्जाच्या वाचनालयांना भेटीदाखल देऊन टाकावीत. :-).
९. भेट म्हणून ( नाव / सही यांसह ) आलेले पुस्तक रद्दीत देऊ नये. थोरामोठ्यांना भेट दिलेली पुस्तके त्यांनी अशी रद्दीत दिल्याच्या चर्चा (एकेकाळी ) वृत्तपत्रांत व्हायच्या. आता काळ बदलला असला तरी धोका कशाला पत्करायचा? :-).

यशोधरा

यशोधरा · गुरुवार, 25 Nov 2010 - 08:35 · उत्तर

> पळवावीत अशी पुस्तक घरात समोर ठेवावीत >> LOL! अगदी! सद्ध्या अशी २ ठेवलीत ;)

सागर

सागर · गुरुवार, 25 Nov 2010 - 09:27 · उत्तर

नावे सांग बरे... मला हवी असल्यास घेईन तुझ्याकडून
एक तू मला देणार आहेसच ते या दोघांत नसावे

एकंदरीत तुझी भेट मला श्रीमंत करणार असे दिसतेय ;)

यशोधरा

यशोधरा · गुरुवार, 25 Nov 2010 - 10:06 · उत्तर

>>एक तू मला देणार आहेसच ते या दोघांत नसावे >> एक आहे आणि एक नाही :)

सागर

सागर · गुरुवार, 25 Nov 2010 - 12:41 · उत्तर

एक आहे आणि एक नाही

मानलं तुला... याला म्हणतात उत्तर :)

तूर्तास ठीक ठीक ... भेटेन तेव्हा बघेन ;)

आरागॉर्न

आरागॉर्न · Fri, 26 Nov 2010 - 20:15 · उत्तर

पळवावीत अशी पुस्तक घरात समोर ठेवावीत. Smile.

उपयुक्त सूचना. :)

टण्या

टण्या · Tue, 7 Dec 2010 - 20:59

पुस्तकांच्या बाबतीत ही सर्वात महत्वाची गोष्ट आपण विसरतो. त्यांना नियमित बाहेर काढून, झटकून (ते बारक्या दांड्याला फडके बांधलेले असते ना तसे झटकण्याचे एक साधन बनवावे व त्याने पुस्तके झटकावीत), थोडी उन्हे वा मोकळी हवा दाखवावी. एखाद-दोन कपाट पुस्तके असतील तर हे महिन्यातून एकदा सर्व पुस्तकांबाबत करणे शक्य आहे. फार जास्त पुस्तके असतील तर आळीपाळीने करावे. एक तक्ता बनवून ठेवावा वर्षभराचा व योजलेल्य दिवशी झटकाझटकी केली की टिक-मार्क करावे त्या तारखेपुढे.
वर कविता महाजनांनी सांगितलेले काचेच्या फळ्या व पांढरा ऑइलपेंट हे मुद्दे विशेषच पटले. अजून एक म्हणजे जर फार सौंदर्याच्या दृष्टिकोणाबाबत आग्रही नसाल तर पत्र्याची (powder coated steel sheetsची) लायब्रीत असतात तशी कपाटे विकत घ्यावीत. ह्याची दारे उघडून ९० अंशात वळून कप्प्याच्या वरच्या सांद्रीत आत जातात. ह्या कपाटांना ओल लागणे/वा़ळवी वगैरे भानगडी त्रास देत नाहीत.
तसेच जर ओलसर (कोकणासारख्या) भागात राहत असाल किंवा घराभोवती बरीच दाट झाडी वगैरे आहे (ज्यायोगे वाळवीचा प्रादुर्भाव जास्त आहे) वा जुने घर आहे, तर (किंवा इतर ठिकाणीसुद्धा) डी.डी.टी. किंवा गॅमॅग्झीन पावडर कपाटाच्या फळ्यांवर पसरून ठेवावी. पुस्तके झटकण्यासाठी काढली असता रिकाम्या कप्प्यात पुन्हा पुस्तके लावण्यापुर्वी हे करावे.
मुख्य म्हणजे 'नाही' म्हणायला शिका. वर इंद्रानी म्हटल्याप्रमाणे ज्याला/जिला पुस्तक देणार आहात त्याच्या वाचनप्रेमाची खात्री वा पुस्तक घेउन जाण्याच्या उद्देशाची खात्री असल्यासच पुस्तके द्यावीत.

अजून एक उपाय म्हणजे जर घरी कोणी कामाला येत असतील तर त्यांना महिन्याचे शंभर-दोनशे रुपये जास्त देउन हे काम करण्यास सांगणे. माझी स्वतःची पुस्तके सगळी माझ्या आई-वडिलांच्या घरी आहेत कारण मी कामानिमित्त इकडे-तिकडे फिरतो. तिथे कामाला येणार्‍या भाभींना मी वर्षाचे आगाउ पैसे देउन ठेवतो. महिन्यातून एकदा त्या सगळी पुस्तके काढून, झटकून पुन्हा लावतात.

वेदश्री

वेदश्री · Mon, 13 Dec 2010 - 17:26

अरे वाह! इथे भलतीच उलथापालथ झालेली दिसतेय. असे प्रश्न मलाच एकटीला पडतात का असे वाटायचे मला पुविवर येण्यापुर्वी पण तसेच काही नाही हे आता पटलेय. खूप आनंद झालाय. आता उपाययोजनेला सुरूवात करायची.. :-)

मणिकर्णिका

मणिकर्णिका · गुरुवार, 13 Jan 2011 - 04:02

माझी काही भर:
१. पुस्तकं वाचताना मध्येच उठून कुठे जायला लागल्यास ते उपडं ठेवून जाऊ नये, कोपरे दुमडू नये. पुस्तकाचा कणा खिळखिळा होऊन पुस्तकाचं आयुष्य कमी होतं. खुणेसाठी बुकमार्क्स वापरावेत.

२.जास्त वाचनात नसलेल्या पुस्तकांची पानं अधून मधून चाळावीत. बराच वेळ वाचनात राहिलं नाही की पुस्तकाची पानं एकमेकाला चिकटून पिवळसर पडतात असा अनुभव आहे.

३.पुस्तकाच्या पहिल्या पानाबरोबरच आतल्या काही पानांवर पण नाव घालावे. पहिलं पान फ़ाडून ते पुस्तक आपलंच असल्याचा दावा करणारे महाभाग कमी नाहीत. मला स्वत:ला हा अनुभव आलेला आहे. माझ्या या सवयीमुळे त्याचा माझं पुस्तक घशाखाली घालण्याचा प्रयत्न फ़सला.

४.वरचा काचेचं शेल्फ़ वगैरे पर्याय आवडला पण प्रत्येकाला परवडेल का? माझं पुस्तकाचं कपाट सागवानाचं आणि जुन्या पद्धतीचं आहे. लाकडामुळे मलातरी अजून काही प्रॉब्लेम नाही आलेला. फ़क्त महिन्याआड मी डांबराच्या गोळ्या ठेवते. फ़क्त एकच खात्री करावी की ते कपाट खूप सूर्यप्रकाशाच्या जागेत असावं.

५. प्रत्येक आठवड्याला धूळ झटकावी. नाहीतर काळसर पॅच कायमचे राहू शकतात.

६. प्लॅस्टीकची कव्हरं मी घालतेच. पण सांजशकुन, ऋतुचक्र वगैरे च्या साईझच्या पुस्तकांना प्लॅस्टीकची कव्हरं मिळाली नाहीत मला. स्टेपल करून किंवा सेलोटेप वगैरे लावून घालायची नाहीयेत. काही उपाय आहे?

७.पुस्तकांची यादी करुन ठेवावी. कोणी वाचायला नेत असेल तर त्याचे नाव लिहून ठेवावे. (त्याच्यावर सूचनांचा इतका भडीमार करावा की त्याने पुस्तक परत ठेवून चालू पडावे)

यशोधरा

यशोधरा · गुरुवार, 13 Jan 2011 - 07:14 · उत्तर

सागवानाच्या कपाटापेक्षा काचेचं शेल्फ स्वस्त पडेल हां मणि, नक्कीच :P

सागर

सागर · गुरुवार, 13 Jan 2011 - 07:14 · उत्तर

मणिकर्णिका,

या मोलाच्या धाग्यात छान भर घातलीत. उपाय आवडले.
पुस्तके घेतली तरी ती जपावी कशी हा मोठा प्रश्न पुस्तकप्रेमीच्या मनात असतोच.

या धाग्यावर झालेल्या चर्चेमुळे प्रत्येकाला त्याच्या आवाक्यातील उपाय वापरता येतील असा विश्वास वाटतो. :)

धन्यवाद

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · गुरुवार, 13 Jan 2011 - 04:42

"....(त्याच्यावर सूचनांचा इतका भडीमार करावा की त्याने पुस्तक परत ठेवून चालू पडावे)....!

~ हे धमालच आहे. आम्ही स्वभावाने इतके भीडस्त आणि मऊ की, कलिंगडदेखील आमच्याकडे पाहुन हसते. त्यामुळे डोळ्यादेखत पुस्तक घेऊन जाणार्‍याला (विशेषतः सो-कॉल्ड सीनिअर्स) कसा विरोध करायचा हा विचार मनी घोळत आहे तोच तो सदगृहस्थ जिन्याच्या पायर्‍या उतरत असतो. बरं, दहापैकी नऊ वेळेला पुस्तक नेले आणि दहाव्या खेपेस मी अडविले तर हाच इसम "ख्याय तिच्या मारी, पुस्तकाची ती बाब आणि हा इन्द्रा भाव काय खातोय !" अशी मताची पिचकारी टाकणारच.

वैताग आहे अशा फुकट चंबू बाबुरावांचा.

बाकी १ ते ६ सूचना छान आणि म्हणून पुस्तकांच्या टीकावूपणासाठी उपयुक्त अशाच आहेत...(विशेषतः पाने पिवळसर पडू नयेत म्हणून अधूनमधुन चाळावीत ही एक.)

इन्द्रा

चर्चा प्रकार