पुस्तक कोडं

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ११

विष्णु जेव्हा घरी आला, तेव्हा त्याचं घर अंधारात पुरतं बुडून गेलं होतं. क्षणभर त्याला काहीच समजलं नाही. त्यानं ओटीवरून माजघरात प्रवेश केला. माजघरातल्या एका कोपर्‍यात आपली आई बसलेली आहे, हे त्याला त्या अंधारातही जाणवलं. तिच्याजवळ जाऊन विष्णु म्हणाला, 'आई, अंधार पडलाय्, दिवा नाही का…

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - १०

"काहीतरीच काय बरळतो आहेस सोनवणे?" मी ओरडलो,"अरे, तो इतका सात्विक आणि सज्जन माणूस, तो तिथ?" मला पाहताच गुरूजींनी मान खाली घातली अन् ते गुपचूप उभे राहिले. मी म्हटलं," छान गुरूजी! ही रामप्रहरी चांगली शिकवणी चालली आहे!" पण मलाही संकोचल्यासारखं झालं. मी इकडेतिकडे पाहिल्यासारखं करून बा…

ओळखा पाहू हे गीत कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ९

युगामागुनी चालली रे युगे ही करावी किती भास्करा वंचना किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी कितीदा करु प्रीतीची याचना नव्हाळीतले ना उमाळे उसासे न ती आग अंगात आता उरे विझोनी आता यौवनाच्या मशाली ऊरी राहीले काजळी कोपरे परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे अविश्रांत राहील अन् जागती न जाणे न येणे कु…

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ८

मी साळूला विचारले,"हे बघ साळू, तुझ्या माहितीतली सगळ्यांत जुनी लढाई कोणती?" "राम-रावणांची किंवा कौरव-पांडवांची असेल. त्यांतल्या त्यात राम-रावणांची अगोदरची असेल; कारण कौरव-पांडवांच्या युद्धात कृष्ण हजर होता आणि कृष्णावतार रामावताराच्या नंतर झाला." साळू एखाद्या विद्वानाचा आव आणून म्…

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ७

मंडळी भोजनांत दंग झाली होती. पण पंडित? तो भुकेनें कळवळला होता, पण भुकेपेक्षां वैनीसाहेबांच्या तिखट बोलण्यामुळें त्याच्या डोक्यांत उठलेले तिडीक त्याला अधिक दु:सह वाटत होती. हातांतला पाण्याचा गडवा तेथेंच ठेवून तो मागील दारीं गेला आणि इतका वेळ आवरून धरलेल्या अश्रूंना त्यानें वाट मोक…

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ६

"हे बगाऽऽ लढाई सुरू झालीया. हिटलर हे नाव ऐकलंय का? त्यो एका अंगानं चाल करून आलाय त्याला थोपवायचं काम सुरू हाय. आपलं मायबाप सरकार त्यला आडवाय लागल्यात. त्यापायी आपुन सैन्यात शिरायचं. सैन्य भरती झाली न्हाई तर हिटलर थांबायचा न्हाई. मग त्यो आलाच म्हणून समजा! आणि त्यो आला म्हंजे आपल्य…

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ५

रात्रभर कमालीचा उकाडा होता. सारखे गदमदत होते. मन चिकचिकत होते आणि घामाच्या ओलीवर पंख्याचा कृत्रिम वारा घेऊन घेऊन अंग दुखत होते. उकाड्यामुळे रात्री कितीतरी वेळ झोपच लागली नाही. अशा जाग्रणानंतर दुसर्‍या दिवशी सकाळी उशीरा जाग येते आणि जाग आल्यावरही सकाळचा ताजेपणा, तरतरी वाटत नाही. उ…

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ४

"बहिरं किंवा आंधळं असणं ही किती भयंकर गोष्ट असली पाहिजे." केट केलर म्हणाली. "असंच काही नाही बरं का!" डॉ. बेल झटकन् म्हणाले. "माझी पत्नी वयाच्या चौथ्या वर्षापासूनच बहिरी आहे. त्या वेळी तिला 'जांभळा ताप' आला अन् त्यामुळे ती आपली श्रवणशक्ती गमावून बसली. पण आम्ही अत्यंत सुखी आहोत." अ…

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ३

हे दवबिंदू म्हणजे माणसाच्या जीवनाचं एक उत्कृष्ट प्रतीकच आहे! हे दवबिंदू कुठून येतात आणि कुठं जातात हे कुणालातरी माहित आहे काय? माणसाचंही तसंच आहे. तो कुठून येतो आणि कुठं जातो हे कुणालाही सांगता येत नाही. हे दवबिंदू कुणाचा तरी प्रकाश घेऊन चमकतात, इतके की वाटावं जणू काही प्रत्येक द…

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - २

आपल्याकडे टक लावून पाहणार्‍या बाळाच्या दृष्टींत आईला सूर्य, चंद्र आणि नक्षत्रे यांचे संमेलन दिसतें; त्याच्या अकारण हास्यांत वसंत, निर्झर व उषा यांच्या हास्यांचा त्रिवेणीसंगम झाला आहे असा तिला भास होतो; त्याची झांकलेली मूठ तिला त्रिभुवनाच्या मोलाची वाटत असते. .. पौर्णिमेप्रमाणे अम…