पुस्तक कोडं

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ६५

संकेतः वाचले असेल तर गरज नाही ( खरेच गरज नाही पडली संकेताची :)) एकमेव संकेत - सदर लेखकास साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. आणि कोकण प्रांतावर अधिकाराने लिहितात या वेच्याचे विजेते आहेत - इंद्रराज आणि वल्ली. :) टण्या यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत त्यावरुन त्यांनी ओळखले आहे याची…

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ६४

संकेत: गरज पडली तर देईन. या वेच्याला विजेते मिळणे अवघड नसावे :) संकेत १ : ह्या पुस्तकाने महाराष्ट्राच्या भूगोलावर परिणाम करणार्‍या एका महत्त्वाच्या घटनेला स्पर्शले आहे. (बहुदा हाच संकेत पुरेसा ठरावा :) ) संकेत न देताही वल्ली यांनी पुस्तक ओळखले आहे. तेव्हा या कोड्याचे प्रथम विजेते…

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ६३

संकेत १ : हा वेचा एका कथासंग्रहातील आहे. तुलनेने हा वेचा ओळखायला बर्‍यापैकी सोपा आहे. या पुस्तकात स्त्री व्यक्तिरेखा प्रभावीपणे चितारलेल्या आहेत. संकेत २ : वेच्यात दोन शब्द ठळक केले आहेत. पहिला ठळक केलेला शब्द लेखकाच्या दुसर्‍या एका पुस्तकाच्या नावाकडे दिशानिर्देश करतो आणि दुसरा…

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ६१

मागच्यावेळेस फारसे प्रतिसाद आले नाहीत. यावेळेस मात्र असे होणार नाही असे वाटते. तर हे घ्या... एक कविता टाकतो आहे. म्हणजे त्यातली काही कडवी. ** रामाच्या देवळामागे हातभट्टीची धुनी जागे, शेपटी घालून चालू लागे हनुमान कोणी भ्यालेला. राज्य खुनी भांडग्यांचे, राज्य धनदांडग्यांचे, राज्य सत…

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ६०

"शंकराचार्यांनी म्हटलं आहे की, त्या वरच्या पातळीवर ईश्वर नाहीच. त्यांनीच वेगवेगळी स्तोत्रही लिहिली. काय सुंदर संस्कृत भाषा आहे त्यांची. अप्रतिम. शंकराचार्यांइतकं सुंदर, सौष्ठवपूर्ण संस्कृत कुणालाच लिहिता आलेलं नाही. त्यांनी देवीवर''सौंदर्यलहरी' हे काव्य लिहिलंय. देवीच्या प्रत्येक…

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ५८

१. छोटेखानी कादंबरी आहे. २. ही कादंबरी अनुवादित नाही. अस्सल मराठी आहे. मराठी मातीत रुजलेली आहे. लेखकाच्या दुसऱ्या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. ३. संकेत म्हणून काही ­शब्द ­ठळक केले ­आहेत. ते नीट संदर्­भांच्या चौकटीत वाचले तर, ­ज्यांनी ही कादंबरी वाचली ­आहे त्यां…

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ५७

५६ वे कोड्याचे उत्तर जाहिर व्हायच्या आत हे कोडे घालतो आहे. कारण एकदा आठवडा सुरू झाला की टंकायला वेळ होईल की नाही सांगता येत नाही. ह्या घाईबद्दल क्षमस्व =========== गांधीयुगात डोळ्यापुढे आकार घेत होते ते काय हे स्वराज्य? एका अज्ञात बिहारी लोककवीने स्वराज्याच्या मिरवणूकीचे वर्णन कर…

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ५५

तिनं एका छोट्या टाचणीनं मला टोचलं होतं पण एका क्षणात माझा फ़ोफ़ावलेला राग मला एकटं सोडून गेला.मला काही गोष्टी समजतच नाहीत.त्या घडत असताना मी बघतो.डोळे उघडे ठेवून.त्यांच्याबरोबरचा क्षुल्लक,असंबध्द विनाकारण तपशील मी टिपून घेतो.सगळं आठवतं मला. जसं घडलं तसं.पण आतापर्यंत लागेबांधे नसल…

शब्दावरून पुस्तक ओळखा - १

हा जरा वेगळा प्रयत्न. भलतंच एक पुस्तक वाचताना एक माहितीची तुकडा हाती आला. त्यावरून मग जरा इतर शोधाशोध केली. त्या माहितीत एक शब्द सापडला, जो आधी एका निराळ्याच कथेत वाचला होता; पण अंदाजाने त्याचा अर्थ काही वेगळाच लावून पुढे गेलो होतो. आता ही माहिती मिळाल्यावर त्या शब्दाचा खरा अर्थ…

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ५४

पुस्तकः वाघरू/त्या तिथे रूखातळी कादंबरी: त्या तिथे रूखातळी लेखक: गो. नी. दांडेकर इंद्रराजजींचे अभिनंदन. त्यांनी प्रयत्नांती उत्तर अचूक ओळखले आहे. सागर यांनीही उत्तर ओळखलेच. वेचा: "या गडाचा जो कुणी स्वामी असेल, त्याची अनुमति घेऊनच ती कोरलेलीं. लेणीं तयार झालीं दोन हजार वर्षांपुर्व…